नाही आता

Submitted by omkar_keskar on 26 April, 2021 - 23:44

माझिया दु:खास मी आठवत नाही आता,
डोळ्यात उगा अश्रू साठवत नाही आता.

आली ती किती आव्हाने मी झेलली अपार
छातीला दु:खप्रहार साहवत नाही आता..

मला पैलतीर कधीचा खुणावतो आहे
ऐलतीरी तितका धीर धरवत नाही आता..

भेटी आपुल्या किती सांग झाल्या, अताशा
तुझ्या घराखाली मी रेंगाळत नाही आता..

अंतर वाढले संवाद थांबले पुन्हा, का
माझ्या अंतरी तूझी वसाहत नाही आता..

Group content visibility: 
Use group defaults

छान