मित्रहो!
मी इलेक्ट्रीक आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादने क्षेत्रात नॉनटेक्निकल विभागात आहे.बरे चालले आहे. शिक्षण इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी.पण हे बहुतांश भारतीयांचं जसं होतं तसं झालेलं.कोणीतरी काहीतरी सांगितलं म्हणून घेतला प्रवेश नि टाकलं उरकून.
पण हा इतिहास झाला.झालं ते झालं.
सध्या करोना कृपेने कंपनीत काम थोडे कमी असल्याने थोडा वेळ मिळतो आहे.तर या वेळेचा उपयोग प्रत्यक्षातलं इलेक्ट्रॉनिक्स शिकण्यासाठी करावा या विचारात आहे.कंडू म्हणा हवं तर म्हणजे बेसिक इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनन्टस् कसे काम करतात? ते PCB वर जोडून वीजप्रवाह खेळवल्यावर सर्कीट कसे काम करते हे शिकायचे आहे.
या पूर्वीही वेळ मिळेल तेव्हा मी शिकायचा प्रयत्न केलाय.पण कदाचित दिशा चुकली असावी.पुस्तकांमधून शिकणे फारसे कामाला येत नाही इतके मात्र ज्ञान झाले आहे. त्यामुळे आता प्रात्यक्षिक स्वरुपात प्रयत्न करु इच्छितो.
पण शेवटी हा विजेशी खेळ आहे. फट् म्हणताच ब्रह्महत्या व्हायची शक्यता.शिवाय माझ्या उचापत्यांमुळे घरातल्या सुरु असलेल्या विजेच्या वस्तुंवर विपरीत परिणाम व्हायला नको.
बाजारात वेगो किंवा अशाच अन्य काही ब्रँडसची सर्कीट जोडायची किटस् मिळतात.पण ती नावाप्रमाणेच फक्त जोडायला शिकवतात.कॉम्पोनन्ट किंवा एकंदर सर्कीट कसे काम करते याबद्दल फार काही नसते.कागदावरची सर्कीट डायग्राम आणि प्रत्यक्षातली जोडणी यांचा मेळ घालणे मला काहीसे कठीण जाते.
उदाहरणार्थ फोनच्या चार्जरमधे काही वेळा दोन कपॅसिटर्स शेजारी शेजारी का बसवलेले असतात? दोन इलेक्ट्रोलिटीक कपॅसिटर वापरण्याऐवजी एकच जास्त कपॅसिटीचा कपॅसिटर का वापरत नाहीत? किंवा एखाद्या पॉईंटवर अमुकच कपॅसिटर का वापरायचा हे डिझाईन करणारे कसे ठरवतात?अमुक ठिकाणी मॉस्फेटच का वापरला? नेहमीचा अर्धवर्तुळाकार ट्रान्झिस्टर का वापरला नाही? वीजप्रवाह सुरु झाल्यावर तो कसा कसा पसरतो या सर्कीटमधे? हा घटक इथेच का बसवायचा? हाच का बसवायचा? हे असले प्रश्न मला पडतात. या अशाच प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत. यात अजून एक लोचा म्हणजे या सर्व घटकांच्या आत वीजप्रवाह शिरल्यावर नक्की काय बदल होतात हे बाहेरुन कळत नाही.
यासाठी लागणारे मुलभूत कौशल्य म्हणजे सोल्डरींग ते चांगले करता येते.
या विषयातला आंजावरचा एक तज्ञ मित्र मला त्याच्या वेळेनुसार या विषयात शिकायला मदत करतोही.पण तो त्याचे व्याप सांभाळून हे करत असल्याने त्याच्या मागे सतत लागणे योग्य वाटत नाही.शिवाय सध्या या विषयातले माझे ज्ञान अगाध असल्याने शिकवणार्याचा उत्साह कमी व्हायला नकोय.
तर हवंय हे की जास्तीतजास्त स्वयंप्रयत्नातून किंवा तुनळीच्या मदतीने आणि अगदीच अडले तर एखाद्या तज्ञाची मदत घेऊन हे शिकायचे आहे.त्यापैकी स्वयंप्रयत्न काय करावेत याबद्दल मार्गदर्शन हवंय.सुरुवात कशी करावी? स्वयंशिक्षणासाठी कोणती साधने, माध्यमे वापरावीत? नक्की कुठे नि काय चुकते आहे? हे सर्कीट डिझायनर्स नक्की कसा विचार करतात? कौनसी चक्की का आटा खाते हैं?
