Submitted by दिव्या१७ on 15 February, 2021 - 00:34
मी बरेच मिक्सर, फूड प्रोसेसर, ज्युसर वापरले पण आजपर्यंत परिपूर्ण असे मिक्सर ग्राइंडर मिळालेच नाही.
बजाज फूड प्रोसेसर २-३ वर्षात खराब झाला, त्याचा एक पार्ट गेला तो मिळालाच नाही शेवटी बदलून टाकला, प्रेस्टिज मिक्सर ग्राइंडर विथ ज्युसर घेतला १ वर्ष छान चालला आता इडली पीठ ग्राईंड करताना तो ३-४ वेळेस बंद पडतो.
मला इडली पीठ एकावेळेस न बंद पडता ग्राईंड करणारा, चटणी, रोजचा मसाला छान पेस्ट करणारा आणी महत्वाचे पॅक झाकण असलेला मिक्सर ग्राइंडर रोज वापरायसाठी हवा आहे, प्लीज तुमचा वापरात असलेला चांगला ग्राइंडर सुचवा आणि फूड प्रोसेसर ही
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मी वर सांगितलेल्या प्रीती
मी वर सांगितलेल्या प्रीती मिक्सर मध्ये दोन option असतात स्टील आणि प्लास्टिक जार असे. किंमतीत थोडा फार फरक असतो.मी स्टील घेतला आहे कारण बॅग आपटा आपटी मध्ये आणताना सेफ रहावा म्हणून आणि कालांतराने प्लास्टिक मध्ये ग्रेव्ही चे वास मुक्काम ठोकतात अस मला वाटत म्हणून.
थँक्स मंजूताई, स्वाती आणि
थँक्स मंजूताई, स्वाती आणि बिल्वा.
बिल्वा, मिक्सर देशात खरेदी करणे शक्य नाही , इथेच घ्यायचाय. एमॅझॉन किंवा तत्सम ऑनलाईन खरेदी/ शिप टु स्टोअर.
स्वाती, निन्जाचे कुठले मॉडेल ?
परत तोच प्रश्न विचारते आहे,
परत तोच प्रश्न विचारते आहे, चांगला दणकट मिक्सर सुचवा. सध्या अमेझॉनचा सेल पण सुरू आहे. त्यामुळे घेईन म्हणते
प्रिथी चा घ्या. टिकाऊ खूपच.
प्रिथी चा घ्या. टिकाऊ खूपच. आणि त्याची प्लास्टिक झाकणे २ एक्स्ट्रा घ्या.
दुसर्या धाग्यावर हाच प्रश्न
दुसर्या धाग्यावर हाच प्रश्न विचारला आहे. (ऑनलाईन खरेदी).
अॅमेझॉन फेस्टीवल चालू आहे. अल्ट्रचा एक कोनिकल स्टोन ग्राइंडर युट्यूबवर पाहिला होता. डिस्काउंट आहे. ईएमआय पण आहे.
मिक्सर मधे डाळ कट होते, स्टोन ग्राईंडवर जात्याप्रमाणे दळून निघते अशी माहिती आहे. कुणी वापरला असेल तर (डिस्काउंट असेपर्यंत) उत्तराची अपेक्षा आहे.
माझ्याकडे आहे अल्ट्राचा वेट
माझ्याकडे आहे अल्ट्राचा वेट ग्राईंडर. खूप छान पीठ होते. घरी इडली-दोसे आवडतं असतील तर जरूर घ्या.
बघतो आता डिस्काउंट चालू असेल
बघतो आता डिस्काउंट चालू असेल तर.
डोसे, इडली शिवाय आणखी काय बनू शकते?
मलाही इंटरेस्ट आहे या वेट
मलाही इंटरेस्ट आहे या वेट ग्राइंडर मध्ये.
इडली डोस्यांसाठी.
प्लीज चांगले मॉडेल सांगा.
