छंद माझा वेगळा

Submitted by किरण कुमार on 23 April, 2021 - 07:31

मायबोली वरच एकदा सायकलींग बद्दल एकदा वाचले आणि उत्साहाने सायकल विकत आणली त्या घटनेला आता ५-६ वर्षे झाली असतील , पण या एका छोट्याशा गोष्टीने माझे आयुष्यच बदलून गेले , हा सायकलींग चा प्रवास मोठा असला तरी तो प्रकाशचित्र रुपाने आणि त्यावर मला सुचलेल्या काहि ओळींनी आपल्यासमोर थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करत आहे .

प्र.चि.१

WhatsApp Image 2021-04-23 at 12.48.55 (5).jpeg

कोकण तसाही भटक्या लोकांचा जिव्हळ्याचा विषय , अशाच एका कोकण सायकल सफरीवर -२०१९ . सायकलस्वार अमित ,सत्यजित आणि मी

प्र.चि.२

WhatsApp Image 2021-04-23 at 12.48.55 (4).jpeg

पुण्याच्या आसपास असलेला निसर्ग अनुभवायचा तर पावसाळ्यात पानशेत धरणाकडे पाय वळणारच

प्र.चि.३

WhatsApp Image 2021-04-23 at 12.48.57 (1).jpeg

पुणे कन्याकुमारी सायकल सफर वर्ष २ रे -२०१९ कर्नाटक येथील बेंगरे बिच वरुन

प्र.चि. ४

WhatsApp Image 2021-04-23 at 12.48.56 (2).jpeg

नीलकंठेश्वर हे ही जवळच वसलेले सुंदर मंदीर बाजूचा परिसर ही सुरेख

प्र.चि. ५

WhatsApp Image 2021-04-23 at 12.51.07 (4).jpeg

पुणे कोकण गोवा ही एक अचानक ठरवून केलेली सायकल सफर -२०२० (फोटो सौजन्य - अभिजीत बुचके )

प्र.चि. ६
WhatsApp Image 2021-04-23 at 12.51.07 (1).jpeg

पुण्याजवळ असणारा भोर रस्त्यालगत नेकलेस पॉईंट -

प्र.चि.७

WhatsApp Image 2021-04-23 at 12.51.07 (5).jpeg

कादवे घाट पानशेत वेल्हा रस्ता

प्र.चि. ८

WhatsApp Image 2021-04-23 at 12.48.56 (1).jpeg

जर्सेश्वर मंदीर रस्ता (मांडवी कुडजे एन डी ए) पुणे

प्र.चि. ९
WhatsApp Image 2021-04-23 at 12.48.55 (3).jpeg

कोकण वाटा आणि समुद्र यांचे अनोखे नाते - आरे वारे किनारे

प्र.चि. १०
WhatsApp Image 2021-04-23 at 12.51.07 (2).jpeg

कोकणातील अजून एक शांत किनारा निवती बिच ( फोटो सौजन्य - केदार दिक्षित)

प्र.चि. ११

WhatsApp Image 2021-04-23 at 12.51.07.jpeg

पुणे कन्याकुमारी सफरितील दांडेली अभय अरण्य ते येल्लापूर रस्ता - कर्नाटक

प्र.चि.१२

WhatsApp Image 2021-04-23 at 12.51.07 (6).jpeg

अंबोळगड किनारा ( फोटो सौजन्य : चिंतामणी करंबेळकर , शब्द - नासिर काजमी)

क्रमशः

किरण कुमार

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच रे किरण !
क्रमशः वाचून आनंद झाला आहे.
पुभाप्र

सुरेख!!! एकदम टवटवीत झाले फोटो पाहून व कवितेच्या ओळी वाचून.

खूप सुंदर फोटो...
कवितांच्या ओळीही खूप छान..!

किरण ह्यातले बरचसे प्रवास तुझ्या सोबत अनुभवलेले आहेत प्रत्येक्षात, इतकेच काय ह्या कविता पण तुझ्या तोंडून ऐकल्या आहेत आणि प्रत्येक वेळी त्या नवीनच काहीतरी उमजून जातात.

आपण सगळेच आपल्या सफरीनबद्दल लेख लिहितो/लिहिले आहेत पण इतक्या मोजक्या शब्दात तू ते इतकं अचूक टिपलंय, त्याला तोड नाही.

हे क्रमशः आहे वाचून अजून आंनद झाला, त्यामुळे हे सुरू ठेव हे माझ्याकडून विनंती!

प्रतिसादांबद्दल मायबोलीकरांचे मनापसून आभार ...............//\\................. धन्यावद