भारताला कसे सुधारावे?

Submitted by झक्की on 12 May, 2009 - 20:48

मी मागे माझ्या स्वतःच्या अनुभवांच्या आधारे, माझ्या रंगीबेरंगी पानावर, भारतावर प्रचंड टीका केली. शब्द जहाल वापरले. त्यामुळे बर्‍याच जणांचे तिकडे लक्ष गेले. अपेक्षेप्रमाणे बरीचशी शिव्यागाळी झाल्यावर काही लोकांना वाटू लागले की माझ्या बोलण्यात काही तथ्य असावे. माझा रोख वैयक्तिक नसून सर्वसाधारण होता. माझे म्हणणे असे की, सार्वजनिक ठिकाणी घाण, कामात दिरंगाई, शिस्त, नियमितपणा, बारीकसारीक व रोजच्या व्यवहारात लाच घेणे देणे, माहिती न सांगणे इ. गोष्टींमधे सुधारणा होऊ शकतील.

तेंव्हा श्री. मनकवडा यांनी एकदोनदा मला सांगितले की तुम्ही असा नवीन धागा उघडा, म्हणजे लोक तेथे विधायक चर्चा करतील. तेंव्हा हा धागा मी उघडत आहे. आता तुम्ही लिहा तुम्हाला काय वाटेल ते.

मी नुसतीच टीका केली. तश्या मला काही कल्पना होत्या, काय केले म्हणजे फरक पडू शकेल पण त्या कल्पना भारतात चालत नाही (म्हणे). म्हणून आता तुम्हीच लिहा.

माझ्या पानावरील ज्या गोष्टी इथे लिहाव्यात असे वाटले त्या उद्धृत केल्या आहेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जे स्वत: कधी सुधारले नाही ते इतरांबद्दल लिहीत आहे
Rofl असे मनोरंजनात्मक लिखाण पण आहे? अजून बघावे लागेल Wink

नव्या सरकारातील एक धडाडीचे मंत्री महोदय श्री नितीनजी गडकरी यांचे एक स्टेटमेण्ट वाचनात आले. खूप बरं वाटलं. महागाई शून्य टक्क्यावर येणे आणि विकास निर्देशांक वाढणे म्हणजे अच्छे दिन आ गये हे खरेच झाले. निवडणुकीत दिलेली आश्वासने खरी होताहेत.

या जोडीला गतिमान प्रशासन, स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ गंगा अभियान, बुलेट ट्रेन, हेलिपॅड्स बांधून हेलिकॉप्टर सेवा सुरू करणे, पाण्यावर उतरणा-या विमानांचा हवाईसेवेसाठी वापर यांचे कौतुक झालेले दिसत नाही. भारताचे चित्र बदलत आहे. गडकरींसारखा धडाडीचा मनुष्य करून दाखवेल यात शंका नाही.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नवखे असले तरी अभ्यासू आहेत. आल्याबरोबर पुणे व कल्याण वगळता सर्व डीपी त्यांनी मंजूर करून टाकले याबद्दल त्यांचे अभिनंदन. यातून पुण्याच्या लोकांनी शिकण्यासारखे आहे. कारण एकदा का डीपी मंजूर झाला की बकालीकरणाला आळा बसण्यास मदत होईल. डीपी नसल्याने बकाल वस्तीत भर पडते, बेकायदेशीर घरांना उत्तेजन मिळते हे त्यांचे म्हणणे शंभर टक्के मान्य आहे.

या धाग्यात अपेक्षा व्यक्त झालेल्या आहेत. त्या पूर्ण होतील असे वातावरण आहे. कृपया याचा राजकारणाशी संबंध लावला जाऊ नये ही नम्र विनंती. समजून घ्या दोस्तांनो. हा धागाही योगायोगाने उजव्या बाजूच्या हे पण पहा या चौकटीत सापडला.

देश सुधारण्यापेक्षा सुधारलेल्या देशात जाणे सोपे नाही का ? तिथून देश सुधारण्याबद्दल आपण जास्त चांगल्या रितीने मार्गदर्शन करू शकू.

धागा वाचला नाही अजून, पण टायटल ईंटरेस्टींग वाटले.

मुळात एखाद्याला आपण तेव्हाच सुधारतो जेव्हा तो बिघडलेला असतो.

त्यामुळे आपला देश बिघडलेला आहे हे आधी सिद्ध करावे लागेल.

त्यासाठी बिघडणे म्हणजे काय याची व्याख्या ठरवावी लागेल.

ती व्यक्तीसापेक्ष असू शकते. व्यक्तीगणिक बदलू शकते.

मग काय ज्याला जे वाटेल ते त्याने सुधरवायला घ्यायचे का?

एक ताजे उदाहरण - अमेरीकन्सना कॉपी करत एआयबी रोस्ट नावाचा प्रकार काही जणांना भारताचे सुधारणे वाटते तर काही लोकांना बिघडणे वाटते.

मग अश्या केसेस मध्ये एक्शन प्लान नक्की काय असावा?