कुविंग्स चा ब्लेंडर बऱ्याच
कुविंग्स चा ब्लेंडर बऱ्याच गोष्टींना चांगला पर्याय आहे, इडली / डोसा बॅटर चांगले होते, नारळाचे दूध काढायला पण बेस्ट आहे, मिल्क शेक पण मस्त होतात, ड्राय पॉट मध्ये अगदी मिरची पूड पण होते, कॉफी बीन्स पण चांगले होतात ( (अगदी कॉफी ग्रँडेर सारखे होत नाहीत , कारण भांडे मोठे आहे , भरपूर बीन्स घातल्या तर होईलही ), मसाले छान बारीक होतात. गेले ८ महिने तर वापरतोय, एकदम रेकमंडेड आयटम आहे. फक्त तो ६० सेकंड पेक्षा जास्त कन्टीनुएस वापरता येत नाही, पण ३० सेक च्या आधीच काम झालेला असत.
तसेच कुविंग्स चा कोल्ड प्रेस
तसेच कुविंग्स चा कोल्ड प्रेस ज्युसर पण बेस्ट आहे, गेले वर्षभर वापरात आहे, सगळे ज्यूस मस्त निघतात. फक्त वापर होणार असेल तर घेण्यासारखा आहे.
https://www.amazon.in/Kuvings-Professional-Press-Juicer-B1700/dp/B07DLCZ...
माझ्याकडे अय्यर कंपनीचा वेट
माझ्याकडे अय्यर कंपनीचा वेट ग्राईंडर आहे. त्यात इडली डोसे बॅटर, नारळ खवणे आणि कणीक मळणे करता येते (मी कणीक मळणे सोडून बाकी कामे करते) पुण्यातला ब्रॅंड आहे. मला मुंबईत होम डिलीव्हरी मिळाली होती. ॲमेझॉन फ्लिपकार्टवर मी तरी हा ब्रॅन्ड बघितला नाही. मला माबोकरांपैकीच कोणीतरी रेकमंड केला होता. एकदम मस्त आहे प्रॉडक्ट. फक्त ते (कोणताही वेट ग्राईंडर) ठेवायला जागा आहे का आणि कुठे ठेवता येईल हे आधी डिसाईड करा कारण तो बऱ्यापैकी जड असतो. रोज वापरात नाही आणि ओट्यावर किंवा वर टेबलवर जागा नाही म्हणून खाली कुठेतरी ठेवू आणि लागेल तेव्हा काढू असा विचार केला की तो त्याच्या वजनामुळे कमी वेळा काढला जातो.
Hi
Hi
मला मिक्सर विकत घ्यायचा आहे.
सध्या कोणता मिक्सर चांगला आहे सांगू शकाल का कोणी??
अनेक इन्फ्लुएन्सर्स अ
अनेक इन्फ्लुएन्सर्स अॅटमबर्गच्या मिक्सरची जाहिरात करताहेत. त्यांचे पंखे मी घेतलेत आणि ते छानच आहेत. तेव्हा याचाही विचार करा.
यात वाटण पाट्यावर वाटल्यासारखं मिळावं असं एक पर्यायी सेटिंग आहे.
Preethi छान आहे. ..
Preethi छान आहे. ..
आमच्या पिढीच्या आठवणीत
आमच्या पिढीच्या आठवणीत पाट्यावर वाटलेलं कसं लागतं याचा काही रेफ्रन्सच नाही. सगळे जण म्हणतात म्हणून काहीतरी भारी असेल म्हणायचं इतकंच.
पाट्यावर पाणी न घालता/ अगदी कमी घालून चटणी तयार होते तशी आमच्याघरी ४० वर्षांपूर्वीच्या मिक्सरवर होतं असे असं ऐकिवात आहे. हल्लीच्या मिक्सरला चटणीत पाणी लागतं असे आजी म्हणत असे. ते हल्लीचे ही ३० वर्षांपूर्वीचे हल्लीचे आहे.
>>>>>>>आमच्या पिढीच्या आठवणीत
>>>>>>>आमच्या पिढीच्या आठवणीत पाट्यावर वाटलेलं कसं लागतं याचा काही रेफ्रन्सच नाही.
