कोविड अनुभव तसे पहिले तर आता लोकांना नवीन नाहीये तरीही मी हे लिहिण्याचं कारण कि कोणाला थोडासा तरी फायदा होऊ शकेल.
तारीख १२ मार्च , माझ्या मुलाचा वाढदिवस. पुरणपोळीचा प्लॅन चालू होता आणि फोन खणखणला कि तडक हॉस्पिटल मध्ये या. माझ्या सासर्यांना वेगळ्या कारणासाठी ऍडमिट केले होते तिकडून फोन होता. आम्ही ब्रेकफास्ट चा घास तसाच ठेवला आणि हॉस्पिटल ला गेलो. ICU मधले डॉ म्हणाले कि त्यांना covid डिटेक्ट झालाय आणि इकडून शिफ्ट करावे लागेल. आमच्या पायाखालची जमीनच सरकली. मेव्हणी आणि मेव्हण्याला फोन केला. ते पण आले. डॉ ची चर्चा केली ते म्हणाले आम्ही चौकशी करतो कुठे जागा मिळेल तशी. कुठे मिळत नव्हते शेवटी एका हॉस्पिटल मध्ये जागा आहे म्हणाले. आम्ही लगेच होकार दिला आणि पुढचा बॉम्ब पडला कि घरातल्या सगळ्यांना टेस्ट कराव्या लागतील. म्हटलं आधी ह्यांना ऍडमिट करू मग ठरवू. ऍम्ब्युलन्स वाला म्हणाला एक जण पुढे जा. मी तातडीने पुढे गेलो , ५ मिनिट मध्ये ऍम्ब्युलन्स आली. तिकडे ते म्हणाले फाईल दाखवा, पण ती माझ्या मेव्हण्याकडे होती, तो येई पर्यंत ऍम्ब्युलन्स तिकडेच बाहेर. ते आले आणि आम्ही तडक आत गेलो. तिथले डॉक म्हणाले कि सॉरी इकडे जागा नाहीये तुम्ही घेऊन जा दुसरी कडे. आम्ही म्हणालो अहो , हॉस्पिटल मधून ऑलरेडी बुक केले आहे तरीही ते ऐकायला तयार नव्हते. सासरे तसेच बाहेर ऍम्ब्युलन्स मध्ये आम्ही पण हवालदिल . पोटात काही नाही, पाणी पण नव्हतो प्यायलो. शेवटी बरीच फोना फोनी करून झाल्यावर ते तयार झाले. सासर्यांना आम्ही अजून कल्पना दिली नव्हती. आता बेसिक टेस्ट झाल्यावर त्यांना आत नेतांना आम्ही कल्पना दिली. त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं आणि त्यांना आत घेऊन गेले. आम्हाला सांगितले कि आत कोणाला जाता येणार नाही, तुम्ही तासभर थांबा बाहेर, औषध लागली तर द्यायला. आमची अवस्था खूपच भयंकर झालेली बायको आणि मेव्हणी एकदम टेन्शन मध्ये होत्या. शेवटी आम्ही पाण्याची बाटली घेतली, बिसकटस खाल्ले, नारळपाणी प्यायलो. २ तासांनी तिकडून निघालो.
