कांदे पोहे

Submitted by अमृताक्षर on 12 March, 2021 - 03:49

नमस्कार मायबोलीकरांनो,
इथे प्रत्येक शंकेची उत्तरे आणि विषयाबद्दल इतर पैलू समजतात म्हणून हा विषय इथे मांडते..असा दुसरा धागा असेल तर लिंक द्यावी.
माझ्या मामे बहिणीला 1 वर्षा पासून लग्नासाठी मुलगा शोधणे चालू आहे. ती दिसायला खूप सुंदर आहे केस चांगले दाट काळेभोर आणि कमरेपेक्षा खाली आहेत. दिसायला काही प्रोब्लेम नाही. घरची सगळी काम तिला येतात कारण 10 वी पासून सगळ तीच करते. एकदम शांत आणि सालस पोरगी आहे. तीच engg झालंय 2 वर्षा आधी. गावाकडे राहते त्यामुळे अजुन नोकरी करत नाही पण लग्नानंतर करण्याची तयारी आहे.
पण काही कारणाने तीच लग्न जमत नाही कधी यांना आवडत नाही कधी त्यांना आवडत नाही.
आता पुढच्या महिन्यात मला पण मुले पाहायला चालू होईल या एकंदरीत प्रकरणाची थोडी भीती वाटते. मी माझ्या मामे बहिणीशी या विषयावर बोलली तर तिने सांगितलेल्या काही शंका इथे टाकते ते सगळे प्रश्न माझ्या सुद्धा मनात आहेतच.
1) ती शांत असल्यामुळे कधी कुठल्या पाहून गेलेल्या मुलाला जास्त बोलली नाही फोनवर..मेसेज कॉल्स जास्त झाले नाही तर समोरच्या मुलाला misunderstanding झाली की ही मुलगी interested नाही हीच जबरदस्ती लग्न करताय.
म्हणून पुढच्या वेळी ती थोडी बोलती झाली मेसेज वगैरे केले तर त्या मुलाला वाटल ही खुपचं forward आहे. खूप बोलते.
2) biodata आला तेव्हा जास्त जाणून घ्यायचा प्रयत्न तिने स्वतः केला नाही कारण तिला वाटल घरचे बघतीलच बरोबर. तर तो मुलगा ऑलरेडी लिव्ह इन मधे राहतो हे लग्न जुळण्याच्या फायनल स्टेज ला माहीत झालं.
म्हणून मग हिने पुढच्या वेळी जास्त माहिती काढण्याचा प्रयत्न केला तर समोरच्या ला ही जास्त बोल्ड आणि डाऊट घेणारी वगैरे वाटली आणि नकार आला.
3) एक मुलगा चांगला होता. पाहायला लवकरच येणार होता त्यांचं चॅटिंग वगैरे चालायचं चांगली मैत्री झाली आणि दिवसरात्र बोलणं चालू झालं. रोज काय करताय updates, फोटो पाठवणे वगैरे चालू राहिलं. पण नंतर त्याने पाहायला यायला पण नकार दिला कारण त्याला वाटल की ही मला इतकं रात्री वगैरे बोलते स्वतःचे फोटो
(नॉर्मल फोटो ) वगैरे पाठवते तर ही बाकीच्यांना पण असच बोलत असेल
म्हणून मग next टाईम ही समोरच्या मुलाला बोललीच नाही तो जेवढं बोलेल तेवढंच..फोटो वगैरे तर अजिबात पाठवले नाही तर त्या मुलाला वाटले ही खूप boring आहे नाहीतर हिला दुसरं कुणी आवडत असेल.
4) विवाह मधली अमृता राव सारखं राहील तरी चालत नाही आणि मै हू ना वाली अमृता राव सारखं राहील तरी चालत नाही
ती खुपचं कन्फ्युज आहे आता की कस आणि काय वागावं. प्रत्येक जण prtek गोष्टीचा काही तरी अर्थ काढत बसतो. लग्न जुळण तिला खुपचं अवघड वाटायला लागलाय म्हणे आता..
तिच्यावरून मला माझी भीती वाटते कारण मी एकतर extrovert आहे. एक्स्प्रेस होणे बोलणे हा माझा स्वभाव आहे. आणि कायम घराबाहेरच राहिल्यामुळे घरची काम वगैरे खूप काही येत नाही दिसायला सुद्धा तिच्या इतकी सुंदर नाही. एकदम विवाह मधली अमृता राव वगैरे मला बनता येणार नाही. एक दोन पाहण्यात लग्न जमून जाव आणि ते सुद्धा व्यवस्थित आपल्याला आहे अस accept करणाऱ्या मुलाशी इतकीच माफक अपेक्षा आहे.
पुढच्या महिन्यापासून हा अवघड कांदे पोहे कार्यक्रम आमच्याकडे पण सुरू होणार आहे. आणि माझ्या मामे बहिणीच ऐकून मी खरचं खूप भांबावून गेली आहे.
कुणाला काही चांगले वाईट अनुभव असतील तर इथे शेअर करा.
शिवाय या कार्यक्रमा bddl काही अजुन advices tips suggestions असतील तरी द्या..प्रामाणिकपणे..
धन्यवाद..!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अशा रोचक कांदेपोहे कार्यक्रमासाठी एक वेगळा धागा असायला हवा..त्यावरचे किस्से वाचायला मज्जा येईल.

