मन:शांतीसाठी (रिलॅक्सेशन)

Submitted by अवल on 1 May, 2021 - 05:39

(डिसक्लेमर: मी यातली तज्ञ नाही. केवळ मैत्रिणींच्या आग्रहावरून हे केले आहे. परंतु अनेकांना याचा उपयोग झाला आहे. बऱ्याच आधी हा ऑडिओ केला होता. करोनाच्या काळात हा उपयोगी पडू शकेल म्हणून इथे टाकते आहे.)

आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक ताणतणाव घेऊन आपण वावरत असतो. अनेकदा मन, शरीर यांना म्हणावा तसा आराम मिळत नाही. कळतं पण वळत नाही अशी काहीशी परिस्थिती होते. मग कधीतरी नैराश्य येतं. बीपी हलू लागतं. काही आजार, आयुष्यातले काही धक्के अजूनच परिस्थिती वाईट बनवतात. नेहमीच आपल्याला योग्य मदत मिळते, घेता येते असं नाही. कधी कधी अगदी तातपुरती मदत गरजेची असते. जेव्हा प्रोफेशनल मदत गरजेची असेल तेव्हा मात्र न संकोचता ती घ्या.

पण सामान्य दमणुकीतून शांतता मिळावं म्हणून, सामान्य ताण मोकळा व्हावा या साठी अनेक रिलॅक्सिंगचे व्हिडिओज नेटवर उपलब्ध आहेत, त्यांचा उपयोग होतो.
माझ्या एका मैत्रिणीला वाटलं की असे व्हिडिओज मराठीत असतील तर मराठी लोकांना जास्त आवडतील. मग तिने मला विचारले. की तू असे तणावमुक्तीचे लिखाण, वाचन करू शकशील का?
खरं तर हा काही माझा प्रांत नाही. पण तिने माझ्या लेखन आणि सादरीकरणावर इतका विश्वास दाखवला की एकदा प्रयत्न करून बघायला मी होकार दिला.

हा असा मला काहीच अनुभव नव्हता. त्यामुळे खूप जपून सगळे लिखाण केले, वाचनही.
अनेक मैत्रिणींनी हवी तेव्हा सगळी मदत अगदी चटकन आणि मनापासून केली. काही मैत्रिणींचा फर्स्ट हँड अनुभवही उपयोगी पडला. त्यासगळ्यांचे मनापासून आभार.

ऑडिओ साठी इथे क्लिक करा :
https://drive.google.com/file/d/11DCPYmXLGfMKR77vTCeN_Kzct-8paC3x/view?u...

किंवा

युट्युब वर ऐकण्यासाठी इथे क्लिक करा :
https://youtu.be/P4gVpMO3dq4

तुमचा अनुभव जरूर शेअर करा.
धन्यवाद!
---

काही टीप्स:
ऑडिओ/व्हिडिओ ऐकताना शक्यतो आरामात बसा/ आडवे पडा. डिस्टर्ब करणारी सर्व गॅझेट्स बंद करा. अशी वेळ निवडा जेव्हा पुढील किमान १५ मिनिटं तुम्हाला इतर कोणतेही व्यवधान नसेल. शक्यतो डोळे मिटून, हेडफोन लावून ऐका. कोणताही प्रयत्न मुद्दाहून नको. शक्यता आहे की हे ऐकताना झोपही लागेल. काही हरकत नाही. मनाला शांत वाटणेच अपेक्षित आहे.

---

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान,
तू नळीवरची लिंक बघितली.
आवाज छान आहे तुमचा .
अगदी हवं होतं असं काही तेव्हाच हा धागा आलाय.
निवांत वेळी पूर्ण ऐकणार.
खूप धन्यवाद .

अरे वा गजानन __/|\__
ओळख आहे ना Happy नवीन क्लुलेस कधी यायचय? 3-4 वर्षात खेळलेच नाही। काय धमालकेली आपण

या अवल ताईच्या ऑडिओचा खूप छान अनुभव आला आहे.

गेल्या वर्षी नवर्‍याचे अचानक बी. पी शूट अप होऊन त्याला अॅडमिट करावे लागले होते. अचानक असं होण्याचं कारण डॉ. नी अ‍ॅन्झायटी हे सांगितलं होतं. रिळेक्स होण्याची त्याला गरज होती.त्या वेळेस अवलताईने हा असा ऑडिओ केला आहे हे आठवलं आणि तिच्याकडून मागून घेतला मी.

अवलताईचा आवाजच खूप शांतवणारा आहे. हा ऑडिओ माझा नवरा त्या दिवसांत रोज ऐकत असे. . त्या सेशननंतर खूप शांत, निवांत वाटतंय असं त्याने सांगितलं. त्यातील स्वयंसुचना खूप परिणामकाऱ ठरल्या आणि हळूहळू रिलॅक्स होणं जमत गेलं.

धन्यवाद अवलताई या रिलॅक्सेशन ऑडिओसाठी !!

आशिका Happy
मनापासून धन्यवाद
आणि शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना

अवल, हो ओळख आहे तर. क्लूलेसही आठवले!
अलीकडे तुमचे नवीन लेखन दिसत नाही.