आता कोविड टेस्ट साठी कोणी मिळेना घरी येणारे कारण ३ वाजून गेले होते. शेवटी कसाबसा एक जण तयार झाला आणि आमचा स्वाब घेऊन गेला. माझ्या मुलाला मी माझ्या घरी आई बाबांबरोबर ठेवले. आम्ही बाकीचे दुसऱ्या एका घरी थांबलो. ती रात्र कशीबशी काढली , दुपारनंतर रिपोर्ट आले . मी , बायको, आणि मेव्हणी पॉसिटीव्ह. सासूबाई, मेव्हणा , त्यांची मुलं निगेटिव्ह . एकदम काय करावे कळेना झाले. ५ वाजून गेले होते, संध्याकाळ झालेली. ३-४ ठिकाणी चौकशी केली पण कुठलीच OPD चालू नव्हती. शेवटी कर्वेनगर मध्ये एक डॉक मिळाले, तिकडे गेलो . तिथे लगेच xray काढण्यात आला , डॉक्टरांनी चेक केलं . काळजीचं कारण नाही म्हणाले, पण १७ दिवस घरीच थांबा असं सांगण्यात आलं. आता आई बाबा आणि मुलाच्या टेस्ट केल्या. तो रिपोर्ट आला रविवारी आणि धक्का बसला ते तिघेही पॉसिटीव्ह निघाले. आता आम्ही ठरवले कि मुलाला इकडे घेऊन यायचं आणि मी आई बाबांबरोबर थांबायचं . दुसऱ्या दिवशी आई बाबांना घेऊन परत त्याच डॉ कडे गेलो. त्यांना पण तसेच सांगितले आणि घरीच राह्यला सांगितले. गोळ्या आणणे, जेवणाचं बघणे ह्यात तो दिवस खूप हेक्टिक गेला . मित्राने जेवण आणि बऱ्याच गोष्टी आणून दिल्या., जेवणाचा डबा लावला . २-३ दिवस बहिणीने पण डबा दिला. बहिणीच्या टेस्ट निगेटिव्ह आल्या हे बरं झालं. त्यानंतर २ दिवस सलग ताप , डॉक म्हणाले जर थांबला नाही तर स्टिरिओईड चे इंजेकशन दयावे लागतील पण त्यासाठी ऍडमिट व्हायला लागेल. पण नशिबाने ताप आला नाही परत आणि मी पण विश्रांती घेतली . रोज मॉनिटरिंग चालूच होतं . तिकडे हॉस्पिटल मध्ये सासऱ्यांची खूपच नीट काळजी घेतली जात होती. आणि सगळं फोन वरून मॅनेज होत होतं . मुलाशी विडिओ कॉल होत होता. सोसायटी मध्ये कळवले तसे सगळ्यांनी सांगितले काहीही लागलं तर कळवा . मित्र तर कायम कॉन्टॅक्ट मध्ये होते.
अचानक एक दिवस बाबांना चक्कर यायला लागली , जेवण पण एकदम कमी जायला लागलं. oxygen ९२, ९१ दाखवायला लागला. डॉक ना फोन केला , ते म्हणाले तडक ऍडमिट व्हायला लागेल. मी गाडी चालवत गेलो आणि ऍडमिट केले आणि त्यांना ट्रीटमेंट चालू झाली.
आज दोन्ही बाबांना (माझे बाबा आणि सासरे ) ह्यांना discharge मिळाला. मित्र, आप्तेष्ट , डॉक्टर आणि देवाच्या कृपेने आम्ही ह्या परिस्थिति मधून बाहेर पडलो.
काही खास अनुभव आणि observations :
१. पहिली गोष्ट म्हणजे पॅनिक व्हायचे नाही, घरातल्या कितीही जणांचे रिपोर्ट पॉसिटीव्ह आले तरी
२. xray जरी काढला तरी २-३ दिवसात CTScan करावा
३. फॅबिफ्लू हि गोळी लगेच चालू करायला हवी. अर्थात डॉक च्या सल्ल्याने. पण मला वाटते सगळ्यांनी घ्यावी
४. कोणी कितीही काहीही म्हटले तरी ऑक्सिमीटर हवेच आणि दिवसातून २-३ वेळा चेक करावे . बाबांची तब्येत त्यातूनच कळली आणि वेळीच उपचार मिळाले
५. एक रिपोर्ट शीट तयार करावे आणि रोजचे temperature आणि oxygen तसेच symptoms लिहावीत.
६. दिवसातून ३ वेळा वाफारा घ्यावा.
७. गरम पाणी पित राहावे.
८. दोन वेळा तरी गुळण्या कराव्यात . झोपताना दूध हळद घ्यावे .
