कांदे पोहे

Submitted by अमृताक्षर on 12 March, 2021 - 03:49

नमस्कार मायबोलीकरांनो,
इथे प्रत्येक शंकेची उत्तरे आणि विषयाबद्दल इतर पैलू समजतात म्हणून हा विषय इथे मांडते..असा दुसरा धागा असेल तर लिंक द्यावी.
माझ्या मामे बहिणीला 1 वर्षा पासून लग्नासाठी मुलगा शोधणे चालू आहे. ती दिसायला खूप सुंदर आहे केस चांगले दाट काळेभोर आणि कमरेपेक्षा खाली आहेत. दिसायला काही प्रोब्लेम नाही. घरची सगळी काम तिला येतात कारण 10 वी पासून सगळ तीच करते. एकदम शांत आणि सालस पोरगी आहे. तीच engg झालंय 2 वर्षा आधी. गावाकडे राहते त्यामुळे अजुन नोकरी करत नाही पण लग्नानंतर करण्याची तयारी आहे.
पण काही कारणाने तीच लग्न जमत नाही कधी यांना आवडत नाही कधी त्यांना आवडत नाही.
आता पुढच्या महिन्यात मला पण मुले पाहायला चालू होईल या एकंदरीत प्रकरणाची थोडी भीती वाटते. मी माझ्या मामे बहिणीशी या विषयावर बोलली तर तिने सांगितलेल्या काही शंका इथे टाकते ते सगळे प्रश्न माझ्या सुद्धा मनात आहेतच.
1) ती शांत असल्यामुळे कधी कुठल्या पाहून गेलेल्या मुलाला जास्त बोलली नाही फोनवर..मेसेज कॉल्स जास्त झाले नाही तर समोरच्या मुलाला misunderstanding झाली की ही मुलगी interested नाही हीच जबरदस्ती लग्न करताय.
म्हणून पुढच्या वेळी ती थोडी बोलती झाली मेसेज वगैरे केले तर त्या मुलाला वाटल ही खुपचं forward आहे. खूप बोलते.
2) biodata आला तेव्हा जास्त जाणून घ्यायचा प्रयत्न तिने स्वतः केला नाही कारण तिला वाटल घरचे बघतीलच बरोबर. तर तो मुलगा ऑलरेडी लिव्ह इन मधे राहतो हे लग्न जुळण्याच्या फायनल स्टेज ला माहीत झालं.
म्हणून मग हिने पुढच्या वेळी जास्त माहिती काढण्याचा प्रयत्न केला तर समोरच्या ला ही जास्त बोल्ड आणि डाऊट घेणारी वगैरे वाटली आणि नकार आला.
3) एक मुलगा चांगला होता. पाहायला लवकरच येणार होता त्यांचं चॅटिंग वगैरे चालायचं चांगली मैत्री झाली आणि दिवसरात्र बोलणं चालू झालं. रोज काय करताय updates, फोटो पाठवणे वगैरे चालू राहिलं. पण नंतर त्याने पाहायला यायला पण नकार दिला कारण त्याला वाटल की ही मला इतकं रात्री वगैरे बोलते स्वतःचे फोटो
(नॉर्मल फोटो ) वगैरे पाठवते तर ही बाकीच्यांना पण असच बोलत असेल
म्हणून मग next टाईम ही समोरच्या मुलाला बोललीच नाही तो जेवढं बोलेल तेवढंच..फोटो वगैरे तर अजिबात पाठवले नाही तर त्या मुलाला वाटले ही खूप boring आहे नाहीतर हिला दुसरं कुणी आवडत असेल.
4) विवाह मधली अमृता राव सारखं राहील तरी चालत नाही आणि मै हू ना वाली अमृता राव सारखं राहील तरी चालत नाही
ती खुपचं कन्फ्युज आहे आता की कस आणि काय वागावं. प्रत्येक जण prtek गोष्टीचा काही तरी अर्थ काढत बसतो. लग्न जुळण तिला खुपचं अवघड वाटायला लागलाय म्हणे आता..
तिच्यावरून मला माझी भीती वाटते कारण मी एकतर extrovert आहे. एक्स्प्रेस होणे बोलणे हा माझा स्वभाव आहे. आणि कायम घराबाहेरच राहिल्यामुळे घरची काम वगैरे खूप काही येत नाही दिसायला सुद्धा तिच्या इतकी सुंदर नाही. एकदम विवाह मधली अमृता राव वगैरे मला बनता येणार नाही. एक दोन पाहण्यात लग्न जमून जाव आणि ते सुद्धा व्यवस्थित आपल्याला आहे अस accept करणाऱ्या मुलाशी इतकीच माफक अपेक्षा आहे.
पुढच्या महिन्यापासून हा अवघड कांदे पोहे कार्यक्रम आमच्याकडे पण सुरू होणार आहे. आणि माझ्या मामे बहिणीच ऐकून मी खरचं खूप भांबावून गेली आहे.
कुणाला काही चांगले वाईट अनुभव असतील तर इथे शेअर करा.
शिवाय या कार्यक्रमा bddl काही अजुन advices tips suggestions असतील तरी द्या..प्रामाणिकपणे..
धन्यवाद..!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही कुठे रहाता?( पत्ता नाही मागत आहे)
विचारायचे कारण फक्त हेच की, शहरात तरी अगदी टीपिकल पोहे कार्यक्रम होत नाहीत्/नसावेत.
तुम्हाला जसे व्यक्त व्हायचे, तसेच व्हा. जे विचार आहेत, तसेच मांडा. परखा/निरखा. कारण तुम्हाला रहायचे आहे.
मागासलेल्या व्यक्तीशी संसार करायचाय की तुम्हाला समजून घेणार्‍या?
आधी, तुम्हाला लग्नात काय हवं आणि काय नाहीच झेपणार ते ठरवा आणि तसे शोधा. इतकं काय टेन्शन घ्यायचं नाही. स्पर्धा नाहिये ना? की अगदी य वयाच्या आतच व्हायला हवं असं प्रेशर आहे?
म्हणालं तर , दोन दिवसात सुद्धा लग्न होवु शकतं पण कोणाशी हा मुद्दा आहे ना..
त्यामुळे, आधीच वर्ष लागेल की महिने, हा ताण नका घेवु. आवरून टाकायची गोष्ट नसावी असे गृहित धरते.

