विमान विषयक एक चित्रपट

Submitted by पराग र. लोणकर on 1 May, 2021 - 01:25

अनेक दशकांपूर्वी मी एक इंग्रजी black & white चित्रपट पाहिला होता. त्यात एक (बहुदा एरोनॉटिकल इंजिनिअर) एका विमानातून प्रवास करत असतो. तो विमानात बसल्याबसल्या काहीतरी आकडेमोड करून असा अंदाज बांधतो की ते विमान कोसळणार आहे. त्या विमानातून त्याची एक आवडती अभिनेत्रीही प्रवास करत असते. तो तिला विमानात अशी जागा दाखवतो, जिथे बसल्यावर (विमान कोसळल्यावर) त्या जागेवरील व्यक्ती वाचण्याची शक्यता असेल.

या चित्रपटाचे नाव कुणी सांगू शकेल?

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

https://www.whatismymovie.com/ ही एक साईट आहे जिच्यावर की वर्ड्स टाकून आपल्याला नाव आठवत नसलेला मूव्ही शोधता येईल.

येस. किती तरी वर्षे मी या चित्रपटाच्या नावाच्या शोधात होतो. कलाकारांची नावे वगैरेही माहीत नसल्याने कसे शोधावे तेही कळत नव्हते.

तुम्ही चित्रपट कसे शोधायचे याचेही महत्वाचे मार्गदर्शन केलेत.

मामी- आपणास खूप खूप धन्यवाद!

किमान पंचवीस एक वर्षांपूर्वी पाहिलेला हा चित्रपट काल पुन्हा पाहू शकलो, ते येथे मिळालेल्या माहितीमुळे. मामी, तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद!

धन्यवाद मामी.

सिनेमा शोधण्याची साइट वापरून
हे सिनेमे शोधले.
मायकल एंजेलोचा सिनेमा शोधला.
The Agony and the Ecstasy
-------------
कारच्या गंमती.
Chitty chitty bang bang.
______________
दोन कुत्रे आणि एक मांजर यांना सोडून मालक दुसरीकडे जातात.... पण ते प्रवास करून मालकाचे नवीन घर शोधून काढतात.
Homework bound - the incredible journey.

--------------------------------
घोड्यांचे हवेत. तेही सापडले.
______________

मागे मलाही असंच एका सिनेमाचं नाव आठवत नव्हतं तेव्हा या साईटचा शोध लागला. या धाग्याच्या निमित्ताने इतरांनाही उपयोगी पडेल ही साईट.

The Agony and the Ecstasy, Chitty chitty bang bang, Homework bound - the incredible journey प्राईमवर आहेत बहुतेक. चेक करा.

मलाही लहानपणी पाहिलेला एक हॉरर चित्रपट पहायचा होता. त्यात तीन गोष्टी होत्या. वर दिलेली साईट वापरून त्या चित्रपटाच्या नावाचा शोध घेतला आणि चक्क युट्युबवर पुर्णपणे तो चित्रपट परत पहाता आला.

https://en.wikipedia.org/wiki/Tales_from_the_Darkside:_The_Movie
https://www.youtube.com/watch?v=0zIjXJavt6s

यातली तिसरी स्टोरी एकदम भारी आहे.