शुन्य टिंब एक

Submitted by नीळा on 15 February, 2021 - 08:36

सगळ्यात महत्वाचे म्हणजे माफी मागणे. पहिल्यांदा ज्या आयडी चा अकाऊंट माम्ही हॅक केलाय म्हणजे नीळायांचा..सर माफ करा पण माम्हचा पण नाईलाज आहे…माम्हची कहाणी ऐकली की तुला कळेलच…समजुन पण घ्यालच. दुसरी गोष्ट म्हणजे ईतर सगळ्या वाचकांना…. माम्हची भाषा तोडकी मोडकी वाटते ना?…म्राठी हि काही माम्हची योनभाषा नाही…आणि माम्हच्या दुनिया मधल्या काही संकल्पना.. शब्द तुच्या भाषेत नाहीतच. तर थोड समजुन घ्या… हळूहळू सवय होईल, माम्हालाहि आणी तूलाही.
ईथेच कहाणी षांगायच मुख्य कारण म्हणजे यक्क.
युनायटेड पासुन ईतक्या लांब असलेल्या, युनीनेट वरच काय….आमच्या नकाशावर पण नसलेल्या… एका बाजूला असलेल्या…जेमतेम पसरलेल्या नेटवर्कमध्ये यक्क माम्हला शोधत येईल हि शक्यता कमीच आहे. पण यदादकाचीत शोधलच यक्कने माम्हाला तर चांगलच आहे..ते पण एक सांगायचे आहे तुला.
सुरवाती पासुन सगळे संगतवार सांगतो….माम्हचे नाव….म्राठीमधे लिहीणे कठीण आहे….माम्हच्या ईकडे अवकाशाचा रंग असतो त्या वरुनच माम्हचे नाव ठेवले आहे..
रकच्याने ही आयडी चोरायचे ते पण एक कारण आहे….जवळीक वाटली..
अवकाश आणि काल यात एक छोटी खीडकी मीळते माम्हला कधीतरी…आणी फक्त या नेटवर्क वर येता येते कसेबसे. पण हे नेटवर्क युनीनेटला जोडलेले नाही.
तरीही चांगली माणूस आहात तु..माम्हला मदत कराल अस वाटतय. आणि नाहीतरी …काय म्हणता तु…दिल का बोझ तरी हलका होईल…

या सगळ्याची सुरवात झाली माम्हाला झीब भेटण्याने.झीब माम्हच्या बरोबरच होत शीकायला. खुप हुशार होत ते पण नंतर ते भयंकर आजारी असल्याचे कानावर आल. त्यांच्या पैकी सर्क्युलेशन खराब झाल होत..
अरे हो एक महत्त्वाचे सांगितले नाही माम्ही. माम्हचे शरीर तु सारखेच आहे जवळपास.. फक्त थोडेफार बदल आहेत. तुच्या शरीरातील सीस्टीमस..रेस्पी… सर्क्युलेशन, डायजेशन सगळ्या
माम्हच्या शरीरात आहेत..सगळीकडे युनायटेड भर तशाच आहेत बहुतेक
तुझ्या सगळ्या सीस्टीमस एकच सेंट्रल प्रोसेसर कंट्रोल करतो..मेंदु म्हणतो तु म्राठीत.
माम्हच्या प्रत्येक सीस्टीमला एक छोटासा वेगळा मेंदु हाताळतो…आणि म्हणून मुख्य मेंदूला आलतु फालतु काम करायला नाही लागत. फक्त वीचार करायचा….कदाचित तुमचा मेंदू हालचाल.. अन्नपचन…सेक्स.. रीप्रोडकशन या बेअकली कामात गुतुन रहातो म्हणून तुम्ही ईतके मागास आहात…. काय म्हणता तुम्ही…असो!
आता थोड कठीण आहे समजावून स़ागणे….प्रयत्न करतो माम्ही.
तु आणी तुझ शरीर तु वेगळ मानतो..बोलताना माझा हात…माझ डोक..माझ ह्रदय.. अस बोलतो तु…आणी मग आमच घर…आमची सोसायटी.. आमची गच्ची वगैरे…
माम्हचा प्रत्येक सीस्टीम हाताळणारा मेंदू पण हळूहळू थोडा प्रगत झाला आहे…प्रत्येक मेंदु थोडा थोडा वीचार करायला लागला स्वतंत्र पणे पण मग गोंधळ होऊनये म्हणून मुख्य मेंदु सगळ्यांना साभाळतो…म्हणजे तुच्या भाषेत मी पण आणि आम्ही पण…
मला म्राठीतला मी आणि आम्ही पण पटला नाही…तुच्या भाषेत शब्दच नाही तसा…म्हणुन माम्ही अस वापरतो.
तर माम्ही युनायटेड च्या कडेवर बाहेरच्या बाजूला असलेल्या एका सीस्टीम चे आहोत. माम्ही आमच्या जगाला जे म्हणतो त्याचा अनुवाद म्राठी मध्ये साधारण जमीन…धरा असा करता येईल. तुमच्या जगासखच आहे आमच जग…म्हणुनच तर माम्ही….ते येईलच पुढे.
तर शीक्षण पुर्ण करून नोकरीच्या शोधात होतो माम्ही. एका ठीकाणी गेलो होतो मुलाखातीला तीथे झीब भेटला अचानक. तसाच गबाळ्या कपड्यात होता. पण त्याच्या लुकलुकत्या डोळ्यात तेच तेज होत. आणि थोडा हरवले पणा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults