उदविग्न मनाचा उद्रेक...

Submitted by शापित आयुष्य on 23 April, 2021 - 00:22

उदविग्न मनाचा उद्रेक...

होईल आता उदविग्न मनाच्या संतापाचा उद्रेक...
घडले नाही कधी असा घडवेल एल्गार अनेक...

मिटलेल्या मुठीमध्ये, तुटलेली स्वप्ने घेऊन अनेक...
न्याय निवाडा उरला नाही, शोधी संघर्षाची मार्गे अनेक...

अनेक मिटले, मिटतील अनेक मृगजळ समान न्यायातून...
उरलेले मरतील भूक, द्वद्व, अन कोल्हेकुई समाज विवंचनेतून...

त्याच अंधारातून पुन्हा प्रकाश निघेल एक...
न्यायामागच्या अन्यायाला फाडतील किरणे अनेक...

मागून मिळत नसेल तर तो मिळवावाच लागतो...
संघर्षासाठी एक वेळ शस्त्र हातात घ्यावाच लागतो...

न्यायव्यवस्थेच्या अन्यायाचा बळी नाही तो एक...
देशोधडीला लागलेली अशी कुटुंबे आहेत अनेक...

मिटलेल्या मुठी अनेक, होतील जेव्हा एक...
एल्गार होईल न्यायासाठी, मिटतील दृष्ट अनेक...

होईल आता उदविग्न मनाच्या संतापाचा उद्रेक...
घडले नाही कधी असा घडवेल एल्गार अनेक...
© SURYAKANT_R.J.

Group content visibility: 
Public - accessible to all site users