९. फळं भरपूर खावीत
१०. आराम भरपूर करावा
११. Remdisivir औषध हे नक्कीच वरदान आहे. माझ्या बाबांना आणि सासर्यांना ह्याचा ५ दिवसाचा कोर्स दिला त्याचा फायदा नक्कीच झाला.
१२. सगळ्यात महत्वाचे म्हणजे पॉसिटीव्ह थिंकिंग करावे आणि डॉक्टर वर पूर्ण विश्वास ठेवावा.
१३. एकूण लक्षात आले कि माणुसकी अजून नक्कीच आहे. सगळ्यात भारी वाटले जेंव्हा आमच्या बिल्डिंग मधल्या ७० वर्षाच्या आजींनी फोन करून तब्येतीची चौकशी केली आणि विचारले कि बाहेरून काहीही आणून द्यायचे असल्यास नक्की सांग. 
कोणाला कसलीही मदत, ईन्फो हवी असल्यास नक्की संपर्क करा, जमेल तशी नक्कीच मदत करेन. आपल्या माबोकर सिद्धी आणि कुमार ह्यांचे विशेष आभार
पुणे किंवा कोथरूड मध्ये राहत असल्यास काही महत्वाचे संपर्क देत आहेत. उपयोगी पडू शकेल
कोवीड टेस्ट (घरपोच) - संतोष पाटील (मेट्रोपोलीस ) - 8668783402
होम आणि कार सानेटीझशन - सुरेश गायकवाड (Urban) - 9049288481
सॅनेटरी इन्स्पेक्टर - 9850841727
डबा (घरपोच) गोंगळे - 9890856018
देवकीताई, तुमच्या प्रश्नाचे
देवकीताई, तुमच्या प्रश्नाचे उत्तर धागामालक देतील, पण माझया लक्षात आलेले सांगते. टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर, रुग्ण गंभीर नसेल तर घरी किंवा quarantine सेन्टर मध्ये विलगिकरणात रहायला हवे. तरी समजा काही कारणाने बाहेर जायचेच असेल तर मास्क लावून स्वतःच्या गाडीने किंवा अंबुलन्स मधून जायला हवे. पण होते काय बरेचदा रुग्ण स्वतः गाडी चालवायच्या अवस्थेत नसतो, स्वतःची गाडी नसते किंचा ती चालवायला दुसरे कोणी नसते. सरकारी अम्ब्युलन्स पण मिळत नसेल तर काय करणार? ईलाज नसतो हे एक झाले. दुसरे म्हणजे अम्ब्युलन्स असते पण त्यांचे भाडे भरपूर असते. मी जेव्हा पॉझिटिव्ह होते तेव्हा सिटी स्कॅन साठी अम्ब्युलन्स हॉस्पिटलची आली होती. माझ्या घरापासून हे हॉस्पिटल चालत सहा ते सात मिनिटांच्या अंतरावर आहे , अम्ब्युलन्स साठी ओम्नी गाडी होती, त्यात काही सोय नव्हती, तरीही त्यांनी मला २५००/- रुपये चार्ज केले. तेच जर रिक्षा केली असती तर साधे पन्नास रुपये लागले नसते. मग कशाला एवढा खर्च असा विचार करणारे बरेच आहेत. त्यात जर सिम्प्टम्स नसताना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला असेल तर अजून विश्वास बसत नाही अन खर्च करावा वाटत नाही असे वाटणारे पण आहेत. काय योग्य अन काय अयोग्य प्रत्येकाची परिस्थिती अन व्यक्ती नुसार व्याख्या बदलते.
स्वतावरून सांगते, मला काहीही त्रास नव्हता, टेस्ट केली नसती तर कळले सुदधा नसते. मी घरीच राहणार होते. घरची गाडी होती पण चालवणार कोण? मला चालवता येत नाही, नवरा बाळासोबत घरी तर भाऊ दुसऱ्या घरी विलगिकरणात. दुसऱ्या कोणाची मदत घ्यावी वाटली नाही, चालत जावे तर डिलिव्हरी नंतर पहिल्यांदा बाहेर पडणार होते, ते सहा सात मिनिटे चालणे अशक्तपणा मुळे झेपेल की नाही, अन रस्त्यात कोणी ओळखीचे भेटले तर कसे टाळू, मन जरी मान्य करत नसले तरी रिपोर्ट सांगत होते की मला कोरोना झालाय अन मला तो माझ्याकडून कोणा दुसऱ्याला द्यायचा नव्हता. म्हणून २५००/- खर्च केले नाहीतर त्यावेळी इतर खर्च खूप होते, मम्मी पप्पा दोघांना प्रत्येकी दीड लाखाचे package सांगितले होते हॉस्पिटलमध्ये. इतर खर्च वेगळे. तेव्हा अडीच हजार ही रक्कम पण मोठी वाटते. इतके करूनही आपण बिल्डिंगची लिफ्ट / जिना वापरतोच की.
ओहह, सकाळी अर्धा प्रतिसाद
ओहह, सकाळी अर्धा प्रतिसाद टायपून ठेवला होता, आता हा सेव्ह झाल्यावर अमा, बीसी अन देवकीताईचा प्रतिसाद दिसला.
अमा, काळजी घ्या,
देवकीताई, प्रतिसाद पटला नाहीतर सांगा , उडविते☺️
हा खरंच मोठा मुद्दा आहे.
हा खरंच मोठा मुद्दा आहे.
मी तो प्रतिसाद वाचल्या पासून हाच विचार करत होते की स्वतःची गाडी/ड्रायव्हिंग नसेल आणि अॅम्ब्युलन्स नसेल तर तिसरा पर्याय काय?
आता कोव्हिड पॉझिटिव्ह कुटुंबासाठी खास ताजा गरम डबा डिस्पोजेबल डब्यांमध्ये पोहचवणारे बरेच आहेत.
तसेच प्रवासी कोव्हिड पॉझिटिव्ह आहे हे व्यवस्थित सांगून योग्य पीपीई किट घालून वाहनचालकही मिळायला हवेत.हा एक स्पेशल सेवेचा प्रकार आहे आणि अॅम्ब्युलन्स कमी असताना/कुटुंबात २ माणसे/त्यात ड्रायव्हिंग येणारा एकमेव माणूस आजारी/अशक्त किंवा परगावी असे असल्यास.
अमा, तब्येतीची विषेश काळजी
अमा, तब्येतीची विषेश काळजी घ्या. बहुधा पॉझिटिव्ह असताना दुसर्या गंभीर आजाराच्या आठवडी ट्रिटमेंट डॉ २ आठवडे तरी रद्द करतील (त्यात काही तीव्र औषधे/कोव्हिड औषधांना परस्पर विरोधी काही असेल या भितीने.)
मला वाटते ब्लॅककॅट यांनी
मला वाटते ब्लॅककॅट यांनी प्रतिसाद चांगला हेतूने दिला आहे पण त्यांच्या विनोदनिर्मितीच्या स्वभावामुळे लिखाणाचा टोन वेगळा भासतो आहे. हेमावैम
आमचे पूर्ण ओपीडी सेंटर फक्त
आमचे पूर्ण ओपीडी सेंटर फक्त n95 मास्क वापरून 10 लोक चालवत आहोत, गेल्या वर्षात 6 लोकांना कोविड होऊन गेला.
कोविड वॊर्ड वगळता , इतर सर्वत्र पीपीई किट घालून कुणीही बसत नाही , सगळ्या हॉस्पिटलात हौसेने बसवलेले सॅनिटायझर दिस्पेन्सर , जास्ती बसवलेले वॉश बेसिन कधीच मोडून पडले आहेत.