मी प्रॉपर शहरात राहते. आई बाबा educated आहे. मला आता 27 running आहे. त्यामुळे घरच्यांना आणि मला सुद्धा वाटतं की या वर्षी करावं आता लग्न. उरकून टाकायचं नाहिये पण सतत मुल पाहणे नकार देणे किंवा पचवणे त्याच त्या process परत परत करणे थोड difficult वाटतं. त्यामुळे शक्यतो आपल्याकडून चुका होऊच नये असा प्रयत्न करणार आहे. अरेंज मधे तसही कुठल्या गोष्टीचे काहीही अर्थ काढणारे मुल मुली आणि त्यांची फॅमिली पाहून ऐकून आहे
त्यामुळे थोडस आधीच तयारीत राहावे अशी अपेक्षा आहे.

प्रत्येक प्रोसेस कडे कसं बघ्तां त्यावर अवलंबून आहे.
मान्य आहे, वाटू शकतो कंटाळा. पण मग प्रोसेस बदला.
पोहे करा आणि खा कशाला फुकटचे?
इतक्या साईट आहेत, तिथे नाव घाला. बोलून बघा मगच भेटायचे.
बघा ़ जमतय का..
शुभेच्छा!

१) म्हणून पुढच्या वेळी ती थोडी बोलती झाली मेसेज वगैरे केले तर त्या मुलाला वाटल ही खुपचं forward आहे. खूप बोलते.
२) म्हणून मग हिने पुढच्या वेळी जास्त माहिती काढण्याचा प्रयत्न केला तर समोरच्या ला ही जास्त बोल्ड आणि डाऊट घेणारी वगैरे वाटली आणि नकार आला.
३) म्हणून मग next टाईम ही समोरच्या मुलाला बोललीच नाही तो जेवढं बोलेल तेवढंच..फोटो वगैरे तर अजिबात पाठवले नाही तर त्या मुलाला वाटले ही खूप boring आहे नाहीतर हिला दुसरं कुणी आवडत असेल. >> हे सगळं त्या मुलांनी नकार देताना स्पष्ट्पणे सांगितलं? असं generally कोणी स्पष्ट्पणे सांगत नाही. नुसताच नकार देतात. आणि जास्त मुलं बघायला लागली arrange marriage करताना तर त्यात बिघडल काय? उलट प्रत्येक मुलागणिक आपले विचार अधिकाधिक स्पष्ट होत जातात. आणि finally जेव्हा लग्न जमतं तेव्हा मनात फार doubts रहात नाहीत.
२७ म्हणजे काही खूप जास्त वय नाहीये तुमचं. हल्ली शहरात ३०-३१ वयात मुलींची लग्न होणे तसे कॉमन झाले आहे.

