काय मिळतं वाचून?

Submitted by पाचपाटील on 11 March, 2021 - 04:09

'काय मिळतं रे वाचून?'
किंवा 'कसं काय वाचत बसतो रे एवढा वेळ?'
ह्या अर्थाचे प्रश्न विचारले जातात मला कधीकधी.. म्हणून म्हटलं, जरा शोधून बघू की काय कारणं असतील की
ज्यामुळे मला पुस्तकांशिवाय राहणं जमतच नाही...

म्हणजे 'मी का वाचतो ?' वगैरे

तर..
वाचन ही एकच गोष्ट अशी आहे की मी ज्यात इंटरेस्टेड आहे, म्हणून वाचतो.

पुस्तकांशिवाय मला फार पोरकं पोरकं वाटतं, म्हणून वाचतो.

मला सतत नवनवीन लेखक / लेखिकांच्या जबरदस्त प्रेमात पडायची खोड आहे म्हणून वाचतो.

एखाद्या गोष्टीबद्दल मला फारच थोडं माहिती आहे, असं मला स्वत:लाच आतून वाटावं म्हणून वाचतो.

चाकोरीबद्ध जगण्यातल्या कटकटींवर उतारा मिळावा म्हणून वाचतो.

माझी कुणी सहज दिशाभूल करू नये म्हणून वाचतो.

मी कधी दंगलखोर होऊ नये म्हणून वाचतो.

माझ्यात सदैव एक भावनिक ओल टिकून रहावी म्हणून वाचतो.

माझ्यात कधीही निर्बुद्ध आक्रस्ताळेपणा येऊ नये म्हणून वाचतो.

कधी स्वत:चं भान यावं म्हणून वाचतो.

कधी काळाचं भान हरवावं म्हणूनही वाचतो.

कधी स्वत:चा अपुरेपणा कळावा म्हणून वाचतो.

कधी माझ्यापासूनच सुटका करून घेण्यासाठीही वाचतो.

खरं तर मी आतल्या आत वठत जाऊ नये म्हणून वाचतो.

आणि वाचता वाचता कधीतरी एखाद्या वाक्यानं जगणं लख्ख उजळून निघतं म्हणूनही वाचतो...!

तुमचं कसं असतं? तुम्ही का वाचता?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे कुणीतरी या पाचपाटील आय् डी च्या माणसाला कान धरून परत आणा रे माबोवर....
डोक्याला भुंगा लावणारे अचाट लिखाण माबोवर टाकायचे आणि मधेच हौदिनीसारखे गायब व्हायचे... हे वागणं बरं न्हव

खुप वाचून मानुस मूर्ख बनतो.
पुस्तक कीडा असनारा मानुस वेवहारात झिरो असतो
अशा मानसांना सौदे करता येत नाहित.
समोरच्या मानसाशि कस बोलायच कळत नाहि.
पुस्तकात आयुश्य काल्पनिक असत.
खरं आयुश्य चैलेंज असत.
पुस्तक वाचुन मानुस कल्पना जगात राहतो.
रिअलमधे मानसांना भेटायला लागत.
जेव्हढी जास्त मानस जमवा तेवढे यश भेटते
शरद पवार साहेब, आदरणीय ठाकरे साहेब.
आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज जर पुस्तक वाचत बसले असते तर तुम्ही आम्ही स्वतंत्र झालो असतो का?
त्यांनी लढले म्हनुन आपन गादीवर
लोळत त्यांच्यावर लिहिले पुस्तक वाचु शकतो.
ज्यांनी पुस्तक वाचनात वेळ घालवला नाहि
त्यांच्या वर जास्त पुस्तक छापतात.
एसीत गादीवर लोळत वाचनारावर
कुत्र पन पुस्तक लिहित नाहि.

^^Disgusting
@ topic - You made my day. nice.

Pages