
मी Intermittent Fasting सुरु केले आहे १४:१० पासून हळू हळू वाढवत जाईल १६:८.
६ दिवस झाले पहिले २-३ दिवस वजन १ किलो कमी झाले पण त्यानंतर कॉन्स्टन्ट आहे वाढत हि नाही आणि कमी हि होत नाही. थोडा संयम ढळू लागला आहे. म्हणून सपोर्ट आणि मोटिवेशन हवे आहे. ज्यांनी इफ केले आहे प्लीज आपले अनुभव share करा. मला आणी सगळ्या वेट लॉस करणार्यांना मदत मिळेल.
माझे प्रश्न -
किती दिवसात वजन कमी होऊ लागते?
मधेच वजन कमी होणे का थांबते?
काही उपाय आहे का कि रोज वजन कमी होत राहील?
मी चुकत तर नाही आहे?
माझा routine -
सकाळी ९.३०-१० मध्ये नाश्ता - पराठा /इडली /उपमा /पोहा
मध्ये पाणी किंवा राजगिरा चिक्की
२ वाजता जेवण - १ पोळी, थोडी भाजी, डाळ, भात एक वाटी, १-२ फ्रुट (संत्री/पेरू/ मोसंबी)
४ वाजता चिक्की / फ्रुट / cinnamon टी साखर नाही
६-७ योगा
७.३० - डाळ खिचडा / डाळ भात पातळ सूप सारखे एक वाटी
७.३० - सकाळी ९.३० (१४ तास फास्ट)
जर मी चुकत असेल तर प्लीज सांगा
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=CxKwGJeN2WQ
वर चा व्व्हिडीओ १००% अचूक
वर चा व्व्हिडीओ १००% अचूक असेल असे म्हणणे नाही. साधक बाधक विचार करून योग्य ते घ्यावे, टाकाऊ ते टाकून द्यावे. लगेच तुटून पडू नये.
एक सामान्य माणूस म्हणून कुठलीही नवीन गोष्ट वजन कमी करण्यासाठी असा दृष्टीकोण ठेवून बघणे चुकीचे वाटते. त्या पद्धतीचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत हे माहिती करून घेऊन त्याचे बायप्रॉडक्ट म्हणून मेद कमी करण्याकडे पाहणे योग्य ठरेल.
"वजन" कमी करणे हे एकदा डोक्यात बसले कि कुपोषण सुद्धा होते. त्यामुळे आवश्यक पोषणमूल्ये पोटात न गेल्याचे साईड इफेक्टस होतात. व्यायामाने शरीराचा डौल पुन्हा मिळतो पण वजन वाढते. मग ते वजन चांगले कि वाईट ? स्नायूंचे वजन वाढल्याने काटा खाली जात नाही. काटा खाली जाणे हेच ध्येय ठेवले असल्याने अशा वेळी अस्वस्थ व्हायचे का ?
इंटरमिटन्ट फास्टिंग ने वरच्या व्हिडीओतले फायदे होतात का हे डॉक्टरांना विचारून मग ते करायचे कि नाही हे ठरवता येईल. माझ्या मते भरपूर व्यायाम, जंक फूड वर फुली, नैसर्गिक अन्नाचे जास्तीत जास्त सेवन आणि एक दिवस बॉडीला स्वतःला रिपेअर होण्यासाठी ठराविक कालावधीनंतर उपवास हे चांगले असेल. इतरांचे मत वेगळे असेल.
ही दुसरी बाजू.
https://www.youtube.com/watch?v=ET4GSDzuYiM
Pages