अहो कंटाळा नाही वाटतं आहे. पण एखादं चांगल स्थळ आपल्या शुल्लक बोलण्या किंवा वागण्याच्या चुकामुळे misunderstanding होऊन काम खराब होऊ शकत आणि मग परत तसे चांगले मुल फॅमिली शोधत बसा हा आटापिटा होऊ शकतो म्हणून माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की आधीपासूनच सगळ्या गोष्टी नीट समजून घेऊन कुणालाही कुठली misunderstanding न होता गोष्टी पार पडल्या तर आनंद होईल. म्हणून इथे बाकीच्यांचे अनुभव किंवा suggestions असतील तर द्या अस म्हणतेय. बाकी चांगला मुलगा नाही भेटला तर ही प्रोसेस परत परत करायला माझी काही हरकत नसणार आहे. कारण लग्न हा महत्वाचा फॅक्टर आहे त्या मुलासोबत मला आयुष्य काढायचं आहे तर मी वेळ देईलच.

Soha त्यांनी स्पष्ट सांगितले नसेल पण तिने आपल्या परीने अर्थ काढून घेतले असावेत.
हो पण या वर्षी करायचं आहे चालू तर मला वाटतं आपण तयार राहावं.

१) अरेंज मधे तसही कुठल्या गोष्टीचे काहीही अर्थ काढणारे मुल मुली आणि त्यांची फॅमिली पाहून ऐकून आहे
२) त्यांनी स्पष्ट सांगितले नसेल पण तिने आपल्या परीने अर्थ काढून घेतले असावेत. >> ही दोन्ही वाक्ये एकत्र वाचून बघा आणि विचार करा तुमची नक्की समस्या काय आहे.
तुम्हाला खरच जर सल्ला हवा असेल तर मी सुचवीन कि, फक्त लग्न जमवण्याच्या process वर फार विचार करू नका.
चांगली करियर करणे, आयुष्यात निरनिराळे अनुभव घेणे (प्रवास, समाजसेवी संस्थांसाठी काम, एखादी कला शिकणे, स्वयंपाक शिकणे) हे सगळं simultaneously चालू ठेवा. स्वयंपाक शिकणे सुचवतेय ते केवळ लग्न जमण्यासाठी नाही. ते एक अतिशय महत्त्वाचे life skill आहे.
चांगली करियर करणे हे सुद्धा आवश्यक आहे कारण कदाचित नंतर इतका dedicated वेळ करियर साठी द्यायला जमणार नाही. कितीही ठरवलं, तरी आपल्या partner मुळे आयुष्यातल्या priorities बदलायला लागू शकतात. दुसरं असे की चांगली करियर केल्याने येणारा आत्मविश्वास तुम्हाला married life मधे काही कठिण प्रसंग आले तर कामास येईल.
प्रवास, समाजसेवी संस्थांसाठी काम, एखादी कला शिकणे - हे सगळ सुरू ठेवलतं, स्वतःला चांगल्या कामात engaged ठेवलत तर येणारे नकार पचवणे जड जाणार नाही.
आणि कोणी सांगावं? कदाचित फारसे नकार येणारही नाहीत तुम्हाला.

धन्यवाद soha.. मी Qualcomm ला senior engg म्हणून जॉईन आहे. वेळ मिळेल तसा लेखन वाचन चालू च असते.
Financially independent आहे. Lockdown मधे स्वयंपाक शिकणे चालू केले आहे. जॉब मुळे तसा वेळ कमी मिळतो पण इतर गोष्टी जशा की gardening , painting मधे सुद्धा मला इंटरेस्ट आहे. माझ्या आयुष्यात एकंदरीत सगळ्या गोष्टी सुरळीत चालू आहे.
त्यामुळेच मी या वर्षी लग्नाला हो म्हंटले. आणि आता त्यासाठीच मला काही suggestions हवे आहेत. एक धागा सुद्धा वाचल्याचं आठवत पण नेमका कुणाचा होता आठवत नाही त्यात suggestions होती की लग्न जुळवताना काय काय पहावे फसवणूक कशी होते वगैरे.
कुणाला माहिती असेल तर कृपया लिंक द्या