खाजगी डॉकटर , केमिस्ट , इतर सेवा देणारे यानाही ते परवडणार नाही , रिक्षा वाले अन ओलावाले ह्यांनाही पीपीई किट वापरून व्यवसाय करणे अन त्यांना तितके पैसे देणे जनतेलाही परवडणार नाही , स्पेशल एमबुलन्स सुरुवातीला हौसेने चालवल्या असतील , पण त्यांची संख्या पुरेशी नाही,
इमर्जन्सी सर्व्हिसवाळ्याना आपल्याला रिस्क जास्त आहे , ह्याची कल्पना असते , त्यामुळे आपले क्लाएंट इन्फेक्शन देऊ शकतात ह्याची कल्पना असते, त्यावर कोणताही उपाय नाही
रिपोर्ट सांगत होते की मला
रिपोर्ट सांगत होते की मला कोरोना झालाय अन मला तो माझ्याकडून कोणा दुसऱ्याला द्यायचा नव्हता. >>> ती शंका विचारताना अगदी हेच माझ्याही मनात होते.
व्हीबी धन्यवाद! तुझा प्रतिसाद तसाच ठेव.इतर कोणालाही,गरज पडू नये पण उपयोगी आहे.
म्हणून योगेश यांनी, एक्स रे काढायच्यावेळी काय केले असे विचारले होते.याला वेगळी वळणे लागली.
प्रणवंत,
आधी मीही कॅज्युअली घेतले.पण ते हवेत उडणे/भिंत चालवणे इ.डोक्यात गेले.यातली जी काय विनोदनिर्मिती असेल ती ज्याची त्याला लखलाभ!
असो हा धागा योगेश आणि कुटुंब करोनाला कसे सामोरे जाऊन सुखरुप बाहेर पडले याविषयी आहे,त्यामुळे इथेच थांबते.
(अती अवातरः मागच्या लॉकडाऊन
(अती अवातरः मागच्या लॉकडाऊन मध्ये सलून बंद चा फतवा निघेपर्यंत आणि सलून परत चालू झाल्यावर आमचा सलूनवाला पीपीई किट )किंवा त्यासारखा दिसणारा प्लास्टिक ओव्हर ऑल ) घालून दुकान चालवत होता.यावर माझ्या मैत्रिणींनी 'पण तो डॉक्टर लोकांसारखा रोज पीपीई किट बदलतो का' अशी शंका काढली. यावरुन मला ते सिरॅमिक चा गड्डू लागणारे ओल्ड जेन वॉटर वॉटर आठवले. त्याची सिरॅमिक कँडल न बदलल्यास तो आजारांना निमंत्रण वगैरे ऐकलेले असायचे.) पण त्या सलून वाल्याला स्वतःला संरक्षण म्हणून पीपीई किट ची नक्कल असलेला साधा गाऊन पण बहुतेक मदतीचा वाटत असेल. त्याच्याकडे गिर्हाईके कमी, पण येत होती.
आता असे कळते आहे की डॉक्टर लोकांना उकाड्यात पीपीई किट चा प्रचंड उपद्रव होतो आहे. एका विद्यार्थ्याने एसी बसवलेला किट पण शोधला.
पण परवडायलाही हवे .
उशिरा प्रतिसादाबद्दल क्षमस्व.
उशिरा प्रतिसादाबद्दल क्षमस्व. देवकी मी स्वतः गाडी चालवत गेलेलो कारण ऑपशन नव्हता. पण मी अजून एका डॉक ची ट्रीटमेंट घेतली, त्यांनी ऑनलाइन सगळी ट्रीटमेंट दिली. नंतर कळले की क्स रे काढायला।बाहेर जावं लागत नाही Ph diganostics etc. घरी क्स रे काढतात. पण ct स्कॅन ला जावं लागतं.
अमा काळजी घ्या. Ct स्कॅन
अमा काळजी घ्या. Ct स्कॅन आधीच्या डॉक ने नव्हता सांगीतला पण मी दुसऱ्या डॉक ची ट्रीटमेंट घेतली त्यांनी सांगितलं. माझ्या मते 2-3 दिवशी काढून घ्यावा म्हणजे lung इन्फेकॅशन कळते.
