घरात खुप साप झालेत - उपाय सुचवा

Submitted by काकेपांदा on 20 March, 2021 - 05:54

माझ घर तस शहराबाहेर आहे. इकडे आधीही लोक कमी यायचे पण जवळच्या रस्त्याला थोडी रहदारी राहायची. करोना आल्यापासून इकडे माणुस दृष्टीस पडणे कठीण झाले.

तशात हळुहळू आजुबाजुला आणि अंगणात सापांची संख्या फोफवून राहिली होती. आधी छोटे पिल्ले दिसायचे. ते आता लई मोठे झाले आहेत. माझ्या कडे खूप गाई म्हशी आहे आणि पुशकळ दूध रहाते घरात. त्यामुळे साप घरात पण शीरु लागले दूध प्यायला. अन आता त्यांची संख्या प्रचंड होउन गेली आणि ते आता खुप उपद्रवही देउन राहिले आहेत.

आई अंगणात तुळशी पुढे रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावते. तर साप मध्येच जाऊन फुस्स्स करुन दिवा विझवून राहिले.
आता देवघरातही दिवा विझवून राहिले. शेपटीचा फटका मारुन समई उलटवून टाकतात. मग ते सांडलेले तेल साफ करत बसावे लागते.
आईला संध्याकाळी ते रात्री जेवणापर्यंत देवघरात दिवा पाहिजे. म्हणुन मी विजेचा मिणमीणणारा दिवा आणुन लावला.
तर नाग आपला फणा आपटून बटण बंद करतात. त्यावर उपाय म्हणुन बटण शॉर्ट करुन बायपास केले. तर व्हायपर साप दिव्याभोवतीच वेटोळे घालुन बसतात अन पुरा दिवा झाकुन टाकतात.

एखाद्या खोलीचे दार नुसते बंद केले असेल तर आतुन दाराच्या कडी भोवती आठचा आकडा करुन वेटोळे घालुन बसतात तासन तास. दार उघडता येत नाही मग.
स्वयंपाक घराच्या ओट्यावर जित्ते उंदीर आणि बेडुक पकडून आणुन सोडतात त्यामुळे बायको खुप वैतागते.
परवा मी रात्री कपडे वाळत टाकले बाल्कनीत दोरीवर. सगळे कपडे वाळत टाकुन झाले आणि अचानक सपासप खाली पडले.
तेव्हा लक्षात आले की दोरीच्या खाली सापांनी पुडच्या सापाची शेपटी तोंडात धरुन दोरीच वाटावी अशी साखळी केली होती. अन सगळे कपडे वाळत टाकुन झाल्यावर साखळी तोडून सगळे कपडे पाडुन टाकले. परत धुवावे लागले मग.

एक लांब साप बाबांच्या काठी सारखा आकार करुन दाराजवळ उभा राहिला, बाबा बाहेर जाताना. काठी समजुन बाबा त्याला हातात घेउन बाहेर गेले तर मध्येच सैल होउन सर्रकन जमीनीवर सरपटत निघुन गेला. सुदैवाने माझा मुलगा चिंटु सोबत गेला होता त्यांच्या त्याने सावरले आणि त्यांना एका झाडाची फांदी कापुन दिली हातात धरायाला.

घर छान झाडुन पुसुन घेतले की कधी अचानक अंगावर लांब केस असेलेले नाग येतात आणि अंग झटकत घरभर फिरतात. मग घरभर केसच केस. करा साफ परत.

रातच्याला लाईट गेली तर मेणबत्त्या लावायची सोय नाही. लागीच फुसफुस करुन यांनी विझवल्याच समजा.

अजगर लोक तर मोबाइलचे चार्जर, बूट, इमर्जन्सी लॅंप, पोरांचे चेंडु, बॅट काहीही गिळुन बसतात आम्ही बसतो शोधत कुठे गेले.

रातच्याला अचानक हॉलमधुन गडगडल्यावानी आवाज येतो. जाउन पाहिलं साप हेलेमेट मध्ये बसून त्याची गाडी गाडी करुन गोल गोल फिरवत राहिले होते हॉलभर.

मी टोपी घालुन बाहेर निघालो की छतावरुन लोंबकळणारे साप वरच्यावर तोंडात धरुन टोपी उचलून घेतात.

मी मुंगुसही आणुन पाहिले. तर मुंगुस मागे लागले की साप केक्युलेच्या स्वप्नातल्या सापासारखे आपल्या तोंडात आपलीच शेपटी धरुन रिंग करुन वेगाने इकडे तिकडे गडगडायला लागले आणि मुंगुस त्या रिंग मधुन उड्या मारायला लागले. त्यांचा खेळच सुरु झाला जणु.

आम्ही पुरे त्रस्त झालो आहोत आता सापांच्या उच्छादाला.

कृपा करुन ठोस उपाय सुचवा या सापांचा बंदोबस्त कसा करायचा?

आगाऊमध्ये धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक काम करा.. रात्री अंथरूणात भरपूर लोळा आणि लोळताना एखाद्या सापाच्या पेकाटात मारा, नाही तर कानफटात तरी द्या.. बघा, तुम्हाला घाबरून न चावताच पळून जातील

म्हणुन मोजे घालून झोपतो.
पार उन्हाळ्यामंदी असं मोजे अन हेल्मेट घालून झोपायला लागते, काय कराव काही सुचून नाही राहिलं गड्यांनो.
>>>>>>>

भाई कुछ तो एक बोलो, मोजे मे सो रहे हो या तकलीफ मे

Pages