कोविड अनुभव

Submitted by mabopremiyogesh on 29 March, 2021 - 10:16

कोविड अनुभव तसे पहिले तर आता लोकांना नवीन नाहीये तरीही मी हे लिहिण्याचं कारण कि कोणाला थोडासा तरी फायदा होऊ शकेल.

तारीख १२ मार्च , माझ्या मुलाचा वाढदिवस. पुरणपोळीचा प्लॅन चालू होता आणि फोन खणखणला कि तडक हॉस्पिटल मध्ये या. माझ्या सासर्यांना वेगळ्या कारणासाठी ऍडमिट केले होते तिकडून फोन होता. आम्ही ब्रेकफास्ट चा घास तसाच ठेवला आणि हॉस्पिटल ला गेलो. ICU मधले डॉ म्हणाले कि त्यांना covid डिटेक्ट झालाय आणि इकडून शिफ्ट करावे लागेल. आमच्या पायाखालची जमीनच सरकली. मेव्हणी आणि मेव्हण्याला फोन केला. ते पण आले. डॉ ची चर्चा केली ते म्हणाले आम्ही चौकशी करतो कुठे जागा मिळेल तशी. कुठे मिळत नव्हते शेवटी एका हॉस्पिटल मध्ये जागा आहे म्हणाले. आम्ही लगेच होकार दिला आणि पुढचा बॉम्ब पडला कि घरातल्या सगळ्यांना टेस्ट कराव्या लागतील. म्हटलं आधी ह्यांना ऍडमिट करू मग ठरवू. ऍम्ब्युलन्स वाला म्हणाला एक जण पुढे जा. मी तातडीने पुढे गेलो , ५ मिनिट मध्ये ऍम्ब्युलन्स आली. तिकडे ते म्हणाले फाईल दाखवा, पण ती माझ्या मेव्हण्याकडे होती, तो येई पर्यंत ऍम्ब्युलन्स तिकडेच बाहेर. ते आले आणि आम्ही तडक आत गेलो. तिथले डॉक म्हणाले कि सॉरी इकडे जागा नाहीये तुम्ही घेऊन जा दुसरी कडे. आम्ही म्हणालो अहो , हॉस्पिटल मधून ऑलरेडी बुक केले आहे तरीही ते ऐकायला तयार नव्हते. सासरे तसेच बाहेर ऍम्ब्युलन्स मध्ये आम्ही पण हवालदिल . पोटात काही नाही, पाणी पण नव्हतो प्यायलो. शेवटी बरीच फोना फोनी करून झाल्यावर ते तयार झाले. सासर्यांना आम्ही अजून कल्पना दिली नव्हती. आता बेसिक टेस्ट झाल्यावर त्यांना आत नेतांना आम्ही कल्पना दिली. त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं आणि त्यांना आत घेऊन गेले. आम्हाला सांगितले कि आत कोणाला जाता येणार नाही, तुम्ही तासभर थांबा बाहेर, औषध लागली तर द्यायला. आमची अवस्था खूपच भयंकर झालेली बायको आणि मेव्हणी एकदम टेन्शन मध्ये होत्या. शेवटी आम्ही पाण्याची बाटली घेतली, बिसकटस खाल्ले, नारळपाणी प्यायलो. २ तासांनी तिकडून निघालो.
आता कोविड टेस्ट साठी कोणी मिळेना घरी येणारे कारण ३ वाजून गेले होते. शेवटी कसाबसा एक जण तयार झाला आणि आमचा स्वाब घेऊन गेला. माझ्या मुलाला मी माझ्या घरी आई बाबांबरोबर ठेवले. आम्ही बाकीचे दुसऱ्या एका घरी थांबलो. ती रात्र कशीबशी काढली , दुपारनंतर रिपोर्ट आले . मी , बायको, आणि मेव्हणी पॉसिटीव्ह. सासूबाई, मेव्हणा , त्यांची मुलं निगेटिव्ह . एकदम काय करावे कळेना झाले. ५ वाजून गेले होते, संध्याकाळ झालेली. ३-४ ठिकाणी चौकशी केली पण कुठलीच OPD चालू नव्हती. शेवटी कर्वेनगर मध्ये एक डॉक मिळाले, तिकडे गेलो . तिथे लगेच xray काढण्यात आला , डॉक्टरांनी चेक केलं . काळजीचं कारण नाही म्हणाले, पण १७ दिवस घरीच थांबा असं सांगण्यात आलं. आता आई बाबा आणि मुलाच्या टेस्ट केल्या. तो रिपोर्ट आला रविवारी आणि धक्का बसला ते तिघेही पॉसिटीव्ह निघाले. आता आम्ही ठरवले कि मुलाला इकडे घेऊन यायचं आणि मी आई बाबांबरोबर थांबायचं . दुसऱ्या दिवशी आई बाबांना घेऊन परत त्याच डॉ कडे गेलो. त्यांना पण तसेच सांगितले आणि घरीच राह्यला सांगितले. गोळ्या आणणे, जेवणाचं बघणे ह्यात तो दिवस खूप हेक्टिक गेला . मित्राने जेवण आणि बऱ्याच गोष्टी आणून दिल्या., जेवणाचा डबा लावला . २-३ दिवस बहिणीने पण डबा दिला. बहिणीच्या टेस्ट निगेटिव्ह आल्या हे बरं झालं. त्यानंतर २ दिवस सलग ताप , डॉक म्हणाले जर थांबला नाही तर स्टिरिओईड चे इंजेकशन दयावे लागतील पण त्यासाठी ऍडमिट व्हायला लागेल. पण नशिबाने ताप आला नाही परत आणि मी पण विश्रांती घेतली . रोज मॉनिटरिंग चालूच होतं . तिकडे हॉस्पिटल मध्ये सासऱ्यांची खूपच नीट काळजी घेतली जात होती. आणि सगळं फोन वरून मॅनेज होत होतं . मुलाशी विडिओ कॉल होत होता. सोसायटी मध्ये कळवले तसे सगळ्यांनी सांगितले काहीही लागलं तर कळवा . मित्र तर कायम कॉन्टॅक्ट मध्ये होते.
अचानक एक दिवस बाबांना चक्कर यायला लागली , जेवण पण एकदम कमी जायला लागलं. oxygen ९२, ९१ दाखवायला लागला. डॉक ना फोन केला , ते म्हणाले तडक ऍडमिट व्हायला लागेल. मी गाडी चालवत गेलो आणि ऍडमिट केले आणि त्यांना ट्रीटमेंट चालू झाली.
आज दोन्ही बाबांना (माझे बाबा आणि सासरे ) ह्यांना discharge मिळाला. मित्र, आप्तेष्ट , डॉक्टर आणि देवाच्या कृपेने आम्ही ह्या परिस्थिति मधून बाहेर पडलो.