3) एक मुलगा चांगला होता. पाहायला लवकरच येणार होता त्यांचं चॅटिंग वगैरे चालायचं चांगली मैत्री झाली आणि दिवसरात्र बोलणं चालू झालं. रोज काय करताय updates, फोटो पाठवणे वगैरे चालू राहिलं.>>>>>>> हे झेपलं नाही.काही ठरण्याआधी चॅटिंग्,फोटो जरा ऑड वाटलं. २७ रनिंग आहे म्हणजे बर्‍याच लहान आहात.फिकीर नॉट!

हल्ली पुण्यात तरी कांपो कार्यक्रमाचं स्वरुप बदललेलं दिसतंय. मुलगा मुलगी ccd किंवा तत्सम ठिकाणी भेटतात. बरं वाटलं तर परत एकदोनदा भेटतात. WA वर चॅट करतात. बरं वाटलं तर मग पालक घुसतात आणि मग पुढच्या घडामोडी घडतात.

आधीचं अफेअर वगैरे असेल तरी मुलामुलींना परस्परांना काही अडचण नसते पण पालकांना मात्र ते चालणार नसतं.

मजा अशी की काही पालकच मुलामुलींचा फाॅर्म भरून मुलगा/ गी निर्व्यसनी आहे असं लिहीतात पण प्रत्यक्ष भेटीत मुलगा सांगतो की ते आईला माहीत नाही पण मी स्मोक करतो वगैरे.

देवकी..तेच तर..आपल्याकडून नकळत चुका होतात..आपल्याला वाटतं की चांगले मित्र होऊ तर लग्नासाठी एकमेकांना ओळखणे बर पडेल म्हणून आपण बोलतो आणि नेमक समोरचा चुकीचा अर्थ काढून सगळ खराब होऊन जात..याच आणि अशाच चुका होऊ नये म्हणूनच हा धागा काढलाय मी की माझ्याकडुन सुद्धा असल्या कुठल्याच चुका होऊ नये

हे झेपलं नाही.काही ठरण्याआधी चॅटिंग्,फोटो जरा ऑड वाटलं. >> हे मी २००७ मधे सुद्धा केलंय. तर आता २०२१ मधे करायला काही फार हरकत नसावी.
माझ्या नवर्‍याने आणि मी प्रत्यक्ष भेट्ण्यापूर्वी जवळपास ६ महिने एकमेकांशी चॅटिंग केलं. तेव्हा तो परदेशात होता. रीतसर विवाहमंडळातून contact details घेतले. आधी दोघांच्या आया एकमेकींशी फोनवर बोलल्या. मग आम्ही email-ids share केले आणि आधी emails आणि नंतर chatting, मग ६ महिन्यानी तो भारतात आल्यावर प्रत्यक्ष भेट असा सगळा प्रवास झाला. ह्यामधे एखाद-दुसरा फोटोही शेअर केला असेल. तेव्हा आमच्याकडे smart phone नसल्याने उठ्सूठ फोटो काढणं इतक कॉमन नव्हतं.
माझ्या आयुष्यात एकंदरीत सगळ्या गोष्टी सुरळीत चालू आहे. >> मग लग्नाचे एवढ tension घेऊ नका. होईल तेही सुरळीतपणे.

पण एखादं चांगल स्थळ आपल्या शुल्लक बोलण्या किंवा वागण्याच्या चुकामुळे misunderstanding होऊन काम खराब होऊ शकत आणि मग परत तसे चांगले मुल फॅमिली शोधत बसा हा आटापिटा होऊ शकतो म्हणून माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की आधीपासूनच सगळ्या गोष्टी नीट समजून घेऊन कुणालाही कुठली misunderstanding न होता गोष्टी पार पडल्या तर आनंद होईल.>>>
पण असे शुल्लक गोष्टींचा चुकीचा अर्थ काढणा-यांशी सोयरिक हवीच कशाला? चुकीचा अर्थ काढलाच तर विचारून शंका निरसन करून घेण्याचा समजूतदारपणा नको का? त्यांना चांगले वाटावे म्हणून आपले वागणे-बोलणे बदलू नका. Just be yourself.