मला आहे रेफरन्स दॅट रिमाईंडस मी कदाचित आपल्यात कमीत कमी १५-२० वर्षांचे अंतर असेल. कारण आई, साबा वाटण करत व मीसुद्धा पाट्यावर वाटलेले आहे. जर मिरची नसेल तर मजा येते वाटायला. मिरचीने मात्र हात झोंबतात.
सुजाताचे मिक्सर चांगले आहेत.
सुजाताचे मिक्सर चांगले आहेत. बजाजचा मिक्सर मध्यंतरी काही दिवस वापरायचा योग आला. तोही चांगला वाटला.
अटॉनबर्गचा मिक्सर कोणी घेतलाय
अटॉमबर्गचा मिक्सर कोणी घेतलाय का?
दिवाळीत ६९०० ला मिळणारा हा मिक्सर आता ८००० ला डिसकाऊंट म्हणुन मिळतोय. आधी ३ भांडी होती आता चॉपरही सोबत देताहेत त्यामुळे किंमत वाढली असावी.
त्याचा डेमो पाहिलेला. हळद पुड करुन दाखवलेली ती अगदी बारीक झाली होती.
अॅटमबर्गच्या जाहिरातीत पाट्यासारखे बारीक म्हणत नाहीयेत तर पाट्यावरचा ठेचा जसा दरदरीत असेल तसे हा मिक्सर करेल असे म्हणताहेत
कुठेतरी वाचले होते की पाट्यावर वाटलेले खोबरे दोन दगडांमध्ये रगडुन बारीक केले जाते. मिक्सरवर त्याचे बारीक- अतीबारीक तुकडे केले जातात. ह्या दोन्ही प्रक्रियेत खोबर्याचे जे होते त्याने चवीत फरक पडतो.
वरचे खरे असेल तर अॅटमबर्गने पाट्यावर वाटल्याचा फिल आला तरी चव येणार नाही. वेट ग्रांईंडरवर वाटलेले इडली पिठ व मिक्सरवरचे इडली पिठ यात फरक असतो जो चवीतही कळतो.
माझ्या सुद्धा हल्ली लक्षात
माझ्या सुद्धा हल्ली लक्षात नाहीये फार पाट्यावरची चव. आणि मी चवीच्या बाबतीत फार चोखंदळ नाहिये ही असो.
पण एक आठवण आहे ती सांगते. आम्ही कोकणात पुतणीकडे चहाला गेलो होतो . तिच्याकडे तिने ब वडे, चटणी आणि शिरा असा बेत केला होता. तिन्ही पदार्थ छान झाले होते पण सगळ्यात भारी लागत होती ती चटणी. म्हणजे अशी चटणी मी जन्मात खाल्ली नव्हती वगैरे ... मी पुतणीला हे सांगितलं ही तर त्यावर ती तिच्या जावेकडे आणि माझ्याकडे बघून फक्त हसली आणि म्हणाली " काकू , अग चटणी करायला घेतली आणि लाईट गेले म्हणून वाट बघून शेवट पाट्यावर वाटली चटणी. " म्हटलं " म्हणजे ह्या अप्रतिम चवीच रहस्य पाटा आहे तर. "
मी फक्त लसुण-शेगदाणा चटणी आणी
मी फक्त लसुण-शेगदाणा चटणी आणी ठेच्यासाठी खलबत्ता आणलाय...चवित फरक पडतो.
प्रितीचा मिक्सर मी दोन वर्शापुर्वी भारतातुन आणला..४ महिन्यापुर्वी त्याची मोटार बिघडली इथे दुरुस्तिच्या खर्चात दुसरा मिक्सर येइल ही परिस्थिती आहे..इतर मिक्सर आणी यात काही विशेष फरक जाणवला नाही..चटणीच्या भाड्यात जराही जास्त मटेरियल झाल तर झाकणावर हात असला तरी सगळ उडुन सगळीकडे रान्गोळी होते..त्यापेक्षा मिक्सरच्या भान्ड्याला क्लिपने पक्क बसवायच काही येत असेल तर बघा.