तुमचा प्रॉब्लेम नीट समजला नाही.
निमशहरी किंवा गावाच्या ठिकाणी कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावे लागते याची कल्पना आहे. तुमच्या मामेबहीणीच्या केस मधे जे जे नकार मिळाले ते सर्व पथ्यावर पडणारेच आहेत. तिच्या बाबत आईवडीलांनी बघून दिलेलं स्थळ निमूट स्विकारायचे असेल तर व्यवस्थित होईल सर्व.

पण तुमची थोडीशी जरी स्वतंत्रपणे निर्णय घ्यायची तयारी असेल तर अशा स्थळांच्या नकाराला महत्व द्यायची गरज नाही. आधुनिक विचार असलेला मुलगा मिळतच नाही असे काही नाही. वातावरणामुळे अ‍ॅरेण्ज्ड मॅरेज करावे लागत असल्यास किमान मुलाशी बोलायचंय ही अट टाकायला हरकत नाही. मान्य करणा-या मुलाशी सगळे बोलून घेतले तर गैरसमजाला वाव राहणार नाही.

टीव्हीवर कोणत्या तरी मॅट्रिमोनी साइटची जाहिरात असे त्यात उत्सुक तरुणतरुणी स्वतःचे विचार अपेक्षा वगैरे आधीच सांगतात असं काहीतरी होतं. ते थोडं बरं पडेल ना?

काहींनी लिहिलंय तसं - बी युवरसेल्फ. लग्न झाल्यावर जन्मभर जोडीदार आणि त्याच्या कुटुंबाच्या मनासारखंच , ते स्वतःच्या मनाविरुद्ध असलं तरी, वागणार आहात का?

परिचयाच्या व्यक्तींमधून जोडीदार शोधायचा प्रयत्न करतात का?

मी या विषयावर 1000 शब्दांचा निबंध लिहू शकते. विकेंड ला अजिबात वेळ नाहीये, सोमवार मंगळवार कडे लिहीन

ओनलाईन चाटिंग आणि प्रश्नोत्तरे बोलणे यांत जो मुलगा फक्त दोनच दिवस/ तीनचारच सेशनस घेईल तोच खरा उमेदवार समजा असं माझं मत आहे. तेवढ्यावर हो/नाही सांगत नसेल त्याला कट करा.