ह्यात मजा अशी आहे (आपल्या मेंटेलिटीची) की मुलगी पुढाकार घेऊन बोलली, चॅट केलं, फोटो शेअर केले म्हणजे ती फार फॉर्वर्ड असणार आणि अर्थातच चांगली नसणार. बाकी किती मुलांबरोबर तिने हेच केलं असणार पण कोणत्याही मुलीला मुलांबद्दल असं वाटत नाही. मुलांनी आणि त्यांच्या घरच्यांनी त्यांना सोयीस्कर असे समज करुन घेतलेले चालतात.

भारतात चाट (Internet Relay Service, irc chat) हे केव्हापासूनच सुरू झालेय. मी १९९६ पासून वापरायला सुरवात केली. इमेल ग्रुप्स होते. इंटरनेट मित्र मैत्रिणींचे गटग व्हायचे. फोटो स्कॅन करून ईमेल द्वारे पाठवण्यात यायचे. चाट वरून मुलं मुली प्रेमातही पडायचे, लग्नही व्हायची. कुणाचे पाहून / भेटून ठरायचे मग ते आपल्या भावी पती / पत्नीला आपल्या चाट ग्रुप मध्ये बोलावून इतर चाट फेंड्सशी ओळखही करून द्यायचे. माझ्या काही मित्र मैत्रिणींची त्या काळी अशी लग्ने झाली.

त्यामुळे आता चाट करते / फोटो शेअर करते म्हणुन नाकारणे वगैरे होत आहे पाहून आश्चर्य वाटले.

वरील sonalisl यांच्या प्रतिसादाशी पूर्ण सहमत.

लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधलेल्या असतात. कोणी कसेही प्रयत्न केले तरी लग्न योग्य वेळ आल्यावरच जुळतात. जास्त विचार करू नये. जे घडेल त्याला सामोरे जा.

सगळ्या कोतबोवर कमेंटीकरून मला आता बोर झालंय पण तुमचा जरा महत्वाचा प्रश्न आहे म्हणून एकच महत्वाचा मुद्दा सांगतोय. मागच्या वर्षी लोकडाऊन लागायच्या आधी औरंगाबादच्या एका स्थळाचं बऱ्यापैकी फायनल झालं म्हणून आम्ही पुण्यात तीन चार वेळा भेटून चर्चा करत होतो पुढच्या सगळ्या गोष्टींवर. एकदा ती पोर स्लिव्हलेस घालून आली आणि माझी थोडी बारीक नजर आहे तर तिच्या दंडांवर बारीक बारीक पांढरे डाग होते. मला शंका आली म्हणून मी थेट विचारले तर तिने उडवाउडवीची उत्तरे दिली . नंतर मी घरच्यांना सांगून चौकशी केली तर तिच्या मामाकडून vitiligo ची हिस्टरी होती. म्हणजे उद्या लग्न करून काहीही आजार जडला असता तर माझी काही हरकत नसती पण आधीच अश्या गोष्टी लपवणे ही शुद्ध फसवणुक आहे. तरी तुम्ही जो कोणी नमुना सिलेक्ट कराल त्याच्या दोन्ही बाजुची मेडिकल हिस्टरी शोधा आणि वाटल्यास सर्व चेकअप करून घेण्याचा आग्रह धरा. थोडा वाईटपणा आला तरी चालेल. मला तर हा करोना पथ्यावरच पडलाय. वर्षभर नो स्थळे, नो किटकिट.

वरील sonalisl यांच्या प्रतिसादाशी पूर्ण सहमत >>>×११११

जास्त विचार करू नका, जेव्हा जे व्हायचे असते तेव्हा ते होते, फक्त घाईत निर्णय घेऊ नका. जोडीदार निवडताना सर्व बाजूने विचार करावा शेवटी आयुष्यभराची कमिटमेंट असते.

