मराठी साहित्यामध्ये अन्य भाषांचा वापर.

Submitted by वीरु on 22 March, 2021 - 02:21

माझ्यासारखे अनेक मराठी वाचक मराठी वाचनासाठी मायबोली या संकेतस्थळाला भेट देत असतील. आणि मायबोलीवर लिहिणाऱ्या अनेक मान्यवर लेखकांच्या कसदार लिखाणामुळे कधी निराश व्हावे लागत नाही. पण सध्या कथा/ लेखांमध्ये हिंदी इंग्रजी या भाषांचा मोठ्या प्रमाणावर वापर दिसुन आला. कथेची गरज म्हणुन काही प्रसंगी अन्य भाषा वापरणे आणि १० टक्क्याहुन अधीक लिखाण अन्य भाषेत करणे यामध्ये फरक असावा. याबद्दल आपले मत जाणुन घ्यायला आवडेल.
तसेच अन्य भाषेतील लिखाणामध्ये मराठीचा थोडाफार वापर होतो का यावरही जाणकारांनी प्रकाश टाकला तर उत्तम होईल.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

झंपी,
लेखीकेने प्रतिसादात लिहिले होते की अ‍ॅडमिननी आक्षेप घेतला नाही तर पुढील कथा हिंदीत असेल. खरे तर थोडे-फार हिंदी-इंग्रजी शब्द वापरत सहज ओघात केलेले लेखन आणि हिंदी- इंग्रजी वापरायचेच म्हणून केलेले लेखन यातला फरक वाचताना जाणवतो. मी तरीही माबुदो असे म्हणून काही प्रतिक्रिया दिली नव्हती मात्र लेखीकेचा प्रतिसाद आल्यावर मलातरी तो प्रतिसाद आक्रमक वाटला. आता हा देखील माबुदो असे इतर म्हणू शकतातच.

लईच काथ्याकूट लका.
अंग्रेजी मे कहते है के आय लव यू , या गाण्यापासून मोर्चे निघाले नाहीत त्याचे हे परिणाम.
आणि ते विच विच करणारे पंजाबी हिंदीत घुसलेत.

लेखकांनी पण... मान्य आहे ते बडे लेखक आहेत... पण गल्लीबोळातले लेखक असायचे ना पूर्वी त्यांच्यापासून काही शिकावं. कि गल्लीबोळातल्या लेखकांकडे काही घेण्यासारखे नसेल ? उदा पुलं, वपु, कुसुमाग्रज, ग्रेस अशांच्या प्रतिक्रिया कशा असायच्या ते बघा.
ग्रेस आणि जी ए काही बोलायचेच नाहीत. त्याच्या मुळं लोकांना असे छोटे लेखक आवडतात.

वसकन अंगावर धावून येणारे महान लेखक वाचकांना भीतीदायक वाटतात. भ्यांव वाटतंय. मी भ्यालो तर.

इथे, माबोवर मराठी व्यतिरिक्त इतर भाषांमधे संवाद साधला जाउ नये या भूमिकेची तळी उचलणार्‍यांनी माबोचं चार्टर वाचलं आहे कां, मराठी भाषेचं वकिलपत्र घेण्या आधी प्लीज ते वाचा.

आम्हि कोण?

>>Maayboli is a social network and resource for marathi language and Maharashtrian culture. Maayboli means mother tongue in marathi and is spoken by more than 70 million people. This is our small but sincere effort to pay tribute to our language and culture.

It is neither our intention nor capability to create greatest and latest site related to marathi culture. Started in 1996, maayboli may be the first marathi site existing today

But that is not important. What is important is you like it. We feel fortunate to have obtained your affection and trust.<<

दॅट सेड, माझ्या माहितीनुसार माबो मराठी भाषेचा तारणहार नाहि, त्यांनी तसा दावा हि केलेला नाहि. आणि सगळ्यात महत्वाचं - केवळ मराठी भाषेतंच संवाद साधावा, अशी सक्ती केलेली नाहि. तुम्ही चक्रधर स्वामींच्या भाषेत संवाद साधलात तर त्याचं स्वागत आहे; तो लोकांना समजेल कि नाहि हा तुमचा प्रॉब्लेम. या उलट, ऋन्म्याने किंवा अमांनी एखादा स्टर्न किंवा मजेशीर (इंपॅक्टफुल) प्रतिसाद इंग्रजीत दिला; तर त्याचं हि कौतुक आहे. शेवटि काय, भाषा हि दळणवळणाचं साधन आहे. अ‍ॅज लाँग अ‍ॅज यु इफेक्टिवली पुट योर थॉट्स/मेसेजेस अ‍ॅक्रॉस, यु आर गुड...