काही खास अनुभव आणि observations :
१. पहिली गोष्ट म्हणजे पॅनिक व्हायचे नाही, घरातल्या कितीही जणांचे रिपोर्ट पॉसिटीव्ह आले तरी
२. xray जरी काढला तरी २-३ दिवसात CTScan करावा
३. फॅबिफ्लू हि गोळी लगेच चालू करायला हवी. अर्थात डॉक च्या सल्ल्याने. पण मला वाटते सगळ्यांनी घ्यावी
४. कोणी कितीही काहीही म्हटले तरी ऑक्सिमीटर हवेच आणि दिवसातून २-३ वेळा चेक करावे . बाबांची तब्येत त्यातूनच कळली आणि वेळीच उपचार मिळाले
५. एक रिपोर्ट शीट तयार करावे आणि रोजचे temperature आणि oxygen तसेच symptoms लिहावीत.
६. दिवसातून ३ वेळा वाफारा घ्यावा.
७. गरम पाणी पित राहावे.
८. दोन वेळा तरी गुळण्या कराव्यात . झोपताना दूध हळद घ्यावे .
९. फळं भरपूर खावीत
१०. आराम भरपूर करावा
११. Remdisivir औषध हे नक्कीच वरदान आहे. माझ्या बाबांना आणि सासर्यांना ह्याचा ५ दिवसाचा कोर्स दिला त्याचा फायदा नक्कीच झाला.
१२. सगळ्यात महत्वाचे म्हणजे पॉसिटीव्ह थिंकिंग करावे आणि डॉक्टर वर पूर्ण विश्वास ठेवावा.
१३. एकूण लक्षात आले कि माणुसकी अजून नक्कीच आहे. सगळ्यात भारी वाटले जेंव्हा आमच्या बिल्डिंग मधल्या ७० वर्षाच्या आजींनी फोन करून तब्येतीची चौकशी केली आणि विचारले कि बाहेरून काहीही आणून द्यायचे असल्यास नक्की सांग. Happy