पण का कुणास ठाऊक, मला धाग्यातील नकाराचे मुद्दे काल्पनिक वाटतात. असो

मागासलेल्या मुलाशी पुढारलेलं (?) वागायचं आणि पुढारलेल्याशी मागासलेलं. :डोक्यावर हात: हे असंच भोंगळ गोंधळलेलं वागत राहिलात तरी ट्रूथ टेबल प्रमाणे ५०% चान्स आहे योग्य जोडीदार मिळण्याचा. Wink
ऑन सिरियस नोटः हे असले रिक्वायरमेंट बघुन खोटे रेझ्युमे बनवण्यापेक्षा जसं आहात तसं वागलात तर योग्य जोडीदार मिळेळ्याची शक्यता जास्त नाही वाटत का? आयुष्यभर (जितके दिवस एकत्र रहाल तितके दिवस) हे समोरच्याला आवडेलं असं ताटाखालचं गुळमुळीत मांजर व्हायला जमणारे का? ठाम वागुनही कॉम्प्रोमायजेस करता येतात. सिनिअर विंजिनिअर आहात ना! वापरा मग त्यातली स्किल्स.
कुठल्या निर्णयात ठाम रहायचं आणि कुठे लवचिकता दाखवायची तुमची इच्छा आहे त्यावर थोडे दिवस विचार करा, मनाची दोलायमान होण्याची/ सेल्फ डाऊटची सवय असेल तर कारणं लिहुन काढा, की गोंधळात पडल्यासारखं झालं तर रेफरंस राहील.
आई वडिलांना समिकरणातून बाजुला काढा. स्वतःच्या पायावर उभ्या आहात ना? मग यश किंवा अपयश सारी जबाबदारी फक्त आणि फक्त तुमची आहे. आई वडील काही काळ मानसिक आधार देण्यापुरते ठीक आहेत. त्यांना लग्न जमवायला सांगू नका. फार डोकं खात असतील तर त्यांना विचारपूर्वक घेतलेले निर्णय स्पष्ट सांगा. समजतील ते.

Happy एक दोन पाहण्यात लग्न जमावे अशा माझ्याही शुभेच्छाच आहेत पण सर्व लग्नेच्छुंनी विचार करून बघा - साधं ओढणी मॅचिंग घेताना चार- चाळीस तागे काढायला लावतो मग जोडीदार बघताना डबल डिजिट्स मध्ये गेले कुणी तरी आभाळ नाही कोसळत.
अनेक वेळा मुलाने/मुलीने विशिष्ट कालावधीतच लग्न करावे अशी कुटूंबाची अपेक्षा असते. त्यावेळी मुले-मुलीही वेबसाईटस मार्फत एकापेक्षा अधिक मुला-मुलींशी चॅट/संपर्क करत असतात. पंधरा दिवसाची सुटी करून एकदम सगळे 'बघण्याचे' कार्यक्रम करतात. त्यात मग सुरूवातीलाच एखादा मनाजोगता जोडीदार मिळाला की इतरांना लहान-सहान कारणांवरून नकार देणे घडते. ह्यात इतरांची काय चूक? म्हणून 'मी अमुकतमुक केलं म्हणून काम खराब झालं' हा विचार करू नये. हे एक उदाहरण झाले. अशा अनेक तर्‍हा. जे होईल त्याला सामोरे जावे - के सेरा सेरा...

हायला.. माझ्याकडे तर फार किस्से आहेत कांदेपोह्यांच्या कार्यक्रमांचे..
मला टिकली लावायला, बांगड्या किंवा इतर दागिने घालायला आवडत नाही.. कांदेपोह्याच्या कार्यक्रमालाही मी कधी टिकली लावायचे नाही.. त्या कारणामुळे दोघांनी नकार कळवला. अर्थात, मुलांनी नाही पण त्यांच्या पालकांनी.
एकदा मला बघायला येणारी लोकं अर्धा तास वेळेच्या आधी आले..आई किचनमधे पोहे बनवण्यात बिझी होती आणि बाबा साफसफाई करण्यात.. तेव्हा मी दरवाजा उघडला होता.. ते त्यांना फार खटकलं होतं.. खोटं नाही सांगत पण त्यामुळेही नकार मिळालेला आहे Happy
एकदा ॲाफिसनंतर एक मुलगा मला भेटायला ठाण्या येणार होता.. ॲाफिसमधून वेळेवर निघाले पण कळवा ब्रिजवर अडकले आणि पोहोचायला पाऊण तास उशीर झाला.. पहिल्याच भेटीत एवढी रागावलेली व्यक्ती कधी बघितली नव्हती.. कसाबसा माझ्याशी बोलला आणि निघून गेला.. घरी गेल्यावर त्याच्या बाबांनी फोन करून नकार कळवला..कारण काय तर मुलीला वेळेचं बंधन नाही..तेव्हा मला हसू कि रडू झालं होतं Lol
अजून बरेच किस्से आहेत.. पण एवढ्यावरच थांबते..