हरचंद पालव आणि च्रप्स यांची मतं पटली, हे आवर्जुन नमुद करतो...

ऐकावे जनाचे करावे मनाचे. कुणा एकाचं मत कधीच परफेक्ट असत नाही.
हा धागा न्युट्रल आहे. म्हणजे आधीचे संदर्भ माहीत असण्याची गरज नाही. माझ्या मते जी भाषिक संस्कृती प्रगत होत जाते तिचा विविध संस्कृतींशी, भाषांशी संबंध येत जातो.
मारवाड मधे कुणी मरायला जात नाही. तिकडचेच लोक जगभरात बोंबलत फिरतात. त्यामुळे त्या भागात मारवाडी शुद्ध राहिली हा गौरव समजायचा का ? इंग्लीश भाषेने शुद्धतेचा आग्रह धरला असता तर तिचा शब्दकोश फुगला नसता. आज जगभरातल्या जास्तीत जास्त भाषांतील शब्द इंग्रजीत आहेत. ब्रिटीश लोक चला आजही आपण शेक्सपीअरचे इंग्रजी बोलूयात असा आग्रह धरतात का ? तसा आग्रह न धरल्याने इंग्रजी बुडाली का ? उलट इंग्रजीचे आक्रमण होतेय म्हणून आपण गळे काढतोय.

इंग्रजीच्या मानसिक वर्चस्वाचा धसका हा ब्रिटीशांच्या सत्तेचा आहे. ३० एक वर्षांपूर्वी बंगळूर मधे कन्नड येत नसल्ञास भाषेची अडचण जाणवायची. हिंदी बोलणारा रिक्षेवाला मिळायचा म्हणून ठीक होतं. आता बंगळुरू मधे सर्रास इंग्रजी बोलली जाते. कारण इथे प्रगती झालेली आहे. पुण्यात पण तेच. जिथे प्रगती आहे तिथे लोक येणार.

अमेरिकनांची कोणती मूळ भाषा आहे ? तिथे साहीत्य प्रसवले जात नाही का ? कि तिथले फ्रेंच शुद्ध फ्रेंच भाषेचा आग्रह धरतात ? कि तिथले ब्रिटीश आपल्या शुद्ध भाषेचा आग्रह धरतात ?

आत्ता बिंदूमाधव जोशींची कादंबरी कोण कोण वाचतंय बोला. वाचवली गेली तर माझ्याकडून बक्षीस. वाचली म्हणणा-याला मी अमूक पानावर अमूक ओळीतला फलाण्या क्रमांकाचा शब्द सांगा असे प्रश्न विचारणार आहे. मराठी भाषेचीही अनेक रूपं आहेत. अभिजात दर्जा मिळण्यासाठी प्राकृत मराठीतले शब्द घेऊन पर्याप्त शब्दसंख्या दाखवावी लागली. प्राकृत मराठी ही ग्रामीण मराठी आहे आणि संस्कृतोद्भव ही पुणेरी. मग कोणत्या भाषेचा आग्रह धरायचा ?

त्यामुळे ज्याला जसे वाटते तसे व्यक्त होऊ द्यायचे. नाही आवडले तर वाचू नये. लेखकानेही नाही आवडले ही प्रतिक्रिया पचवण्याची ताकद असेल तरच लिहावे. पण कोनत्याही स्थितीत आवरा, लिहू नका असे फर्मान काढले जाऊ नये. कादंबरी किंवा कथेत इतर भाषेत बोलणारे पात्र येऊ शकते. मराठी बोलणारा समूह हा आता प्रगत आहे असे समजले तर त्याला इंगर्जी / हिंदी समजते असे समजूनच लेखक त्या भाषेचा प्रयोग करतो. महाराष्ट्रात हिंदी ही दुसरी कि तिसरी भाषा असल्याने महाराष्ट्र ग क्षेत्रात मोडतो. ख क्षेत्र म्हणजे जिथे हिंदी ही भाषाच नाही. त्यामुळे हिंदीतले संवाद वाचता येत नाहीत किंवा समजत नाहीत असे वाचक अपवाद असावेत.

