अद्दल

Submitted by भूतबाळ on 23 April, 2021 - 12:10

आता छान वाटतं त्याच्याकडे बघताना ! पूर्वी मी त्याला घाबरायचो आता तो मला. कर्मफलं ही भोगावीच लागतात.

दररोज सकाळी त्या गल्लीतून जाताना तो माझ्यावर गुरकावत धाऊन यायचा. मी अगदी जिव मुठीत धरुन पळायचो आणि स्वत:ला त्याच्यापासून वाचवायचो. त्यादिवशी मात्र हद्द झाली. आधी न दिसलेला तो अचानक कुठूनतरी उगवला आणि त्यानं मला खाली पाडलं. तो मला चावणार एवढ्यात बाहेर झालेला आवाज ऐकून 'मॅक्स...' अशी हाक देत ती घराबाहेर आली. तिच्या बोलावण्यानं तो मला सोडून क्षणार्धात तिच्याकडे झेपावला. त्याला प्रेमानं जवळ घेत, कौतुकानं गोंजारत ती आतमध्ये निघून गेली. जाताना माझी साधी विचारपूससुद्धा केली नाही. निर्दयी कुठली !

त्याच रात्री किश्याबरोबर बोललो. त्यानं 'तो दुपारी झाडाखाली एकटाच झोपलेला असतो आणि त्यांची स्कूटी घरी नसते' अशी माहिती पुरवली. माझ्या सोबत यायचंही कबूल केलं.

एके दिवशी दुपारी, तो बाहेर झाडाखाली पहुडलेला असताना दोघं दोन दिशेनं त्याच्यावर तुटून पडलो. एकामागोमाग वार करुन आम्ही त्याला पुरतं घायाळ केलं आणि कोणी आम्हाला बघण्याआधीच तेथून पोबारा केला.

आता तो गेटच्या आत बसलेला असतो. मला बघताच लपण्याचा प्रयत्न करतो आणि मी मस्तपैकी शेपटी हलवत ती गल्ली पार करतो. कधी दिसलीच ती त्याची सुश्रूषा करताना तर तिला बघून कान मागे उडवतो.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

नाही आवडलं हे लिखाण. कथा म्हणावं असं काही घडतच नाही. आणि विषय, आशय काही बघायला जावं तर ते सुद्धा अजिबात दिसत नाही.

कसं वाटलं ते आवर्जून सांगा ही विनंती.>>>
जरी कथेत जे घडले ते नाही आवडले तरी प्रत्यक्षात असे होताना बघितले आहे. एका माकडाला तो रोज त्रास देतो म्हणून काही कॉलेजच्या मुलांनी अर्धमेले होईपर्यन्त बदडले होते.

हे सत्य असेल तर वाईटच केलंय . मुक्या प्राण्याला कळत नाही . माणसाला देवाने बुद्धी दिली आहे. पाळीव प्राणी म्हंटल्यावर त्यावर सूड का उगवायचा . कधीतरी त्या जागी तुमच्या घरातील लहान बाळ असेल तर त्यालापण असं मारणार का? अनेक प्राणीप्रेमी पाळीव प्राणी त्यांच्या मुलाप्रमाणे वाढवतात . थोडी मानसिकता बदला . आणि चुकीचा मेसेज जाईल असं लिखाण शक्य तो नाही केल्यास चांगलंच . लेखक समाजात चांगले विचार पेरण्याचे काम करतील तेवढा समाज सुसंस्कृत होईल.

कथा अजिबात नाही आवडली. कुत्रा रोज सायकलच्या मागे लागतो, तरीही त्याला मोकळे सोडलेले असते ही त्या कुत्र्याच्या मालकिणीची चुक, त्यामुळे तिला अद्दल घडवली असती तरीही एकवेळ चाललं असतं. पण कुत्र्याला एवढं मारणं बिलकुल unaccepted Sad

कथेत जे केले त्याचे समर्थन नाही. पण असे घडते हे मात्र खरे.
चांगली लिहिली आहे. यातच शेवट बदलून ट्विस्ट देता येईल.

उदा.
"आता तो गेटच्या आत बसलेला असतो. मला बघताच लंगडत घरात पळण्याचा प्रयत्न करतो आणि मी मस्तपैकी तोंडाने शीळ घालत रमतगमत त्या गल्लीतून बाहेर पडतो. कधी ती आढळलीच त्याची सुश्रूषा करताना तर तिच्याकडे सहानुभूतिपूर्वक बघून कसनुसं हसतो."
मी बदला घेतला म्हणुन खूष आहे.

पण त्या मुक्या प्राण्याला मात्र कळत नाहीये, त्याचे काय चुकले. तो म्हणतोय मी माझ्या धर्माला जागलो, पण तो मानवतेच्या धर्माला जागला का?

भूताचं असलं तरी बाळ आहे. जरा गोड भाषेत समजावून सांगा.
आसूडासारखे प्रतिसाद येताहेत. बाळाला काय समजणार ?
पण त्याच्या आईचं मन छिन्नविछिन्न होत असेल प्रत्येक फटका-यानुसार ....