सांगायचा मुद्दा हा की कधी आपल्याला काही नमुने भेटतील किंवा काहींना आपण नमुने वाटू .. लेकिन, भगवानने हर एक के लिए किसी ना किसी को जरूर बनाया है ह्यावर विश्वास ठेवा आणि कांद्यापोह्याचा कार्यक्रम एंजॅाय करा.

बाय द वे ..मी अजूनही टिकली लावत नाही व मंगळसूत्रही घालत नाही आणि नवऱयासकट माझ्या सासरच्यांना त्यात काहीही चूकीचं वाटत नाही.

>>> हे झेपलं नाही.काही ठरण्याआधी चॅटिंग्,फोटो जरा ऑड वाटलं. २७ रनिंग आहे म्हणजे बर्‍याच लहान आहात.फिकीर नॉट!<<
देवकी, ह्यात काय न झेपण्यासारखे?
डिजिटल जगात कॉमन आहे. मैत्री झाली की ज्यास्त मोकळपणा येतो, कळतो. अर्थात समोरच्या मुलाचा/मुलीचा अंदाज ( बर्‍यापैकी बेसिक माहीती गोळा साईटवरून ) व दोन्हीकडून संमती असेल तर काय वाईट?
आताशी सर्वच असे प्रेफर करतात, पोहे बनवण्यात वा करून घालण्यात वेळ घालवत नाहीत.

सोहा, +१

>>>> पण असे शुल्लक गोष्टींचा चुकीचा अर्थ काढणा-यांशी सोयरिक हवीच कशाला? चुकीचा अर्थ काढलाच तर विचारून शंका निरसन करून घेण्याचा समजूतदारपणा नको का? <<<
+१

अमृताक्षर,

मी हेच तर सांगतेय तरी तुम्ही परत परत तेच, चांगली फॅमिलीचा गैरसमज?
चांगली फॅमीली जर असेल तर असे गैरसमज करून शिक्के मारून निघणार नाही... हे लक्षात घ्या.

बरीच लोकं असतात अशी काही विचार न करता , आपला नकार सांगणारी, आमच्या घरी हे चालत नाही, ते चालत नाही.
तु बोलण्यात अशी वाटलीस / तशी वाटली. झालेत असे किस्से कितीतरी ओळखीतच.

मलातरी , नकाराचे मुद्दे काहीही खोटे वाटले नाहीत.
इतकी मुर्ख, मागासलेली व खोटा आधुनिक विचारांचा बुरखा घातलेली लोकं आहेत आणि अजुनही, अश्या पट्ट्याची, अश्या बोलण्याची मुलगी बरी असे विचार घेवून वावरणारी माणसं कमी नाहीत. स्लीवलेस्स वाली मुलीला संस्कार नाहीत, लिपस्टिवाली आगाउ वगैरे वगैरे.

—-
माझ्या चुलत मावशीच्या मुलीला भेटलेला असा नग.
इतका मेकअप आमच्या घरात चालत नाही, फॉरवर्ड समजतात असे तोंडावर सांगणारा.
मावशीच्या मुलीने नकार दिल्यावर मावशी चिडलेली. बहिणीने पुर्ण स्टोरी मला सांगितली.
बर्‍यापैकी जुन्या वळणाची मावशीचे मत असे की, जरा जमवून घ्यायचे. मेकअप नाही आवडत काही जुन्या लोकांना असे म्हणत बसलेली.
मी , मावशीला म्हटले, आता मुलीचा मेकअप आवडत नाही, नंतर चालणं आवडत नाही सांगतील.
प्रोफाईलमध्ये, फोटोत मुलगी आधुनिक रहाणीमानाची आहे दिसले मुलाला ना? मग कशाला करायचा कॉन्टॅक्ट?

झमपी तुम्ही कोणत्या जगात आहात?
अरेंज मॅरेज मध्ये अजूनही कांदा पोहे कार्यक्रम होतोच... मग तुम्ही खेड्यात असा वा शहरात...

