श्रीमंत होण्यासाठी

Submitted by केअशु on 22 March, 2021 - 23:00

भरपूर पैसे मिळवावेत असे कोणाला वाटणार नाही? बहुतांश लोकांना तसे वाटते तरी किंवा भोवतालची परिस्थिती तरी त्यासाठी प्रयत्न करायला भाग पाडते. भारत हा अफाट लोकसंख्या असलेला देश आहे. साहजिकच इथे संघर्ष खूप आहे, भ्रष्टाचारसुद्धा बराच आहे. शिवाय भारतात श्रममूल्य हे पाश्चात्य देशांच्या तुलनेत कमी आहे. अशा परिस्थितीतून प्रयत्न करुन आर्थिक समृद्धी आणण्याचे महत्कार्य पार पाडावे लागते.
थिंक अँड ग्रो रिच हे श्रीमंत कसे व्हावे या विषयावर बरेच गाजलेले पुस्तक विशेषत: अमेरिकन जनता डोळ्यासमोर ठेवून लेखक नेपोलियन हिल यांनी हे पुस्तक लिहिले होते. यालाही साधारण ८४ वर्षे होऊन गेली.

चर्चेचा विषय हाच आहे की भारतासारख्या देशात श्रीमंत होण्यासाठीचे काही ठाशीव नियम असू शकतात का? अर्थात प्रत्येक नियमाला काही अपवाद असतात. ते व्यक्तिपरत्वे थोडे बदलूही शकतात. ते कायम तसेच राहतात असेही नाही. पण अपवादानेच नियम सिद्ध होतात हे ही खरे आहे. ते अपवाद गृहित धरुन श्रीमंत होण्यासाठीचे काही ठराविक नियम असू शकतात का? हेच पहायचे आहे.

आता श्रीमंत कोणाला म्हणावे? तर एका त्रिकोणी कुटूंबाला ज्यातल्या कुटूंबप्रमुखाचे पुण्यासारख्या शहरात, वयाच्या तिशीच्या आत किमान ६० हजार रुपये वैयक्तिक मासिक उत्पन्न असेल तर तो सुद्धा श्रीमंत म्हणायला हरकत नसावी. यात त्याच्याकडे बाईक आहे पण चारचाकी नाही, कसलेही खर्चिक व्यसन नाही असे गृहित धरले आहे. ही झाली किमान मर्यादा. आता याउपर ही मर्यादा कितीही असू शकते. जसे उत्पन्न वाढेल तसतसे चारचाकी किंवा खर्चिक व्यसन किंवा अजून खर्चायला लावणार्‍या बाबी उत्पन्नाच्या प्रमाणात अॅड करायला हरकत नाही.

धाग्याचा उद्देश प्रामुख्याने उपरोल्लिखित किमान कमाईपेक्षा कमी उत्पन्न असणार्‍यांना श्रीमंत होण्यासाठी मार्गदर्शनपर चर्चा हाच असावा. आधीच भरपूर कमवणार्‍यांना अजून कसे कमवता येईल यासाठी हा धागा नाही. _/\_

विषयानुषंगाने काही प्रश्न की जेणेकरुन चर्चेला दिशा मिळेल.

१) नशीब हा फॅक्टर श्रीमंतीसाठी किती महत्वाचा आहे?

२) मराठी लोक व्यापारात फारशी जोखीम घेत नसल्याने त्यांना पंगुसिंमा (पंजाबी, गुजराती, सिंधी, मारवाडी) इतके यश व्यापारात मिळत नाही असे म्हटले जाते. पण पंगुसिंमांच्या व्यापाराच्या अशा काही पद्धती किंवा ट्रिक्स असू शकतात का की ज्यामुळेच ते व्यापारात यशस्वी होतात? उदा. एका मारवाडी व्यक्तीने दुसर्‍या मारवाड्याला धंद्यासाठी कर्ज दिले. ते व्याजासहीत वसूल होण्याचा कालावधी हा मराठी माणसाने दुसर्‍या मराठी माणसाला धंद्यासाठी दिलेल्या कर्जवसूलीच्या कालावधीपेक्षा जास्त असू शकतो का? पंगुसिंमा हा तग कसा धरु शकतात? अशाच अजून काही युक्त्या असू शकतात का पंगुसिंमांच्या?

३) शहर जितके मोठे तितकी आर्थिक समृद्धी जास्त असे काही असते का?

४) काही क्षेत्रे अशी आहेत ज्यातील कौशल्यातून चांगले पैसे मिळतात. ते कौशल्य शिकण्यासाठी गुंतवलेल्या पैशाच्या तुलनेत परतावा जास्त आहे. काही मिपाकरांशी चर्चा करुनच ही यादी बनवली आहे. यात अजून काही सुधारणा किंवा वाढ करता येईल का?

१. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात लागणारं कोणतंही कौशल्य
२. कॉम्प्युटर हार्डवेअर इन्स्टॉलेशन,फिक्सिंग
३. सेल्स अँड मार्केटिंग
४. कायिक आरोग्यसेवांतर्गत येणारे कोणतेही कौशल्य
५. गणित, विज्ञान, इंग्रजी हे विषय शिकवता येणे.
६. आर्थिक गुंतवणूकीचे सल्लागार
७. रसायनशास्त्र (कॅटॅलिस्टस्)
८. विद्युत अभियांत्रिकी (कॅप्टीव्ह जनरेशन)
९. लोगो डिझाईनिंग
१०. चारचाकी किंवा जड वाहन सफाईदारपणे चालवता येणे.
११. धार्मिक,अध्यात्मिक सेवा पुरवणे
१२. कार, बाईक दुरुस्ती, स्वच्छता
१३. न्यायिक सेवा (वकील वगैरे)
१४. स्पर्धापरीक्षा उत्तम गुणांनी पास होणे.
१५. वातानुकूलन यंत्र दुरुस्ती,निगा
१६. चेतनकला
१७. स्टँडअप कॉमेडी
----------------------------------------------------------
भरपूर पैसे देणारी+अल्प कालांतराने उत्पादनाची पुनर्निमिती करावी लागणारी उत्पादने आणि भरपूर पैसे देणारे+अल्प कालांतराने पुन्हा सेवा द्यावी लागणारे सेवा उद्योग यांची यादी केली आहे.
यासाठी स्टॅटेस्टीकल डेटा गोळा केलेला नाही.साधारण अंदाज बांधून ही यादी बनवली आहे.त्यामुळे यात उणीवा असण्याची शक्यता असू शकते.माबोवरच्या तज्ञांनी यादी वाढवण्यास/संपादन करण्यास कृपया मदत करावी.

१. शेती

२. गाय/म्हैस/शेळी/मेंढी/खाण्यायोग्य पक्षीपालन

३. स्थानिक अन्नपदार्थ निर्मिती केंद्रे
(हॉटेल,फास्टफूड,रेस्टॉरंट,खानावळ,बेकरी पदार्थ इ.)

४. अन्नपदार्थ विक्री.
(दुग्धजन्य पदार्थ,स्नॅक्स प्रकारातले पदार्थ,लोणची,पापड,चटण्या,आईस्क्रिम इ.)

५. प्राशनयोग्य द्रव पदार्थ
(दूध,दारु,कोल्ड्रिंक्स,दुग्धसमाविष्ट द्रव पदार्थ उदा.चहा,कॉफी इ.)

६. मिनरल वॉटर

७. सौंदर्यप्रसाधने

८. कागद आणि प्लॅस्टीकवरील छपाई

९.राज्य/देश/आंतरराष्ट्रीय स्तरावरील टिव्ही चॅनलसाठी व्हिडिओ शुटींग/व्हिडिओ एडीटींग

१०. पॅकेजिंग उद्योग

११. बँकींग

१२. ड्रायक्लिनिंग

१३. मनोरंजन उद्योग

१४. वाहनांची स्वच्छता/दुरुस्ती

१५. खनिज तेल उद्योग

१६. कारखाने/मोठी हॉटेल्स यांची विद्युतीय देखभाल

१७. वीजनिर्मिती उद्योग

१८. पर्यटन

१९. हॉटेल मॅनेजमेंट

२०. प्लॅस्टीक आणि रबरी वस्तूंची निर्मिती

२१. सलून/ब्युटीपार्लर

२२. रसायन निर्मिती/प्रक्रिया उद्योग

२३. अौषध निर्मिती

२४. अौषध वितरण

२५. आरोग्यसेवा

२६. धार्मिक सेवा

Group content visibility: 
Use group defaults

श्रीमंत कसे व्हायचे या पेक्षा श्रीमंत का व्हायचंय याचा आधी विचार करा. आत्ता मिळत आहे त्या पेक्षा जास्त पैसे मिळाले तर तुमच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे? पैसे आले म्हणे सुखी होऊ असे वाटत असेल तर ते चुकीचे आहे. ह्याचे उत्तर मिळाले तर मग पुढचा विचार करण्यात हशील आहे.

झटपट श्रीमंत व्हायचे असेल तर दुसर्यांना झटपट श्रीमंत करणारा एखादा कोर्स चालू करा. बाकी दुसरे मार्ग खडतर आणि सावकाश आहेत. संयमाची परीक्षा पाहणारे. दुसऱ्याची नोकरी/व्यवसाय नेहमी सोपी वाटते.

श्रीमंत होण्यासाठी मेहनत ही एक च गोश्त करायला हवी असते
नशीब नावाचा जो फैक्टर असतो त्याला अपणाला बदलायचे असते.
फ़क़त आणि फ़क़त मेहनत.
आणि माणसे जोड़ने !
आमचा बिझनेस आहे , त्यातून शिकलेल्या थोड्या फार गोष्टी आहेत त्या च शेअर केल्या.
बाकी सर्व हुशार आहेत च