अजून एक माहिती- ct स्कॅन चा रिपोर्ट मध्ये value असते 25 पैकी. ती जितकी कमी तितकी infection कमी.उदाहरणार्थ - 5/25 हे म्हणजे mild, 16/25 खूप जास्त.
अजून काही मदत किंवा माहिती हवी असल्यास व्या नि करा.
सगळे बरे झालात वाचून बरे
सगळे बरे झालात वाचून बरे वाटले योगेश ! तरीही काळजी घ्या.
डबा (घरपोच) गोंगळे - 9890856018>>>>>>>>>>>>> सांगायला आनंद होतो की माझा काका आहे संजय गोंगले. त्यांची सहवास मधे डबे सर्विस गेली अनेक वर्ष चालू आहे.
सिद्धीजी, तुमच्या मदतीबद्दल
सिद्धीजी, तुमच्या मदतीबद्दल आणि माहिती बद्दल आभारी आहे. मुलगा एकदम निवांत, 17 दिवस पण तो फुल्ल दंगा मूड मध्ये. ☺️
अॅम्ब्युलन्सवाल्याला कोव्हिड
अॅम्ब्युलन्सवाल्याला कोव्हिड पेशंट आहे सांगितले तर पैसे जास्त मागितले आणि घेतले. पण त्यातल्या कोणीही पी पी ई किट घातले नव्हते. पेशंटला स्ट्रेचरवरून वर आणणेही आले यात.
ब्लॅक कॅट यांनी गेल्या वर्षी पी पी ई किट मुळे त्यांच्या हातांवर आलेल्या वळांचे फोटो इथे टाकले होते.
योगेश, सगळे बरे झालात वाचून
योगेश, सगळे बरे झालात वाचून बरे वाटले.
ब्लॅककॅट कधी वेळ व तुम्हाला चालत असल्यास तुमचे अनुभव लिहा या सर्व काळातले.
धागा वाचतेय पण लिहायला वेळ
धागा वाचतेय पण लिहायला वेळ नाही मिळाला.
मामाच्या घरात लहान मुलांपासून सगळे पॉझिटिव्ह निघाले. त्यांचे डॉक्टर स्वतः क्वारंटाईन झालेले होते. पण त्यांनी माणूस पाठवून घरपोच औषधे पाठवली. मामाचीही अँजिओप्लास्टी झालेली आहे. पण औषधे आणि संगितलेला आहार यामुळे आजी सोडून सगळे बरे झाले. आजीला न्युमोनिया झाला होता त्यामुळे आधीच श्वास घ्यायला त्रास होत होता. आताचा कोविड फुप्फुसात गेल्याने औषधोपचारांनी आटोक्यात आला नाही. अॅडमिट करण्यासाठी बेड शोधण्यात धावपळ झाली. शिवाजीनगर इथे एका मोठ्या हॉस्पिटलमधे अॅडमिट केले आहे. पण...
तिथे रूम मिळेपर्यंत आयसीयूत ठेवतात. त्यांचे कॉमन टॉयलेट आहे. ते साफ करायला स्टाफ नाही. कोविड वॉर्डात काम करायला माणसं मिळत नाहीत. संसर्गाची भीती आहे. फुप्फुसात इन्फेक्शन आणि आधीची हिस्ट्री असल्याने डिस्चार्जही देत नाहीत. नाहीतर घरीच ऑक्सिजन सिलींडर लावायच्या विचार होता.
बेड मिळवताना फारसा विचार केला जात नाही. पण या गोष्टी लक्षात असू द्या. ज्यांना भविष्यात गरज पडेल त्यांनी डॉक्टरांशी घरीच ऑक्सिजन लावून ट्रीटमेण्ट होईल का हे विचारावे. नाहीतर हॉस्पिटलमधे भीडभाड न ठेवता स्वच्छतेबाबत प्रश्न विचारावेत.
Pages