म्हाळसा भारी किस्से.
पण का कुणास ठाऊक नाकारण्याचे एवढेच कारण नसावे, तुम्ही काहीतरी खोडी केली असणार असे वाटते Wink Light 1

जोक्स अपार्ट मलापण मी मुलींना भेटलो (काही बघितल्या - म्हणजे कांदेपोहे) त्यावेळचे काही गमतीदार किस्से आठवले.
यावर वेगळा धागा हवा एक.

सगळ्यांचे आभार.. बऱ्यापैकी माहिती मिळाली आता कसाही नमुना भेटला तरी डील करता येईल अस वाटत.
जिद्दु बर झालं हा मुद्दा सांगितला..माझ्या डोक्यात आले नव्हते हे

फार विचार करू नकोस.be yourself, know the person well. काहींना भेटून अनुभव आल्यावर एक चांगला माणूस नक्की भेटेल.
बाकी मेकअप वाला फोटो आवडून मग कॉन्टॅक्ट करणाऱ्या आणि नंतर 'मेकअप चालत नाही, बदलावं लागेल' वाल्या माणसांमध्ये फारसा अर्थ नाही.

अमृताक्षर, लग्न लवकर ठरावे , जास्त मुलं बघायला लागू नये असे वाटणे साहजिक आहे.
पण हे थोडं लकवर पण असेल. म्हणजे परीक्षेला आपण ऑपशनला टाकलेल्या भागावर प्रश्न येणे, किंवा जाताना अपघात होऊन उशीर होणे या आपल्या हाताबाहेरच्या गोष्टी आहेत, तसंच काहीसं.
तुम्ही लिहिलेले अनुभव येत असतात. मलाही एकाने स्पष्ट सांगितलं होतं की, "ऑफिसमध्ये वावरताना साडी अवघड पडत असेल तर पंजाबी ड्रेस ठीक. पण घरी मात्र साडी नेसायची. स्त्रीचं सौंदर्य साडीतच दिसत" म्हणजे जीन्स, स्कर्ट वगैरेचा विचारच नाही. एकाने माझा पहिल्या नोकरीतला पगार कमी, एकाने 12 पीसीएम ला 90%च्या वर मार्क नाहीत, एकाने मी रोज एका वेळी तरी सगळा स्वयंपाक करते का यावर, "नाही , शनिवार, रविवार किंवा मूड असेल तर करते" , असे उत्तर दिले म्हणून नकार दिला. अजून बरीच उदाहरणे आहेत. पण त्यातली अतरंगी उदाहरणे सांगितली.

मीही 3-4 वर्षे स्थळे बघून वैतागले होते. कोणाचा फोन आला तरी रडायला सुरुवात करायचे. घटस्फोटित, विधुर वयाने 45-55ची अशी स्थळे स्वतःच शोधून कॉन्टॅक्ट करायला लागले, किंवा कोणाला भेटल्यावर घरच्यांनी त्याच्याबद्दल मत विचारले की मला माहित नाही, मी विचारच केला नाही, असेच उत्तर द्यायला लागले. मग आईने सरळ मला ब्रेक दिला ६ महिने अजिबात स्थळं पहिली नाहीत. नंतर सगळं सुरळीत झालं.
आता वाटते, इतकं मनाला लावून घ्यायची गरज नव्हती, पण सगळ्या मैत्रिणींची लग्न होत आहेत आणि आपणच राहिलो, अशा भावनेमुळे लग्नाचं महत्व मीच विनाकारण वाढवून ठेवलं.

स्थळं बघणं हा जॉब सारखाच एक भाग म्हणून घ्या. कोणाला नकार दिल्यावर किंवा कोणाचा नकार आल्यावर त्याच्या बाजूने विचार करू नका - म्हणजे आपलं काय चुकलं असेल, त्याने काय अर्थ काढला, का नकार दिला असेल, हा विचार अजिबात जर नका. फारतर आपल्याला नक्की कसा मुलगा नको ते मनाशी अजून ठाम करा आणि पुढच्याशी मीटिंग ठरवा.
अजून एक शक्य असेल तर मुलाला एक दोनदा बाहेर एखादया सार्वजनिक ठिकाणी भेटा. ओके वाटलं तर घरच्यांना भेटा. त्यामुळे स्थळं बघणे या गोष्टीचा ताण थोडा कमी होईल.

Pages