<<मग अश्या केसेस मध्ये एक्शन प्लान नक्की काय असावा?>>
----- ऋन्मेश तुम्ही फार मोठा मुद्दा उपस्थित केला आहे. या विषयावर सखोल चर्चा व्हायला हवी म्हणुन तुम्ही एक बाफ काढणार का? Happy

हा धागा तर ७ वर्षाचा जुना आहे,तेव्हढ्या वर्षात आणखी किती तरी सुधारला आहे भारत, सुधारणा चालूच आहेत. मग नक्की काय सुधारायचे आहे?
आता लोकसंख्याच इतकी प्रचंड झाली आहे, पोलीस तरी किती ठिकाणी लक्ष घालणार? स्वतःच कायदे पाळण्याचे ठरवले तरच काही सुधारणा शक्य आहे, आर्थिक घोटाळे करणे, रस्त्यावर घाण करणे, शिस्तीत रांगा न लावता नुसते मेंढरांसारखे घोळका करून घुसाघुशी करायची, हे बरोबर नाही हे ज्याचे त्यालाच कळायला पाहिजे.
धागे काढले तर नुसताच वितंडवाद, शाब्दिक चिखलफेक होणार.
एका भजनात म्हंटले आहे,
विवेकाची ठरेल ओल, ऐसे बोलावे बोल, आपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे

इथल्या कुणाला ते माहित नाही असे वाटते.

आर्थिक घोटाळे करणे, रस्त्यावर घाण करणे, शिस्तीत रांगा न लावता नुसते मेंढरांसारखे घोळका करून घुसाघुशी करायची, हे बरोबर नाही हे ज्याचे त्यालाच कळायला पाहिजे.>>>>>हे खरे आहे, पण उपयोग नाही, कारण भारतातले लोक अजून १०० वर्षे तरी सुधारणार नाहीत हे त्रिकालाबाधीत सत्य आहे. आणी या बिघडलेल्या लोकांमध्ये पुरुष-स्त्रीया-मुले-मुली -म्हातारे-कोतारे सगळे तहेदिलसे सामिल आहेत. हा एकच असा मोठा दुर्गुण आहे, ज्यात तुम्हाला कुठलाच पक्ष, धर्म वा जातीभेद दिसणार नाही.

झक्कुडींचा हा बाफ वर आल्याने माझ्यासकट बर्‍याच जणांची सोय झाली. चला सिरीयलींपासुन हटुन वेगळे काही लिहुया.:दिवा:

हा धागा सतत वर काढू नका.
सकाळीच सकाळी भारताला सुधारावे कसे हे वाचले जाते आणि आपला देश फारच बिघडलाय अश्या नकारात्मक विचारात दिवसाची सुरुवात होते..

सकाळीच सकाळी भारताला सुधारावे कसे हे वाचले जाते आणि आपला देश फारच बिघडलाय अश्या नकारात्मक विचारात दिवसाची सुरुवात होते..>>>>>काहीही हं ऋ! तशा आपण सकाळी उठल्यापासुन बर्‍याच नकारात्मक गोष्टी करत असतो.:फिदी:

मुळात मी इतिहासाचा विद्यार्थी आहे अन मी त्याच अनुषंगाने काही बोलायचा प्रयत्न करतो, ह्या धाग्यात लेखकाला जो "सुधार" अपेक्षित आहे ती संकल्पना रेनेसांस मधुन उपजलेली आहे, वैयक्तिक स्वातंत्र्य, सार्वजनिक स्वच्छता ते राजकीय प्रगल्भता सगळे काही ह्या स्त्रोतातुन उद्गम पावलेले आहेत, आता मुळ प्रश्न हा आहे की ह्या सुधारणा भारतात कधी होतील किती झाल्यात अन वेग कमी आहे की जास्त की बरोबर आहे अगदी! मला वाटते की वेग परफेक्ट आहे , 68 वर्षात जग जरी पुढे गेले तरी लोकशाहीचं फुल हळूहळूच उमलते, जगातल्या आजच्या सार्वजनिक शिस्त अन स्वच्छता असणाऱ्या डेमोक्रेसी आउट ऑफ़ द ब्लू आलेल्या नाहीत असे वाटते, लोकशाही रुजल्या नंतर पहिल्या सत्तर वर्षात ग्रेट ब्रिटनची परिस्थिती पाहता प्रत्येक लोकशाहीच्या आयुष्यात हे फेज येतातच असे वाटते, त्या सत्तर वर्षात लेजिस्लेटिव वायलेंस ते अस्वच्छतेमुळे आलेली आजारपणे काय किंवा पार रोगराई (second londom plague outbreak) काय सगळेच होते पार आग लागून राजधानीचं शहर जळून ख़ाक झालं होतं, ये भी समय निकल जायेगा Happy

If one has to think positive why not start from self and his own motherland Happy

सोन्याबापू,

झक्कींसारखे लोक तिकडे गेल्यामुळेच आज जे काही सिव्हीक सेन्स तिथे आले आहेत ते दिसताहेत. सार्वजनिक स्वच्छता, स्वयंशिस्त, आर्थिक प्रगती, वैज्ञानिक दृष्टी ही झक्की आणि तत्सम विद्वानांमुळे तिथल्या समाजात आली असे दस्तावेजांवरून दिसते. त्यांनी जे काम तिथे केले आहे तसेच भारतात कुणीतरी पुढाकार करून घेऊन करावे ही त्यांची रास्त अपेक्षा असावी असे दिसते.

If one has to think positive why not start from self and his own motherland
----- छान विचार आहेत. प्रत्येकानेच हे तत्व अमलात आणणे अशक्य आहे. पण काहीन्नी जरी हे तत्व पाळले तरी खुप मोठा दृश्य फरक दिसेल.

why not start from self and his own motherland 

यक्झॅक्टली !
चला तर मग,
आजपासून मायबोलीला सुधरवायला घेऊया Happy

<<आजपासून मायबोलीला सुधरवायला घेऊया स्मित>>
------ मी च्या आधी मायबोली ? एक पोल घ्यायला हवे. मी केवळ हिन्ट देतो आहे, त्या मधे ऋन्मेश-मसाला (बेडेकर मसालाच्या धर्तीवर) वापरुन बाफ सुरु कर आणि इतरान्चे पण विचार जाणुन घे. Happy

Pages