सूर नवा ध्यास नवा - आशा उद्याची (सीझन ४)

Submitted by भास्कराचार्य on 6 April, 2021 - 12:13
 सूर नवा ध्यास नवा

'सूर नवा ध्यास नवा' ह्या आपल्या आवडत्या मालिकेचं २०२१मधलं नवीन पर्व कालच सुरू झालं. 'आशा उद्याची' ही संकल्पना घेऊन. हे पर्व 'लेडीज स्पेशल' असणार आहे. सध्या ऑडिशन्ससाठी अजित परब, स्वप्नील बांदोडकर, महेश काळे परीक्षक आहेत. ह्याशिवाय नेहमीचा ठसका घेऊन स्पृहा जोशी, मिथिलेश पाटणकर, आणि वादक मंडळी आहेतच! ह्याचबरोबर आपले मायबोलीकर पूनम छत्रे आणि वैभव जोशी ही सिद्धहस्त लेखक मंडळीही आहेत. ह्या पर्वाच्या चर्चेसाठी हा धागा! होऊन जाऊ दे संगीत मैफिल! सोमवार, मंगळवार, आणि बुधवार रात्री ९:३० वाजता कलर्स मराठीवर!

सर्वांनी काळजी घ्या, सुरक्षित रहा, हे ओघाने आलंच. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

महेश काळेबद्दल अगदी हेच वाटलं. वय काय, उगाच पॉझ घेत कसा बोलतोय (डोक्याला हात लावणारा स्माईली) त्याला उगाच अतिशुद्ध मराठी बोलण्याचा सोस आहे असं वाट्तं, आव आणतो पण शब्दप्रयोग योग्य नसतोच.

हेत्वी मस्त गाते. संपदा मानेचं परवाचं गाणं चांगलं वाटलं. बऱयाचजणी स्टेज, कॅमेरा, मका ह्याने दबून गेल्या आहेत असं वाटतंय.

कोणी बघत नाही का? आज महाराष्ट्र स्पेशल आठवड्याचे तीनही एपी बघितले. आवडले, पण स्पर्धक फक्त सातच दिसत होत्या, बाकीच्या नऊ जणी इतक्या लवकर बाहेर पडल्या का?

@VB..नाही.तब्येत बरी नाही म्हणून नव्हत्या.मागच्या आठवड्यात एलिमिनेशन पण नव्हत.
आता गोव्यात चालू झाल आहे शूटिंग.
पण अजूनही रंगत नाही हा सिझन.का कळत नाही.
काल स्प्रुहा जोशी जरा जास्तच जाडी दिसत होती का?

आजचा कार्यक्रम पाहून असे नक्की वाटते कि राधा हीच या पर्वाची विजेती ठरणार आहे !! काय काय म्हणतायेत महेश आणि अवधूत .... अर्जुनाचा डोळा काय ..माझे असे काय होते काय .... काहीही काय ??

UP थँक्स

सोमवारचा एपी बघितला पण नाही आवडला इतका. तो महाराष्ट्र स्पेशल वाले मात्र तिन्ही आवडले होते. तरीही ह्या वेळी वो बात नही असेच वाटतेय

निल्या, जितके बघितले आहे त्यावरून तरी ती पुण्याची रश्मी (?) जी यावेळी राज गायिका झाली आहे ती जिंकेल असे वाटते.

ती पुण्याची रश्मी (?) जी यावेळी राज गायिका झाली आहे ती जिंकेल असे वाटते. >> खरे आहे .. पण आज पर्यंतचा इतिहास वेगळा आहे ...

हो आज ती कमाल गायली ...

बघतेय पण अजुन स्पर्धा रंगली नाहीये , अर्थात करोनाच्या काळातली चॅलेंजेस फेस करताना अख्या टिमलाच हे सगळं सोपं नक्कीच नसणार त्यामुळे त्यांचे आहेत ते एफर्ट्स अ‍ॅप्रिशिएट करायला हवेत !

या आठवड्याचे एपिसोड्स पाहिले, फायनल ६ मिळाल्या सुध्दा !
हा सिझन लवकर आटोपला कि मी काही एपिसोड्स मिस केले माहित नाही.
सिझनने काही ग्रिप घेतली नाही पण त्यातल्या त्यात रश्मी मोघे आणि प्रज्ञा साने चांगल्या वाटल्या .
संपदा, सन्मिधा सुध्दा अधेमधे चांगल्या गायल्या आहेत .
प्रेक्षकांमधे किंवा परिक्षकांचे कोण लाडके आहे याचा अजिबात अंदाज नाही यावेळी !

Pages