अज्ञातवासी! - भाग ३२ - रात्रीस खेळ चाले!

Submitted by अज्ञातवासी on 6 April, 2021 - 14:09

भाग - ३१
https://www.maayboli.com/node/78381

"खानसाहेब!"
खानसाहेब चपळाईने बाहेर धावले दाराला कडी लावली.
"झोया, संभाल." त्यांनी आवाज दिला.
झोयाने एव्हाना पिस्तूलानी गोळीबार सुरू केला होता.
"नाही, तू फक्त मोक्षसाहेबाना सांभाळ." खानसाहेब ओरडले.
झोया दरवाजाजवळ धावली.
"दार उघडा..." मोक्ष जोरजोरात ओरडत म्हणाला.
"मूर्खा,गप्प बस. ते लोक तुलाच शोधताय, आणि तू ओरडून पत्ता सांगतोय."
झोयाने हे वाक्य म्हणताना दोन लोकांचा वेध घेतला...
इकडे खानसाहेब अचूकपणे मारेकरी टिपत होते. मात्र हवेली मोठी असल्याने कोण कुठे आहे, हे समजण्यासाठी त्यांना मार्ग नव्हता.
"हाय अल्ला!" त्यांना बेगमची किंचाळी ऐकू आली.
ही किंचाळी झोयानेही ऐकली,
आणि दोघेही आतल्या खोलीत धावले...
झोयाने दरवाजा सोडलेला बघून एक अंधारात लपलेला मारेकरी मोक्षकडे धावला.
तो जिन्यावरून वर गेला.
त्याने कडी काढली व धाडकन दरवाजा उघडला.
खोलीत मिट्ट काळोख पसरला होता...
त्याने समोर बेछूट गोळीबार करायला सुरुवात केली...
सर्व गोळ्या संपल्या, कुठूनही आवाज नाही...
त्याला श्वासोच्छ्वास वाढल्याची जाणीव झाली.
"चूक केलीस!!!" एक आवाज घुमला.
आणि त्याच्या डोक्यातून एक गोळी आरपार गेली...
★★★★★
अनेक वर्षांपूर्वी, दादासाहेबानी एका हातात एके 47 आणि दुसऱ्या हातात उझी घेऊन मुंबई जिंकली होती....
.. आज मोक्ष राजशेखर शेलार, दोन्ही हातात एके 56 घेऊन खोलीच्या बाहेर आला...
आणि त्याने जो समोर दिसेल त्याला टिपायला सुरुवात केली.
प्रत्येक जण त्याच्याकडे बघत होता, आणि काही करण्याच्या अगोदरच त्याच्या गोळ्या त्यांचा वेध घेत होत्या.
'वेताळ, वेताळ...' म्हणत काही मागच्या पावली परत धावले.
मात्र मागूनही गोळ्यांनी त्यांचा पिच्छा सोडला नाही.
मृत्यू आज चौफेर उधळत होता...
त्याचा पट्टीचा घोडा आज रिंगणात उतरला होता...
★★★★★
"खान, आगे मत आना, नही तो..."
"थांब..." खान कळवळले.
त्याने बेगमच्या खनपटीला बंदूक लावली होती.
"तुझ्या बेटीला सांग, बंदूक फेकायला..."
झोयाने निमूट बंदूक खाली टाकली.
"त्याला माझ्याकडे आणा."
"कुणाला," झोयाने विचारले...
"जास्त शहाणपणा नको, तुला माहितीये, जा. नाहीतर..."
...समोरून एक गोळी आली, आणि त्याच्या कवटीच्या आरपार गेली.
"तो माझ्याविषयी बोलत होता झोया..." एक अतिशय धीरगंभीर आवाज घुमला.
खानसाहेब व झोया विस्फारून त्याच्याकडे बघतच राहिले.
'दादासाहेब...' खानसाहेबांच्या तोंडून उद्गार बाहेर पडले...
...आणि मोक्ष मटकन खाली बसला...
झोया त्याच्याकडे धावली. तिने त्याला मिठीत घेतलं.
"काय झालं, मोक्ष... बोल माझ्याशी." ती त्याचा चेहरा कुरवाळत म्हणाली.
"बाहेर अडतीस प्रेते आहेत, विल्हेवाट लावा." तो शून्यात बघत म्हणाला.
त्याने झोयाला यंत्रवतपणे बाजूला केले,
व तो त्याच्या खोलीकडे निघाला...
◆◆◆◆◆
मोक्ष खोलीत तळमळत पडला होता.
त्याला अनेक चित्र, अनेक प्रसंग डोळ्यासमोर येत होते.
बाबा, शरा...
त्याची तळमळ वाढत चालली होती.
तो अर्धवट ग्लानीतच होता.
"साहेब, दादासाहेबांनी निरोप पाठवलय." पिंगळा त्याच्या समोर आला.
"काय?"
"सोन्याची राखी..."
"काय?"
"सोन्याची राखी..."
"मला समजत नाहीये," मोक्ष बरळला.
"सोन्याची राखी, सोन्यासारख्या व्यक्तीला बांध."
"ठीक आहे," मोक्ष बरळला, आणि झोपून गेला.
◆◆◆◆◆
त्र्यंबकेश्वर!!!
'शंभू देवा रं,
शंभू देवा रं.
नवसाला पाव,
नवसाला पाव.
शंभू देवा रं,
शंभू देवा रं.
नवसाला पाव,
नवसाला पाव.
भस्माचा पट्टा ओढीन मी तुला,
शंभू देवा नवसाला पाव मला.
बेलाचा भंडारा वाहीन मी तुला,
शंभू देवा विजय दे मला.
धोत्र्याचा जुडा वाहीन मी तुला,
दाखव तुझ्या सगळ्या कला.
शंभू देवा रं,
शंभू देवा रं.
नवसाला पाव,
नवसाला पाव.'
दादासाहेब तल्लीन होऊन गात होते.
शेखावत, पांडे, जाधव व सायखेडकर त्यांच्या मागेच होते.
"आज राखीपौर्णिमा ना?' पांडेनी जाधवला प्रश्न केला.
"हो."
"म्हणून इतक्या सकाळी आज दादासाहेब त्र्यंबकला आलेत."
"हात जोडा, आणि देवाला भजा..." शेखावत शांतपणे म्हणाला.
"विधिपूर्वक पूजा झालीये. राखी घ्या." दादासाहेब. पुजाऱ्याने तबक हातात धरलं.
... आणि दादासाहेबानी हात जोडून त्या राखीला नमस्कार केला
..व ते तबक घेऊन निघाले...

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी चालू आहे कथा. .
'<<दादासाहेब...' खानसाहेबांच्या तोंडून उद्गार बाहेर पडले...>> इथे दादासाहेब मुद्दामच लिहिले आहे का ?

अज्ञात, छानच लिहीता.. नेहमीच..
पण इतकी वाट बघायला का लावावी?
मी आता नाही सांगत.. पुभाप्र!
आवर्जून प्रतिसाद देणारे वाट बघतातच..

खुप छान !!!

इथे दादासाहेब मुद्दामच लिहिले आहे का ? >>> होय

धन्यवाद मंडळी. मी भाग उशिरा टाकतो, तरीही आपण वाट बघता, आणि आवर्जून प्रतिसाद देत, खूप खूप धन्यवाद...