रानभूली, सावकाश बोला. त्या ऋन्मेषने ऐकले तर
"लहान मुलांना ट्रोल करणे - मायबोली पॅटर्न भाग-२" काढायचा.

मी आधी रस्त्यावर जाताना चालत किंवा गाडीवर, दुरून च कुत्र्याकडे पाहत पाहत जायचे..त्यामुळे हमखास कुत्री भुंकत माझ्या मागे यायचे आणि बाकीचे सहकारी ही त्याला साथ द्यायचे.एकदा तर गाडीवर पुढे लेक उभी आणि मागे मुलगा बसलेला आणि माझ्या त्यांच्या कडे पाहण्यामुळे आली की भुंकत तीन चार कुत्री.. मग मी आजुबाजुला न बघता वेगात गाडी दुसर्या रस्त्याने नेली. लकीली धडपडले नाही.
मी इथेच माबोवर वाचलं होतं बहुतेक, आपण त्याला स्टेअर केलं तर त्यांना असुरक्षित वाटून ते भुंकतात.त्यानंतर मी त्यांच्या कडे दुर्लक्ष करायला लागले मग कुत्र्यांनी ही भुंकने आणि मागे येणे सोडलं.
तुम्ही ही बदला घेण्यापेक्षा दुर्लक्ष करून पाहायचं होतं.

मी माझ्या कुत्रीला अ‍ॅक्टीव्हा वर बसवून फिरायला नेते. ती लहान असताना दिसायची नाही. आता कुत्री मागे लागतात. माझी शहाणी कुत्री त्यांच्यावर अजिबात भुंकत नाही. जेव्हढं मोठं कुत्रं तेव्हढं ते शांत राहतं लहान कुत्रं भुंकल्यावर. एकदा ब्रेक मारला तेव्हां ती खाली उतरली. तर सगळी भुंकणारी कुत्री तिचा आकार पाहून पळून गेलेली Proud
ताकतवर ऐसेही होते है Happy

फिमेल आहे. पण माझ्या भावाने आणि त्याच्या मित्रांनी मॅक्स ठेवलंय नाव.
नावाला प्रतिसाद द्यायला लागल्याने बदलता नाही आलं नंतर.

भूतबाळ हा आयडी गौरवशाली आत्माकुलातील नाही याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी. त्यांचेही खानदान इज्जतदार असेलच.
परंतु कोणत्याही आयडीचा संबंध आत्मकुलाशी जोडल्याने खानदाना च्या परंपरेतील पायजम्यांना बट्टा लागत आहे.

अरे नव्हती पुसायची कथा.
ही काय सत्यघटना थोडीच होती.
असती तर तिने पोलिसात तक्रार केली असती ना.

मी मस्तपैकी शेपटी हलवत ती गल्ली पार करतो. >>>>>
आत्मकथन कोण करतंय माकड कि कुत्रा? मग किश्या कोण आहे?
जेन्युन शंका आहेत माझ्या.

अरे वा ! किती छान ते. बदलून माझ्या कुत्रीचं नाव टाकलं का ?
म्हणजे माझ्यावर होती होय कथा ? बरं बरं.
माझी मॅक्स शांत आहे. पण असं कुणी त्रास द्यायला आलं तर वाघिणीसारखी फाडून खाईल ती. Lol
मृणाक्का, काय ओळखलंय ! आत्मकथन करणारा/री माणसात नाही ते ... Lol

आत्मकथन कोण करतंय माकड कि कुत्रा? मग किश्या कोण आहे?>>>
बदल करताना मी कुत्राच ठरवलं होतं पण तुमचा प्रतिसाद वाचून माकड, मांजर असं कोणीही चालू शकतं हे ध्यानात आलं.
किश्या-मित्र

प्रतिसादाबद्दल धन्यवाद mrunali.

fantastic.

अरे वा ! किती छान ते. बदलून माझ्या कुत्रीचं नाव टाकलं का ?
म्हणजे माझ्यावर होती होय कथा ? बरं बरं.
माझी मॅक्स शांत आहे. पण असं कुणी त्रास द्यायला आलं तर वाघिणीसारखी फाडून खाईल ती>>>
खाली प्रतिसादात मॅक्स नाव वाचलं म्हणून तेच लिहून टाकलं. नको असेल तर बदलवतो.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद रानभुली, प्रभुदेसाई.

नको गं. राहू दे. Lol
तुझी जशी लहान लेकरं तशीच माझी मॅक्स पण. Happy

पुढच्या कथेत कुणाच्या मुलाबाळांची नावं घेऊन अशी विकृत हिंसा करू नकोस. सक्ती नाही.
तुझ्यावर आहे शेवटी.

ज्या सफाईने कथा बदलली त्या लेखन चलाखीला fantastic म्हणालो.
लेखक आणि लेखन ह्यामध्ये सरमिसळ नका करू !

अर्रर्र , हे काय भूतबाळ ? भूतयोनीला बट्टा लावेल अशी लाजिरवाणी कामगिरी केलीस की.बरं झालं वेळेत डिक्लेअर केलं ते. परवा हे बाळ म्हणजे दिआ म्हणजे मी असल्याचं वाचलं. पण लिहायला अकाऊंट्च नव्हतं. तोंदाबुमा झालं तेव्हां.

Pages