राधे सिरिज युट्युब चॅनलवर

Submitted by अवल on 5 March, 2021 - 03:37

नमस्कार
राधे ही सिरिज (https://www.maayboli.com/node/51393) नोव्हेंबर २०१४ मधे, लिहायला सुरुवात केलेली; इथे मायबोलीवरच. मायबोलीकरांच्या उत्स्फुर्त प्रतिसादांमुळे मी पुढे पुढे लिहित गेले. ही सिरिज नुकतीच एका मैत्रिणीने, रसिका काकतकर हिने वाचली अन तिने चंगच बांधला की याचे अभिवाचन करायचे. रसिकाने पाठपुरावा केला; केवळ त्यामुळेच हे व्हिडिओ प्रत्यक्षात येऊ शकले. तिच्या मैत्रिणींच्या युट्युब चॅनलवर ही सिरिज प्रसारित करण्याचे ठरले. मग मीही माझी तोडकीमोडकी चित्रकला आणि ॲनिमेशन स्किल वापरायचं ठरवलं.

अन मग बरोब्बर पाच वर्षांनंतर ही सिरिज दृकश्राव्य करण्याचा मुहूर्त लागला. पण तरीही प्रत्यक्ष काम सुरु झालं ते डिसेंबर २०२० मधेच
मग डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यात अनेक मित्रमैत्रिणी, बहिणी यांना कामाला लावलं. आणि अवघ्या दोन महिन्यात ही संपूर्ण सिरिज तयार झाली.

दरम्यात संबंधित चॅनलचे फेब्रुवारीचे कार्यक्रम ठरलेले असल्यामुळे आज ५ मार्च रोजी ही सिरिज पब्लिश होते आहे.
राधे सिरिजचे लेखन इथल्या अनेकांना आवडले होते; तेच आता दृकश्राव्य स्वरुपात कसे वाटतेय जरूर सांगा. सदर व्हिडिओजमधे प्रतिसादात लिहिलेत तरी आवडेलच.

या निर्मितीमधे सगळे हौशी कलाकार आहेत. प्रत्येकाने वेळात वेळ काढून,खुप कष्ट करून हे व्हिडिओज छान करण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्वांचे आभार मानण्यापेक्षा त्यांच्या प्रेमाच्या ऋणातच रहायला आवडेल Happy

मायबोलीवरील मी,अगो आणि चैतन्य दीक्षित आम्हा तिघांना तुम्ही ओळखताच. यासोबत इतरही मित्रमैत्रिणींनी यात महत्वाचा वाटा उचलला आहे.

सर्व सदस्यांची माहिती:
युट्युब चॅनल - वाचन रंजन
लेखन - आरती खोपकर (अवल)
अभिवाचन : रसिका काकतकर, आरती खोपकर, केतकी वझे, अश्विनी गोरे ( अगो), प्राची रेगे
बासरी - चैतन्य दीक्षित
सिंथसायझर- सीमा खिरे, शुभांगी ताम्हणे
इतर पार्श्वसंगीत,चित्र आणि व्हिडिओ संकलन - आरती खोपकर ( अवल)

https://youtu.be/QQkl-Cxo090
https://youtu.be/3KjqLBV-F_k
https://youtu.be/8D49N0mMrUA
https://youtu.be/rKLH7l1n7UI

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद सर्वांना Happy
अमुपरी, जुनं लिखाण आहे; बहुदा तुम्ही माबोवर येण्याआधीच Happy

अतिशय सुंदर लिखाण !! खूपच आवडले. अभिनंदन !!

रसिकाना मी आमच्या म्युनिकच्या नाट्यवाचनाच्या ग्रुपमधून ओळखतो , त्यांच अभिवाचन नेहमी ऐकत असतो.
त्यामुळे हे सगळे व्हिडिओ पाहिले होते.

इथे हा लेख पाहून खूप छान वाटले !

पुन्हा एकदा अभिनंदन !

अरे वा केदार खुप धन्यवाद Happy
बाय द वे तुमचं जर्मन शिकवणं खुप छान आहे मी १-२ च व्हिडिओ बघितले पण मजा आली। तुमचा वजनाबद्दलचा धागा मला जरा जागं करत असतो अधूनमधून Wink

"राधेss!' आवडली संपुर्ण मालिका
लिखाण तर आवडलेलं होतंच आधी
त्यात भर अभिवाचनाची. आणि प्राचीचे कविता वाचन, चैतन्यची सुरेल साथ आणि top of the cherry अगोचा आवाज. सुरेख मोट बांधली गेलेय सगळ्याची

अभिवाचन आणि पार्श्वभूमीवर बासरीची सुरावट जोडीला गायन व सुंदर चित्रे.. व्वा. अवल, तुमच्या राधेने मोहून टाकलं.