वेलकम होम नावाचा मराठी सिनेमा (सुमित्रा बर्वे यांचा) ऑनलाईन कुठे पाहता येईल का?

Submitted by jpradnya on 1 March, 2021 - 16:35

बाय अथवा रेन्ट करून .....फुकट नव्हे अर्थातच!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

SonyLiv वर उपलब्ध आहे, Premium subscription घ्यावे लागेल.
महिन्याचे ₹ २९९, वर्षाचे ₹९९९

सुमित्रा भावे यांचा वेलकम होम

सुमित्रा भावे यांचा वेलकम होम सध्या कुठेही ऑनलाईन उपलब्ध नाही. येत्या दोनेक महिन्यात तो ऑनलाईन बघता येईल.
सोनीलिव्हवर असलेला वेलकम होम हा हिंदी हॉरर चित्रपट आहे. त्याचा सुमित्रा भावे यांच्या चित्रपटाशी संबंध नाही.

सोनीलिव्हवर असलेला वेलकम होम हा हिंदी हॉरर चित्रपट आहे. >>
ओह! बरं झालं मी सोनी लिव्ह सबस्क्रिप्शन घेतलं नाही. काही दिवसांपूर्वी या चित्रपटासाठी घेण्याचा विचार केला होता. धन्यवाद.

सोनीलिव्हवर असलेला वेलकम होम हा हिंदी हॉरर चित्रपट आहे. >>
ओह! बरं झालं मी सोनी लिव्ह सबस्क्रिप्शन घेतलं नाही. काही दिवसांपूर्वी या चित्रपटासाठी घेण्याचा विचार केला होता. धन्यवाद.

मराठी चित्रपटाचे नाव वेलकम होम असे का असावे? स्वागत आहे या घरी असे काही तरी टॅग लाइन तरी द्यावी.

मराठी चित्रपटाचे नाव वेलकम होम असे का असावे? स्वागत आहे या घरी असे काही तरी टॅग लाइन तरी द्यावी.
>>>

टॅगलाईन हा शब्दही ईंग्रजीच असल्याने त्यांनी शीर्षकच ईंग्रजीत दिले असावे Happy

जोक्स द अपार्ट,
हिंदी सिनेमांचे नावे असतात ईंग्लिशमध्ये. पण आपण मराठी चित्रपटांबाबत बरेचदा शीर्षक मराठीत असावे यासाठी आग्रही असतो. चित्रपटच नाही तर मायबोलीवर एखाद्या कथेला लेखाला हिंदी ईंग्लिश शीर्षक दिसले तरी ते काही जणांना खटकते. असे का? हवे तर यावर वेगळा धागाही काढू शकतो Happy

सर्व प्रतिसादासाठी धन्यवाद!
गूगल ने नीट उत्तर दिलं नाही (किंवा त्याचं उत्तर मला कळलं नसेल बहुतेक).
सुमित्रा भावे यांचा चुकीचा उल्लेख केल्या बद्दल क्षमस्व.
चित्रपटाचा ट्रेलर आणि स्टार स्टडेड कास्ट खूप म्हणजे खूपंच इंटरेस्टिंग वाटला.
बाई चं "स्वतःच" घर कोणतं हा विषय जवळचा वाटला म्हणून हा अट्टाहास. वाट बघावी लागेल असं दिसतंय !
पुन्हा एकदा धन्यवाद !

स्टार स्टडेड कास्ट खूप म्हणजे खूपंच इंटरेस्टिंग वाटला.>> सोमणांचा मि लिंद नाही ना? त्या संहिता मध्ये उगीच बिचार्‍याला नको ते शॉट आहेत.
बघवत नाही अगदी .