भारत का दिल देखो : चावल के फरे (पाककृती)

Submitted by मनिम्याऊ on 3 March, 2021 - 11:58
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

फरे करण्यासाठी
सुवासिक तांदळाचे पीठ १ कप
शिमला मिरची 1 (बारीक चिरलेली)
1 लहान गाजर ( बारीक चिरून / किसलेले)
दही 2 मोठे चमचे
मीठ चवीनुसार

फोडणीसाठी
लसूण 5-6 पाकळ्या ठेचून
2 मिरच्या बारीक चिरून
जीरे 1 लहान चमचा
कढीपत्ता
तेल 2 चमचे

क्रमवार पाककृती: 

भारत का दिल देखो या माझ्या मध्यभारताविषयी असलेल्या मालिकेत सादर आहे छत्तीसगढ़ राज्यातील 'धान की कटोरी' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भागातील एक नवी पाककृती. हा पदार्थ आपल्या महाराष्ट्रातील गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत देखील आवडीने खाल्ल्या जातो.
चावल के फरे
फरे करण्यासाठी प्रथम तांदळाच्या पीठात चिरलेली सिमला मिरची व गाजर घालून एकत्र मिसळून घ्या. इतर हव्या त्या भाज्या देखील घालू शकता. आता त्यात दही आणि चवीला मीठ घालून थोडे थोडे गरम पाणी घालत पीठ मऊसर मळून घ्या.
मळलेल्या पीठाचे लांबट आकारात गोळे (फरे) बनवून घ्या. एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवा त्यावर एका चाळणीत फरे ठेवून साधारण 20 मिनिटे वाफवून घ्या.
फरे जरा थंड होऊ द्या.

एका फ्रायपँनमधे 2 चमचे तेल घाला. तेल तापले की त्यात जीरे तडतडून घ्या. ठेचलेला लसूण, बारीक चिरलेल्या मिरच्या आणि कढीपत्त्याची फोडणी करा व त्यात फरे घाला. खमंग होईपर्यन्त परतून घ्या.

हिरवी चटणी किंवा सॉस बरोबर घेऊन खा.
IMG_20210303_211747.JPG

वाढणी/प्रमाण: 
2 जणांसाठी
अधिक टिपा: 

फरे दोन पद्धतीने केले जातात. एक वरील पद्धतीने वाफवून आणि दुसर्या पद्धतीत stuffing करून डीप फ्राय करतात.
ही छत्तीसगढ़ मधली पारंपरिक पद्धतीने बनवलेली डिश आहे. एकदम कमी तेलातली आणि पौष्टिक.

माहितीचा स्रोत: 
पारंपरिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy ही तर तांदळाची "न्योकी" की. छान आहे.
(मी खाल्ले आहेत. पण ते बहुतेक पीठाऐवजी उकडीचे होते. विचारावे लागेल.)

मस्त रेसिपी.
 ही तर तांदळाची "न्योकी">>>  +1 अंडे व बटाटे नसलेली आपली न्योकी. Happy छान दिसतेयं.

सगळ्यांचे खूप आभार. नक्की करून बघा आणि इथे सांगा

ही तर तांदळाची "न्योकी">>> खरंय. कधी हा विचार नाही केला Lol .