पण हिंदी वाचनाची सवय नाही हे नक्कीच होऊ शकते. त्यामुळे इथे दोन्हीकडून तरतमभावाची अपेक्षा आहे. त्याचे काही नियम असू शकत नाहीत.
उद्या कुणी अमक्याने हिंदीत संवाद लिहीले तर मी तेलगूत लिहीले का चालेल का असा युक्तीवाद केला तरी अशा युक्तीवादात फक्त शड्डू ठोकण्याचे समाधान असते, तरतमभावाचा पूर्ण अभाव असेल. तेलुगू भाषा जाणणारे इतकेही नाहीत महाराष्ट्रात कि सर्वांना ते समजावे. तरीही हट्टाने लिहायचे तर लिहा कि. काळं कुत्रंही वाचणार नाही ते. चालतंय का ?

मायबोलीवर लिखाण किंवा प्रतिसादात अन्य भाषेतील शब्द, शब्दसमूह , वाक्ये यांची अनावश्यक, हट्टाने केलेली पेरणी असेल तर असे प्रतिसाद न वाचण्याचे , तसंच असे लिखाण /प्रतिसाद मी वाचत नाही असं तिथेच लिहिण्याचं स्वातंत्र्य मला आहे आणि मी ते बजावत राहणार.

बरेच मुद्दे एकत्र झालेत.
लोकांनी घरी, बाहेर, इथे गप्पा टप्पा, टाइम पास करताना शुद्ध मराठीत बोलावे, इंग्रजी / हिंदी /इतर भाषीय शब्द,वाक्य टाळावे, महाराष्ट्रात बाहेरून येणाऱ्या लोकांशी मराठीच बोलावे हा इथे चर्चेचा विषय नाही. निदान मी तरी तसे समजतो. याआधील चर्चेत शॅलो फ्राय करा, चॉप करून घ्या वगैरे वर "ऑब्जेक्शन" नाही असे म्हटले आहे - म्हणजे शुद्ध मराठीचा आग्रह धरत नाही आहोत.

इथे वेमांनी माबोच्या "लेटेस्ट पॉलिसी" बद्दल दिलेले "ओपिनियन" वाचायाला मिळेल. तेच खाली देत आहे:

<"लेखनात थोडेसे इंग्रजी आले तर चालेल पण शक्य तितके लेखन मराठीत आणि देवनागरी लिपीत असावे अशी अपेक्षा आहे. पूर्णपणे इंग्रजीत असलेले लेखन इथे योग्य नाही .
@बाबा कामदेव
मायबोलीच्या धोरणात वेळोवेळी बदल होत गेले. सुरुवातीच्या काळात तुम्ही म्हणता तसे झाले असेल, पण त्याचे कारण कंपूबाजी नसून त्या त्या वेळेचे धोरण हे आहे. नंतर मराठी संस्कृती या एका निकषावर न राहता , मराठी माणसांना आवडेल असे मराठीत लिहिलेले लेखन असे धोरण आपण स्विकारले."

थोडक्यात इथे मराठी साहित्य अपेक्षीत आहे. ते शुद्ध मराठीच असावे असे नाही मराठीत आलेले, प्रचलीत असलेले इतर भाषीय शब्द (यात ती व्यक्ती ज्या वातावरणात रहाते त्या नुसार प्रचलीत शब्द कमी जास्त होऊ शकतात) चालतील, त्यात थोडेफार इंग्रजी (आणि अर्थात हिंदी/इतर भाषा ज्या साधारणपणे लोकांना कळतील) आले तर चालेल.

हा मुद्दा आहे, निदान माझा तरी.

म्हणजे "मराठी मेजवानी" - येथे विविध प्रांताचे मराठी पदार्थ मिळतील ही पाटी पाहून आम्ही तिथे "डिनर"ला जातो.
ते म्हणतात "मेन कोर्स" येई पर्यंत जरा चायनीज स्टार्टर घ्या, मेन कोर्स सोबत थोडी ही थाय साईड डिश घ्या, "डेझर्ट" आज अरेबियन आहे. चालेल की. सगळे एन्जॉय"करू. मेन कोर्स मराठी पदार्थांचा असावा अशी अपेक्षा आहे, कारण ती अपेक्षा ठेवूनच इथे आलो आहोत.
बाकी लंचला आम्ही तिकडे चायनीज एंजॉय केलं, उद्या डिनरला तिकडे थाय खाणार आहोत. मराठी जेवण करायला परत इथे येऊ तेव्हा मेन कोर्स असा मराठी पदार्थांचा राहू द्या.

