दु:खाचे रडगाणे

Submitted by ShabdVarsha on 7 April, 2021 - 01:22

दुःखाचे रडगाणे गाता गाता
असलेले सुखही दूर भासते
नशिबाला दोष देता देता
आयुष्य पुढे चालत राहते

सुटले ते सोडून द्यावे
क्षणात आयुष्य बदलत जाते
ऊन सावलीचे खेळ सारे
कधी सुख पापणीआड लपते

आयुष्याचे कोडे सोडवता
नवीन कोडे बनत जाते
जेव्हा आयुष्य कळू लागते
तेव्हा वेळ संपत येते....
- शब्दवर्षा ( वर्षा )

Group content visibility: 
Use group defaults