पाट्यावर वाटलेली नारळाची चटणी
पाट्यावर वाटलेली नारळाची चटणी खरोखरच मस्त लागते. आमच्या घरी माझ्या लहानपणीही आई चटणी मिक्सरमध्येच करायची, पण एकदा काही कारणाने तिने (कदाचित वीजच गेली असेल किंवा मिक्सरने संप पुकारला असेल) मदतनीस बाईकडून पाट्यावर वाटून घेतली होती. बरीच माणसं जेवायला होती आणि चटणी एकदम हिट झाली. लोकांनी नावाजून खाल्ली होती
पाट्यावरच्या चटणीच्या
पाट्यावरच्या चटणीच्या निमित्ताने हे सुद्धा बघून घ्या
https://www.facebook.com/reel/1549905356003877/?app=fbl
पाट्यावर वाटल्यासारखे असे
पाट्यावर वाटल्यासारखे असे सेटिंग
आणि bldc मोटर ह्या 2 गोष्टींमुळे atomberg डोक्यात आहे
पण किमंत बघून गप्प बसतोय
रिपेयर कुठे होईल हा ही एक।मुद्दा त्यात
माझ्याकडे आता फिलिप्स आहे, तो ही।लोकल ठिकाणी रेपयेर होत नाही
त्यांच्या सर्व्हिस सेंटरला न्यावे लागलेले.
भारतात असाल तर जवळच रिपेयर होईल असा मिक्सर घ्यावा असे वाटते
पंख्यांसाठी मुंबईत त्यांचा
पंख्यांसाठी मुंबईत त्यांचा टेक्निशियन घरी आला होता. त्यांच्या साइटवरही घरी टेक्निशियन पाठवू असं म्हटलंय. सगळ्याच भागांत पाठवतील का ते माहीत नाही.
पाटा - वरवंटा अथवा
पाटा - वरवंटा अथवा खलबत्त्यात कुटण्याची क्रिया होते तर मिक्सर मध्ये कटींग होते पदार्थाचे. त्यामुळे चवीत नक्कीच फरक पडतो.
शेंगदाणा चटणी कुटून केल्यास शेंगदाण्याला तेल सुटते वर मुद्दा अशी छान लसणाची चटणी तयार होते. तीच जर तसेच साहित्य घेऊन मिक्सर मध्ये केली तर भगराळ चटणी होते व चव सर्वसाधारण लागते. बरेच जण मग मिक्सरमध्ये दळताना थोडे तेल टाकतात. चटणी ओलसर झाली तरी तो चवीचा फील येत नाही.
कुटून केल्याने रासायनिक बदलही होतात त्यामुळे चवीचा फरक जाणवतो.
अच्छा भरत
अच्छा भरत
कृष्णाचे बोलणे पटले
चवीत फरक राहीलच जरी texure match झाले तरी
पाट्यावरची चटणी आणि
पाट्यावरची चटणी आणि पाट्याखालचे बोंबील.... आहाहा.. 😋 🤤
२०२१ चा प्रश्न आहे
२०२१ चा प्रश्न आहे
होप्, त्यांचा मिक्सर अद्याप ठणठणीत असेल.
वर खलबत्त्याचा उल्लेख आलाय.
वर खलबत्त्याचा उल्लेख आलाय. गावाकडे उखळ आणि वरवंटाछाप बत्ता पाहिला आहे.
इकडे आहे तो लोखंडी आहे. दोन्हीही उचलले जात नाहीत. दोन्ही हातांनी एकदोनदा कुटलं कि हात भरून येतात.
पण एक दिवस पारंगत व्हायचं आहे. पाटा वरवंटा सोपा आहे वापरायला.
आंध्र प्रदेशातील एका छोट्या
आंध्र प्रदेशातील एका छोट्या गावात घर शोधत होतो तेव्हा प्रत्येक घरात स्वयंपाकघरात ओट्यावर इनबिल्ट रगडा पाहिला. मस्त दगडी रगडा, अगदी झाकणासहित. आता तो वापरल्यावर स्वच्छ कसा करतात कोणास ठाऊक.
