श्वासाचे नाते

Submitted by omkar_keskar on 24 April, 2021 - 09:22

श्वासाचे नाते आपल्या असे जडले होते,
नजरेत एका सारे काही घडले होते.

गप्प तूही गप्प मीही जणू दोघे अबोल
तत्क्षणी मौनातुनी संवाद घडले होते

मी मागितले त्याला, किती लावले कौल
सखे तुझे येणे वरदान ठरले होते.

तिथे नाद घेतला तुझ्या पैंजणाने, अन
इथे हृदयाचे ठोके पुन्हा चुकले होते.

मैफिल मनोमनीची अशी चालली होती,
त्या चिंब प्रेमातून सूर निथळले होते.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users