मैत्री

Submitted by ShabdVarsha on 6 April, 2021 - 02:59

खेळ नियतीने थाटलेला आसमंत सारा फुललेला
अनमोल रूपी मोती मैत्रीच्या रूपात भेटलेला

जुळती जिथे घट्ट अशी स्पंदने
शब्दांत मांडता न येणारी तिथे बंधने

जिथे पतंग मैत्रीचा मनसोक्त उडणारा
निस्वार्थ भावना अन् प्रेमाचा झरा जपणारा

दिलखुलास जीवलग नाते मनास सुखवणारे
स्वरात कसे गुंफावे क्षण मैत्रीचे हर्षवणारे

खळखळणारा झरा जणू निर्मळ हास्य वाहती
मैत्रीचा सुगंध हा जणू चोहीकडे दरवळती

आठवणींची पाने चाळता नयनात अश्रू दाटते
चैतन्याची पालवी फुलता कधी हास्य उमटते

अशी गोड मैत्री प्रत्येकाच्या आयुष्यात असावी
शब्दसुरांत कितीदा मांडली तरी अपूरी भासावी

रोज नव्याने क्षण सारे रंगावे बेधूंद होवून जगावे 
आयुष्याच्या वळणावर मैत्रीने रोज नव्याने बहरावे
- शब्दवर्षा ( वर्षा )

Group content visibility: 
Public - accessible to all site users