एकाग्रता (Concentration)

Submitted by मिरिंडा on 5 March, 2021 - 00:31

एकाग्रता आयुष्यात सारखी लागतच असते. आजूबाजूचे लोक सारखे सांगताना दिसतात. " अरे चित्त एकाग्र करा. Concentrate on the subject. किंवा Focus करा. " फोकस हा आधुनिक शब्द. पण अर्थ एकच. मात्र हे कोणीही सांगत नाही. एकाग्रता करा म्हणजे नक्की काय करा.

एखाद्या वस्तूकडे पाहात राहिलं तर ती दिसेनाशी होते.हा अनुभव येतो. तोच प्रकार विचारांचा आहे. एकाच विचाराकडे सतत पाहात राहीलं तर माणूस तिथेच स्थिरं होतो. त्यांचं देहभान हरपतं. आणखी तो विचार नष्ट होतो. व तंद्री लागते. हे सगळं म्हणजे एकाग्रता नाही. तर विषयाचं सर्वांगिण (आपल्या क्षमतेनुसार सर्व बाजूंनी दिसणारे) स्वरूप जाणून घेत एखादं काम करणं म्हणजे एकाग्रता. कार्यालयीन कामात यांचा अनुभव चांगलाच येतो.कामाबाबत आपल्या जवळ क्षमतेनुसार असलेली माहिती (म्हणजे Data) आणि नवीन माहिती लक्षात घेऊन काम केल्यास त्यात त्रुटी(Lacunas) राहत नाहीत. आणि काम यशाप्रत नेता येते. एखाद्या कामात जर कार्यालयाबाहेर जायचं असेल तर त्या जागेची जाणीव (Feel) करुन घेत आपल्या जवळची सगळी माहिती वापरुन जर काम केलं तर उत्तम यश येतं असं आढळून आलं आहे. फोकस करा, चित्त एकाग्र करा म्हणजे हे असं करावं लागतं.सगळ्या कामामध्ये हीच पद्धत उपयोगी पडते. अगदी देवपुजेत सुद्धा.

अरुण कोर्डे ९००४८०८४८६

Group content visibility: 
Use group defaults