अॉर्ड्युनो शिकण्यात , जोडण्यात स्वारस्य नाही.इलेक्ट्रॉनिक घटकांचे कार्य कसे चालते ते शिकायचे आहे.युट्यूबवर बरेचसे भारतीय व्हिडिओ हे सर्कीट कसे जोडायचे याबद्दल आहेत. कॉम्पोनन्ट कसे काम करतात हे शिकवणारे व्हिडिओ हे सर्कीट डायग्रामद्वारे शिकवणारे आहेत.प्रत्यक्षात कॉम्पोनन्ट परिपथात जोडून शिकवणारे व्हिडिओ जरुर सुचवा.
उपद्व्याप,धडपड वाचून हसू आले तरी चालेल पण कृपया मार्गदर्शन करा. मार्गदर्शकांचे आधीच आभार _/\_
SMPS डिझाईन व्हिडिओ आहे
SMPS डिझाईन व्हिडिओ आहे
डिस्क्लेमर : व्हिडिओच्या
डिस्क्लेमर : व्हिडिओच्या सुरुवातीलाच " सलाम वालेकुम" आणि " रहेमानातुला बरकातू" म्हटले आहे. ते चालत असेल तरच व्हिडिओ ओपन करा.
https://www.electroschematics
https://www.electroschematics.com/usb-mobile-charger/ या लिंक मध्ये युएसबी पान लेआउट दिली आहे त्यात D-ve , D+ve चुकलं आहे. डेटा पिनांचा उपयोग नसला तरी लक्ष देणे जरुरी असतं. इलेक्ट्रॉनिक सर्किटस ,इलेक्ट्रिक डाइग्राम सावध राहावे.
अभ्यासाला नेमकं कोण बसलंय Srd
अभ्यासाला नेमकं कोण बसलंय Srd ?
लक्ष देणे जरुरी असतं. इलेक्ट्रॉनिक सर्किटस, इलेक्ट्रिक डाइग्राम सावध राहावे. >>>>
हो खास करून नेटवरून बघताना. शिकताना लॅबमध्ये करताना सप्लाय सुरू करायच्या आधी कोणी चेक करते. इथे आपणच सगळ्या रोलमध्ये.
अगदी अगदी.
अगदी अगदी.
डेटा आणि पॉवर केबल चेक करताना माझ्या लक्षात आलं की दोन्ही टोकांचे युसबी केसिंग आतून जोडले आहेत. मग शोधलं - लीकेज करंट पोहोचू नये म्हणून. शिवाय केबलचे कंडक्टर्स शिल्डेड ( इंटरफिअरन्स टाळणे)+ शिल्ड ग्रराउंडेड आहे. म्हणजे किती काळजी घेतात! डिजाइनिंगमध्ये.
@इच्चुकाटा धन्स! अगदी
@इच्चुकाटा धन्स! अगदी विस्तारपूर्वक व्हिडिओ आहेत.
मला जे हवं होतं ते या
मला जे हवं होतं ते या व्हिडिओत आहे.step 1 आणि 2 (1:18 ते 4:59)
https://youtu.be/35YuILUlfGs
एकदा आयडीया सुस्पष्ट असली आणि कॉम्पोनन्ट निवडता आले की मोठा भाग कव्हर होतो प्रक्रियेतला.
@srdया लिंक मध्ये युएसबी पान
@srd
या लिंक मध्ये युएसबी पान लेआउट दिली आहे त्यात D-ve , D+ve चुकलं आहे. डेटा पिनांचा उपयोग नसला तरी लक्ष देणे जरुरी असतं. इलेक्ट्रॉनिक सर्किटस ,इलेक्ट्रिक डाइग्राम सावध राहावे.
यासाठीच मी निवेदनात "फट म्हणताच ब्रह्महत्या आणि विजेशी खेळ" असे लिहिले आहे.
प्रत्यक्षात जोडणी करताना युट्युब किंवा पुस्तके यांच्यात दिल्याबरहुकूम काहीवेळा सर्किट बनवता येत नाही.त्यांनी केलेली छोटीशी चूक आपण बनवत असलेलं सर्किट खराब करु शकते किंवा आपल्यालाच इजा होऊ शकते.हा विजेशी खेळ असल्याने सखोल ज्ञानाशिवाय हात लावू नये असेच मत बनले आहे.
Pages