बाकी उद्या धोरण बदलून मराठी मेजवानीने "Multi cuisine" केले आणि तिथे मराठी सेक्शन शाबूत ठेवला, तरी तिथे जाऊ. पण मराठी सेक्शन मधल्या मेन कोर्स मध्येही गडबड असेल तर मात्र सांगता यायचं नाही.

मराठी विषयी एवढी चर्चा Uhoh
आणि मराठी भाषा दिन साठी एकही संयोजक न मिळाल्याने यंदाचा उपक्रम मायबोली प्रशासनातर्फे रद्द करण्यात आला. नक्की काय साध्य होतेय ह्या चर्चेतून जर आपण आपल्या अभिमानास्पद भाषेच्या संकेत स्थळावर आपला वार्षिक उपक्रमही राबवु शकत नसु तर !!

नुसतं बोलताना जरा मिसळ झाली तर चालतं पण वाचताना फार हिंदी, ईंग्रजी आलं तर मला टोचतं, कंटाळवाणं होतं व ते वाचलं जात नाही. अशाने भाषेचं रूपच जातं असं मला वाटतं.

जेवढया हिरिरीने वेळात वेळ काढून ईथे मुद्दे मांडले गेले त्यापैकी थोडासा वेळ त्या उपक्रमास काढला न जाणे हां विरोधाभास वाटला आणि हेमावैम.

ते शुद्ध मराठीच असावे असे नाही मराठीत आलेले, प्रचलीत असलेले इतर भाषीय शब्द (यात ती व्यक्ती ज्या वातावरणात रहाते त्या नुसार प्रचलीत शब्द कमी जास्त होऊ शकतात) चालतील, त्यात थोडेफार इंग्रजी (आणि अर्थात हिंदी/इतर भाषा ज्या साधारणपणे लोकांना कळतील) आले तर चालेल. >> हे पटलं. आपल्याला हेच म्हणायचं होतं तर उगाच वाद घालत बसलो!

आता ते 'थोडेफार' म्हणजे किती प्रमाण - हे प्रत्येकाचे वेगळे असू शकते. मायबोलीला किती चालते हे वेमा ठरवतीलच.

नेहमीच्या कामकाजाच्या मराठीत परक्या भाषेतले शब्द अलीकडे महानगरीय बोलीमध्ये येतातच. ते रुळल्यासारखे झाले आहेत. पण लेखनामध्ये नावापुरता विषय घेऊन आपली मते, आर्ग्युमेंट्स दुसऱ्या भाषेत मांडणे, तत्वबोधात्मक लिहिणे हे कंटाळवाणे आणि कृत्रिम होते. त्यात कथा उरत नाही, कथन फक्त राहाते. narrative साठी कथेचा फॉर्म फारसा उपयोगी नाही. दोन भाषांचे समसमान मिश्रण तर नाहीच नाही. ज्या पात्राला जी भूमिका द्यायचे योजले आहे ती त्या पात्राकडून उभीच राहात नाही.

>>जेवढया हिरिरीने वेळात वेळ काढून ईथे मुद्दे मांडले गेले त्यापैकी थोडासा वेळ त्या उपक्रमास काढला न जाणे हां विरोधाभास वाटला आणि हेमावैम.<< +१
हे म्हणजे, तुम लढो, हम कपडा संभालताय (सिर्फ पिच्छेसे चिल्लाताय) असं चाललं आहे... Wink

< बिंदूमाधव जोशींची कादंबरी > कादंबरीचे नाव? >>>>
समजून घ्यायचं. ते तर किराणा दुकान चालवणारे. ते कसे कादंबरी लिहीतील.

नाथमाधवांची सोनेरी टोळी नावाची कादंबरी आहे.

अरे भांडू नका... वी ऑल लव मराठी, हे मेन आहे...
बाकी थोडा हिंदी आया तो इतना दिल पे नही लेने का...
मराठीचे फ्युचर हिंदी आणि इंग्रजी मिश्रित मराठी आहे हे नक्कीच... I सपोर्ट it...

:अण्णा हजारे मोडः
देखो. भांडो मत. अब हम दिल्ली मे जाकर हिंदी मे मराठी घुसडता है कि नही ? हमको पंतप्रधान भी कुछ नही बोला. पंतप्रधान तो सर्वोच्च होता है कि नही लोकशाही के अंदर ? फिर ?
म्हणून मी काय म्हणतो , भावना समजून घ्या. नही तो मै इधरच स्टील का ग्लास लेके उपोषण पे बैठूंगा.
समझ गये क्या ?

Pages