अद्दल

Submitted by भूतबाळ on 23 April, 2021 - 12:10

आता छान वाटतं त्याच्याकडे बघताना ! पूर्वी मी त्याला घाबरायचो आता तो मला. कर्मफलं ही भोगावीच लागतात.

दररोज सकाळी त्या गल्लीतून जाताना तो माझ्यावर गुरकावत धाऊन यायचा. मी अगदी जिव मुठीत धरुन पळायचो आणि स्वत:ला त्याच्यापासून वाचवायचो. त्यादिवशी मात्र हद्द झाली. आधी न दिसलेला तो अचानक कुठूनतरी उगवला आणि त्यानं मला खाली पाडलं. तो मला चावणार एवढ्यात बाहेर झालेला आवाज ऐकून 'मॅक्स...' अशी हाक देत ती घराबाहेर आली. तिच्या बोलावण्यानं तो मला सोडून क्षणार्धात तिच्याकडे झेपावला. त्याला प्रेमानं जवळ घेत, कौतुकानं गोंजारत ती आतमध्ये निघून गेली. जाताना माझी साधी विचारपूससुद्धा केली नाही. निर्दयी कुठली !

त्याच रात्री किश्याबरोबर बोललो. त्यानं 'तो दुपारी झाडाखाली एकटाच झोपलेला असतो आणि त्यांची स्कूटी घरी नसते' अशी माहिती पुरवली. माझ्या सोबत यायचंही कबूल केलं.

एके दिवशी दुपारी, तो बाहेर झाडाखाली पहुडलेला असताना दोघं दोन दिशेनं त्याच्यावर तुटून पडलो. एकामागोमाग वार करुन आम्ही त्याला पुरतं घायाळ केलं आणि कोणी आम्हाला बघण्याआधीच तेथून पोबारा केला.

आता तो गेटच्या आत बसलेला असतो. मला बघताच लपण्याचा प्रयत्न करतो आणि मी मस्तपैकी शेपटी हलवत ती गल्ली पार करतो. कधी दिसलीच ती त्याची सुश्रूषा करताना तर तिला बघून कान मागे उडवतो.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

कथा मस्त बदलली आणि आता चांगली वाटत आहे.. आधीची प्रचंड निर्दयी होती...
चांगला ट्विस्ट.... पुढील लेखनाला शुभेच्छा ...

मी मस्तपैकी शेपटी हलवत ती गल्ली पार करतो. कधी दिसलीच ती त्याची सुश्रूषा करताना तर तिला बघून कान मागे उडवतो.

मनुष्य आणि कुत्रा यातील वाद आता दोन प्राण्यांमध्ये बदलला... बदल चांगला वाटतो.

Pages