जास्त विचार करू नका , कालच मुलगा श्रीमंत आहे , म्हणजे बिघडलेलाच असणार म्हनून मुलीचा नकार बघितला , लग्न गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात सो एन्जॉय कांदे पोहे

अमृताक्षर,
>>एक दोन पाहण्यात लग्न जमून जाव आणि ते सुद्धा व्यवस्थित आपल्याला आहे अस accept करणाऱ्या मुलाशी इतकीच माफक अपेक्षा आहे.>>
कमीत कमी कांदेपोह्यात लग्न जमावे असा विचार करु नका. लग्न ही काही उरकून टाकायची बाब नव्हे. तुम्ही आयुष्याचा जोडीदार शोधताय, तेव्हा समोरच्या व्यक्तीने तुम्हाला आहे तसे स्विकारणे आणि समोरच्या व्यक्तीला तुम्ही आहे तसे स्विकारणे दोन्ही आले. तुम्हाला जोडीदार कसा हवा ते मुद्दे लिहून काढा. कोअर वॅल्यूजमधे काय महत्वाचे, कुठल्या मुद्द्यावर तडजोड करायची तयारी आहे , कुठल्या मुद्द्यावर नाही याचा विचार करा. जश्या आहात तशाच रहा. घरकाम फारसे जमत नाही, फार सुंदर नाही वगैरे विचार करुन स्वतःला कमी लेखू नका. आकर्षक व्यक्तिमत्व म्हणजे केवळ चेहरा/ देह नाही, तो एक भाग झाला , पण त्यापलिकडेही बरेच काही असते. तुमचे शिक्षण, कलेची आवड-जाण, वाचन- बहुश्रुत असणे, स्वभाव , एकंदरीत वावर हे सगळे देखील व्यक्तिमत्वात येते. एकदा स्वतंत्र रहायचे, जबाबदारी घ्यायची असे ठरवले तर बेसिक स्वयंपाक आणि इतर घर चालवणे याच्याशी निगडित सर्व गोष्टी महिनाभरात शिकता येतात. इच्छा असेल तर घरकाम शिकून घेणे काही अवघड नसते. सुशिक्षित आहात, नोकरी करता म्हणजे बाहेरच्या जगात वावर आहे . लग्नानंतरचे सहजीवन कशा प्रकारचे हवे आहे? कौटुंबिक आणि व्यावसायिक आयुष्याची सांगड घालताना जोडीदाराकडून कशा प्रकारचा आधार तुम्हाला अपेक्षित आहे? अशाच ज्या समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षा असतील त्यातल्या रिअ‍ॅलिस्टिकली तुम्हाला काय, कितपत झेपणार आहे? या सगळ्याचा विचार करा.
माझे लग्न ठरायला ३ वर्षे लागली. २५-३० वर्षांपूर्वी मुलीला भाऊ नाही एवढे कारणही नकारासाठी पुरेसे असे. त्यामुळे प्राथमिक फेरीतच बरीचशी स्थळे बाद व्हायची. त्या जोडीला स्कॉलरशिप+१०-१२वी चे मार्क, बँक-एलआयसी अशी सहज कर्जवाली नोकरी नसणे, साड्या-दागिने न आवडणे, खांद्यापर्यंतही केस वाढवायची तयारी नसणे, हुंडा नाही वगैरे बरेच मुद्दे होते. मुलगी गोरी नाही असा रुपाचा मुद्दाही होताच. त्याकाळी ३-४ भेटी असे नव्हतेच. २०-२५ मिनीटे एकटे बोलायला मिळायचे. त्यात आपले विचार व्यवस्थित मोकळेपणी मांडणे, समोरच्याचे विचार समजून घेणे करावे लागे. काही जणांना माझे न लाजता बोलणे, प्रश्न विचारणे झेपत नसे. मैत्रीची शक्यता आहे असे वाटले तर होकार द्यायचा असा विचार करुन ओपन माईंड ठेवून भेटणे सुरु ठेवले. मला जोडीदाराच्या रुपात आयुष्यभराचे मैत्र लाभले. असेच मैत्र तुम्हालाही मिळो या शुभेच्छा!

सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचून खूप बरे वाटले..खूप गोष्टी नव्याने समजल्या..त्यावर नक्कीच विचार करेन.
स्वाती2 खूप सविस्तर आणि सुंदर मुद्दे तुम्ही सांगितलेत.. thank u..
इथल्या सगळ्याच मुद्द्यांवर सविस्तर विचार करून मनाशी आपल्याला काय हवे नको याची नीट सांगड घालून मगच या कार्यक्रमाला सामोरी जाईल.
सगळ्यांचे खरचं खुप आभार..

<< अरेंज मॅरेज मध्ये घाई करू नये पण जास्त उशीरही करू नये...शेवटी गाळ उरतो.. चांगली स्थळे निघून जातात...
>> +१

अरेंज मॅरेज मध्ये घाई करू नये पण जास्त उशीरही करू नये...शेवटी गाळ उरतो.. चांगली स्थळे निघून जातात...》》》
अस काही नाही माझ लग्न खूप उशिरा म्हणजे वयाच्या 38 व्या वर्षी झाल आणि त्यावेळी माझ्या नवर्याच वय 40 होत, माझा नवरा आणि सासरच सगळ कुटुंब अतिशय सुसंस्कृत आहे, आम्हा दोघांमधेही काही दोष नाही पण काही ना काही कारणाने योग येत नव्हता
तरुण वयात थोडस टक्कल पडल ह्या क्षुल्लक कारणाने त्याच लग्न ठरत नव्हत
सो टेंशन घेऊ नका मन शांत ठेवा आणि ड़ोळसपणे निर्णय घ्या

दुसरा धागा मिळाला नाही म्हणून इथे विचारतो. माहितीत १ जण आहे (वय ५५, विधुर, ब्राह्मण, राहणार मुंबई) त्याला पुनर्विवाह करायचा आहे. मला त्याला मदत करायची आहे तर मी त्याची कुठे नावनोंदणी करावी?

उपाशी बोका, रविवारच्या लोकसत्तेत विवाहविषयक जाहिराती असतात.
वधुवरांकडून तसंच विवाहमंडळांच्याही.

लोकल लेव्हलला मला शक्य नाही. मी फार तर माहिती देऊ शकतो आणि पैसे भरून नावनोंदणी करू शकतो. पण माहिती कुठे द्यावी, हेच माहित नाही, म्हणून विचारले. शादी डॉट कॉम आणि मराठी matrimony डॉट कॉम माहीत आहेत, पण ते कितपत चांगले आहेत माहीत नाही.

उबो.. माझ्याकडे नाव नोंदणी करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्कातून मेल करा. माझ्याकडे 65 वर्षापर्यंत स्त्रियांची आणि 70 वर्षांपर्यंत पुरुषांची स्थळं आहेत.

एकदा ती पोर स्लिव्हलेस घालून आली आणि माझी थोडी बारीक नजर आहे तर तिच्या दंडांवर बारीक बारीक पांढरे डाग होते. मला शंका आली म्हणून मी थेट विचारले तर तिने उडवाउडवीची उत्तरे दिली . नंतर मी घरच्यांना सांगून चौकशी केली तर तिच्या मामाकडून vitiligo ची हिस्टरी होती. म्हणजे उद्या लग्न करून काहीही आजार जडला असता तर माझी काही हरकत नसती पण आधीच अश्या गोष्टी लपवणे ही शुद्ध फसवणुक आहे. >>>>>>>>>>>>सगळ्यांना उत्तरे देऊन कंटाळली असेल। पूर्वी मुलींना बघायला येणाऱ्या स्त्रिया मुलीला एका रूम मध्ये नेत आणि पूर्ण कपडे काढून शरीरावर कुठले डाग धब्बे किंवा ऑपरेशन ची खून किंवा अजून काही बाही बघण्यासाठी इन्स्पेक्शन करत हे असे मी कुठेतरी वाचले आहे आणि एक शॉर्ट मुवि सुद्धा बघितली आहे .

Pages