कोणाला कसलीही मदत, ईन्फो हवी असल्यास नक्की संपर्क करा, जमेल तशी नक्कीच मदत करेन. आपल्या माबोकर सिद्धी आणि कुमार ह्यांचे विशेष आभार

पुणे किंवा कोथरूड मध्ये राहत असल्यास काही महत्वाचे संपर्क देत आहेत. उपयोगी पडू शकेल

कोवीड टेस्ट (घरपोच) - संतोष पाटील (मेट्रोपोलीस ) - 8668783402
होम आणि कार सानेटीझशन - सुरेश गायकवाड (Urban) - 9049288481
सॅनेटरी इन्स्पेक्टर - 9850841727
डबा (घरपोच) गोंगळे - 9890856018

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Ct scan कोव्हिड झाल्याचे समजल्यावर किती दिवसांनी केलात?डॉ नि सांगितले की तुम्ही स्वतःहून केलात?

मी काल तुम्हाला शुभेच्छा प्रतिसाद लिहिला तेव्हाच वाटलेलं मला की मी पोझीटीव्ह निघणार आहे. काल रात्री साडे बाराला रिपोर्ट आला.
mr ना चव, वास अजिबात येत नाही म्हणून जाऊन सगळ्यांचे टेस्ट केले होते. त्यांना ही मागच्या आठवड्यात कणकण येऊन गेली होती. पण 2,4 क्रॉसिन वर गेली. मला ताप बराच होता पण डॉ म्हणले लगेच टेस्ट नको करायला आणि 3 दिवसाची औषधे दिली होती. टेस्ट केली तेव्हा मुलाला काहीही त्रास नव्हता पण सकाळी उठलाय ते कणकण आलीय, घसा दुखतोय करत.

वर्णिता, जरी तुम्ही योगेश यांना विचारले तरी मी आमच्या अनुभवावरून सांगते. HRCT टेस्ट करून घ्या, मोस्टली डॉक ती करायला सांगतीलच. त्यात लंग इन्फेक्शन कळते. कोव्हीड बरा जरी झाला तरी लंग इन्फेक्शन बरा व्हायला वेळ लागतो.

वर्णिता, हो दोन्ही एकच. अन ही टेस्ट रिपोर्ट आल्यावर लगेच करावी अन इन्फेक्शन १०% पेक्षा जास्त असेल तर रिकव्हरी नंतर १५ दिवसांनी परत एकदा करावी असे डॉक ने आम्हाला सांगितले. तुम्हाला अन कुटुंबातील सर्वांना खूप शुभेच्छा लवकर बरे होण्यासाठी.

योगेश एक विचित्र वाटले तरी प्रश्न विचारते.तुम्ही पॉझिटिव असताना>>>शेवटी कर्वेनगर मध्ये एक डॉक मिळाले, तिकडे गेलो . तिथे लगेच xray काढण्यात आला , << हे कसे काय केलेत्?कारण पॉझिटिव्ह असताना विलगीकरण असते ना?अ‍ॅम्ब्युलंस लागली का?
एक प्रामाणिक शंका आली म्हणून विचारते.कृ गै न.

