नारळाच्या वड्या

Submitted by दक्षा on 12 April, 2021 - 00:35

नमस्कार,

मी नारळाच्या वड्या बनवत होते, पण का कोण जाणे मागच्या वेळेला बनवल्या तेव्हा खूप मस्त झाल्या पण या वेळेला बिघडल्या सारण कडक झाले आहे आणि चिकट झाले नाही पण आता त्या सारणाचे काय करावे कळत नाही आहे असेच तरी किती खाणार वड्या असत्यातर संपल्या असत्या, त्याचे आता काय करू शकतो कृपया सांगा, 2 नारळ घेतले होते.

धन्यवाद

दक्षा

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अरे बापरे. दोन नारळ म्हणजे तसं बरच आहे! मायक्रोवेव्ह मध्ये मिनीटभर किंवा कुकरमध्ये बिनाशिट्टी ३ मिनीटे ठेवलं तर मऊ पडेल. मग थोडा दूधाचा हबका मारून वड्या पडतील कदाचित. नाही तर मायक्रोवेव्ह वर मऊ झाल्यावर भरपूर दूध आणि भिजलेले अहळीव/ तांदळाचे पीठ असं काही घालून खीर होईल. पण तो वाढता वसा प्रकार आहे.

पेशन्स असल्यास मिक्सरमधून काढून कोकोनट कुकीज करता येतील.किंवा सारणा सारखे आत भरून गोड पोळ्या पुऱ्या वगैरे.