वाटण झाले की त्यात पाणी भरून
वाटण झाले की त्यात पाणी भरून ठेवतात आणी नंतर नारळाच्या शेंडी ने स्वच्छ घासून काढतात. नंतर ते पाणी एखाद्या लहान वाटी वगैरे मधे भरून टाकून द्यायचे.हीच प्रोसेस रगडा पुर्ण स्वच्छ होई पर्यंत करायची. प्रचंड वेळखाऊ अन किचकट प्रकरण आहे
पाटा - वरवंटा अथवा खलबत्त्यात
पाटा - वरवंटा अथवा खलबत्त्यात कुटण्याची क्रिया होते तर मिक्सर मध्ये कटींग होते पदार्थाचे. त्यामुळे चवीत नक्कीच फरक पडतो. >> +१. सध्या हे आल्याच्या बाबतीत अनुभवतो आहे. आधी मी आलं किसून चहात घालायचो, आता कुटून घालतो. चवीत लक्षणीय फरक पडतो.
रगडा म्हणजे उखळ का ? हा शब्द
रगडा म्हणजे उखळ का ? हा शब्द फक्त पॅटीस बरोबर ऐकला होता.
कुठे पाहिलंय ते लक्षात नाही. पण एका ठिकाणी स्वयंपाकघरात चौकोनी आकाराच्या दगडात एक गोल उखळ होतं आणि वाड्याच्या चौकात थोडं उंचीवर भलं मोठं उखळ. त्यात मुसळ वापरतात. ते नाही पाहिलं.
रगडा म्हणजे उखळ का ? >>>>
रगडा म्हणजे उखळ का ? >>>>
उखळ हे रगड्यापेक्षा तुलनेने लहान असते. ते जमिनीत बसवितात किंवा वरही ठेवतात. रगडा बर्यापैकी मोठा असतो. दक्षिण भारतीय इडली वैगेरेचे पीठ दळण्यासाठी वापरतात. त्यातला बत्ता देखिल गोल दगडाचाच असतो.
आज काल विजेववर चालणारे दगडी ग्राईंडर आले आहेत.
दगडी उखळात कांडण्यासाठी लाकडी ( साग /शिसवी) मुसळ वापरले जाते त्याला तळाशी पोलादी रींग बसविलेली असते त्यामुळे मुसळ जास्त झिजत नाही. आणि लाकडाचे असल्याने तुलनेने हलके असते.
कृष्णा , छान माहिती. धन्यवाद
कृष्णा , छान माहिती. धन्यवाद.
काही दिवसांनी खलबत्ता, रगडा,उखळ यात दगडी बत्त्याने कुटणारे रोबो बाजारात मिळतील.
(पण त्यांच्या हाताला चव असेल का ? )
पण त्यांच्या हाताला चव असेल
पण त्यांच्या हाताला चव असेल का ? ...
आपल्या testbuds सुधारायला हव्यात.
हपा, कुटलेल्या आल्याबाबत +१.
कृष्णा, शेंगदाणा चटणीबाबत +१.
मिक्सरमध्ये करून पाहिली होती,पण विचित्र लागली.
इडली कटाई चित्रपटात जे
इडली कटाई चित्रपटात जे सुरवातीला दाखवले तो रगडा.
उखळ मी प्रत्यक्ष पाहिली नाही. कोकणात वापरतात का माहित नाही. आमच्याकडे आंबोलीत पाटा वरवंटा. आणि व्ह्यायन-मुसळ्. कोरड्या चटण्या करत नसत. ओली चटणी पाट्यावर. कोरड्या चटण्यांसाठी लागणारे काहीही गावात पिकत नाही. कोकणाचे माहित नाही.
>>>>>>पण त्यांच्या हाताला चव
>>>>>>पण त्यांच्या हाताला चव असेल का ? ... Lol
पुरुषांच्या टेस्टसबडसकरता, स्त्रियांनी रिग्रेसिव्ह व्हावे आता 
देवकी तुला उद्देश्युन नाही एकंदर प्रतिक्रिया.
आपल्या testbuds सुधारायला
आपल्या testbuds सुधारायला हव्यात. >> +१
इडली कटाई चित्रपटात जे सुरवातीला दाखवले तो रगडा. >> ओह. थँक्स.
आजोळी आहे, आईनं आताच मापं काढत सांगितलं.
Pages