कालच विचार करत होते, विचारपूस करावी.
सगळे ठिक आहात, हे वाचून बरं वाटलं.

अनुभव इथे शेअर केलात ते बरं केल. लोक आपल्याला कोरोना झाला, या फक्त विचारानेच घाबरून जातात. जणू काही आपल्या हातुन एखाद्या अपराध घडला आहे. माबो प्रमाणे इतर साईटवर ही हे लेखन पोस्ट करा. मनोबल वाढवण्यासाठी अशा सकारात्मक विचारांची सध्या खुप गरज आहे. कोरोना विषयी अनुभव सांगीतला पाहिजे, जनजागृती केली पाहिजे, समज आणि गैरसमज दुर झाले की मग भीती आपोआप कमी होईल आणि रिकव्हरी चे प्रमाण वाढेल.

तुमचा लहान मुलगा कसा आहे आता ?

हॉस्पिटलात कधीही जाऊ शकता.,..... ..पण तिथे जाताना ओला उबरच्या ड्रायव्हरला प्रसाद का द्यायचा?

आमच्या ओळखीच्या एक बाई,पॉझिटिव्ह झाल्यावर दादर ते रिलायन्स हॉस्पिटल टॅक्सीने गेल्या होत्या.त्यामुळे पडलेला प्रश्न आहे.

रच्याकने,मी positive नाहीय.प्रा. शंका विचारली.

ही टेस्ट रिपोर्ट आल्यावर लगेच करावी >> केली माझी. तो रिपोर्ट घेऊनच डॉ कडे गेले. औषधे चालू झालीत माझी आणि मुलाची सेमच आहेत. मुलाची परत 4 दिवसांनी swab टेस्ट करायला सांगितलंय. मिरज सिव्हिल हॉस्पिटल चा खूप चांगला अनुभव आला. त्यांनी घरीच विलगिकरणात राहणार म्हणून एक फॉर्म भरून घेतला.

तुमचा अनुभव वाचला. सर्व पिढ्यांचे लोक प्रभावित झाले कि काय होउ शकते ते कळले. पन तुम्ही सर्व आता सुखरूप आहात हे ग्रेट. देवाची कृपा.
मला पण सोम्वारी संध्याकाळी ताप घशात खवखव. वास संवेदना आहे. वर्श अखेर म्हणून दोन दिवस गोळ्या घेउन मास्क घालून काम केले. आज पासून रजा घेतली आहे. व संध्याकाळी टेस्ट करून घेइन. पॉझिटिव्ह झालेअसले तर घरीच. आमच्या इथे फार काळजी घेतात तरीही लोक पॉझिटिव्ह सापडत च आहेत. कोव्हीड झाले असताना इतर आजार कसे मॅनेज करायचे हा पण एक धागा हवा. मला महिन्यातोन एकदा घाटकोपर ला ट्रीटमेंट ला जावे लागते आता पॉझिट्व्ह झाल्यास ते पोस्ट पोन करावे लागेल ते जास्त डेंजरस वाट्ते. बघू काय होते.

अजून ऑक्सि जन ओके आहे. ९५ च्या वर.

घरातून हॉस्पिटलात जाणार तर ती गरज आहे , जो कुणी द्रायव्हर असेल तो रिस्क मध्ये होणारच , एकट्याने उडत जायला आपल्याला भिंत चालवण्याची कला अवगत नाही

द्रायव्हरने मास्क घातला आहे का पहावे , एसी पेक्षा खिडकी उघड्या गाडीतून जावे , साबण , सॅनिटायझर वापरावे

सरकारी एम्बलन्सचा पुरवठा पुरेसा नाही

बीसी, तुमचा काय प्रॉब्लेम आहे माहित नाही.प्रश्न योगेश यांना विचारला होता.

पॉझिटिव्ह असेल तर बाजारात फिरू नका, ....द्रायव्हर असेल तो रिस्क मध्ये होणारच , एकट्याने उडत जायला आपल्याला भिंत चालवण्याची कला अवगत नाही तुम्ही असली भिकार विधाने करत आहात.

Pages