मायबोलीकर युट्यूबर्स : माझं ‘फॅशन्/स्टायलिंग्/मेंदी/क्राफ्ट्स’ याबद्दल चॅनल , ‘Glory of Henna Official

Submitted by दीपांजली on 7 January, 2021 - 04:30

कालच केदार जाधव यांच्या चॅनल बद्दल थ्रेड पाहिला आणि मलाही माझ्या नुकत्याच सुरु केलेल्या युट्युब चॅनलबद्दल लिहायचं इन्स्पिरेशन मिळालं!
मायबोलीवर बर्याच जणांना ऑलरेडी माहित असेलच, व्यवसायाने मी मेंदी/बॉडी पेंटिंग अर्टिस्ट आहे आणि काहींना माझी पॅशन फॉर स्टायलिंग्/फॅशनही माहित असेल !
या सगळ्याची सफर माझ्या चॅनलवर , ‘ग्लोरी ऑफ हेना ऑफिशिअयल’ वर पहायला मिळेल !
चॅनल वर अधुन मधुन इंग्लिश व्हिडिओजही येतील पण मुख्यतः मराठी व्हिडिओज असतील .
अत्ता पर्यंत रिलिझ झालेले मराठी व्हिडिओज :
१. खणाची साडी कशी स्टाइल करायची : https://youtu.be/DSa50t10jQE
२. एक बेसिक ग्रे कुर्ता वापरून १० वेगवेगळ्या स्टाइल्स : https://youtu.be/gJG2ihXMTkw
३. स्टे होम लुक स्टायलिश : https://youtu.be/EunTdSlcjns
४. संक्रान्त स्पेशल काळ्या कपड्यांचे स्टायलिंग : https://youtu.be/CM81NMR6IYM
५. काळ्या साडीचे स्टायलिंग पार्ट १ : https://youtu.be/3VHKrvewzeA
6. काळ्या साडीचे स्टायलिंग ( पार्ट २ )
https://youtu.be/QQRYd2YQlRE

पण मुळात माझ्या चॅनलची सुरवात कशी झाली, थॉट प्रोसेस काय होती , याची छोटीशी जर्नी मला इथे शेअर करायला नक्कीच आवडेल !
नावात काय आहे ?
तर माझं चॅनल तसं नावाला मी २०१७ मधे सुरु केलं खरं पण २०२० ची लॉकडाउन फेज येई पर्यन्त मी एकही व्हिडिओ केला नव्हता, माझं इन्स्टाग्रॅम अकाउंट अपडेट ठेवणे एवढेच मला पुरेसे होते !
२०१० मधे लॉस एंजलिसला मुव्ह झाल्या पासून मी मेन्ली एंटरटेन्मेन्ट इंडस्ट्री , म्युझिक इंडस्ङ्री आणि फॅशन इंडस्ट्री रिलेटेड इव्हेंट्स करु लागले आणि माझ्या नावा बरोबरच माझ्या इन्स्टाग्रॅम नावालाही रेकग्निशन मिळालं !
२०१६ मधे मधे मी पॉप सिंगर पियामियाला ‘ग्लॅमर मॅगझिन’ च्या कव्हरपेज साठी आणि इतर बर्याच एडिटोरियल लुक्स साठी मेन्दी काढली आणि माझं ते मेन्दी डिझाइन , माझ्या इन्स्टाग्रॅम चं नावही एकदम व्हायरल झालं .
7B5DBDCA-CB6A-429D-BE64-16C53926091E.jpeg
या नंतर मी इतरही अनेक सेलिब्रिटी इव्हेंट्स केले , त्यात बियॉन्सी, शे मिचेल टोनी ब्रॅक्स्टन, इव्हन रेचल वुड इ. सेलिब्र्टिजच्या मेन्दीला बरच मिडिया रेकग्निशन मिळालं आणि मी दीपाली देशपांडे = ग्लोरी ऑफ हेना असं इक्वेशन बनलं , त्यामुळे मी सगळ्या सोशल मिडिया हॅडल्सना काही विचार न करता हेच नाव दिलं, ‘ग्लोरी ऑफ हेना’ , अर्थात युट्युबलाही !

39F19442-ACB4-4655-BF2E-63F086B8CA79.jpegचॅनलचा श्रीगणेशा
मी ज्या फिल्डमधे काम करते, त्या फिल्ड मधे तुमच्या खर्या नावा आधी लोक इन्स्टाग्रॅम हँडल विचारतात !
तुमचं काम, एक्स्पिरिअन्स, इव्हेंट्स, क्लाएंटेल या सगळ्या गोष्टीं मधे पोटेन्शिअल क्लाएंट्सना इंटरेस्ट असतो आणि ती माहिती लोक इन्स्टाग्रॅमवरच बघतात त्यामुळे अनेक मिनि व्हिडिओज मी फक्त इन्स्टाग्रॅमवरच टाकत होते , युट्युब ऑप्शनच्या बाबतीत मी कधीच फारसा उत्साह दाखवला नाही.
पण २०२० मधे मार्च एंड नंतर सगळी इक्वेशन्सच बदलली !
६ मार्चला मी डिस्नी स्टुडिओ मधे माझा २०२० चा शेवटचा कॉर्पोरेट मेंदी इव्हेंट केला.
डिस्नीनी पहिले देशी अ‍ॅनिमेटेड डिटेक्टिव कॅरॅक्टर ‘मीरा , द रॉयल डिटेक्टिव्ह ‘ , इंट्रोड्युस करताना सेलिब्रेशन म्हणून हा कॉर्पोरेट इव्हेंट ठेवला होता.
त्या इव्हेंटला करोना ची भिती /चर्चा नुकतीच सुरु झाली होती , ‘आपल्या लॉस एंजलिस मधे इथे एकही केस नाही, इतकच समाधान लोक व्यक्त करत होते पण एप्रिल सुरु झाला आणि हळुहळु सगळच गंभीर होत गेलं.
माझ्या सारख्या सगळ्याच फ्रीलान्स अर्टिस्ट्सना मोठा ब्रेक घ्यावा लागला, ज्या कामात सोशल डिस्टन्सिंग पाळणे शक्य नाही त्यातून तात्पुरता ब्रेक घेणे हेच शहाणपणाचे होते.
पँडेमिकच्या गंभीर वातावरणात स्वतःला पॉझिटिव आणि बिझी ठेवण्यासाठी अनेक नव्या गोष्टी सुरु केल्या पण फायनली हे पूर्ण वर्ष असच जाणार, ऑल सेलिब्रेशन्स /फेस्टिवल्स आर अबाउट सेलिब्रेटिंग अ‍ॅट होम हे रिअलाइझ झाल्यावर फायनली ऑक्टोबरमधे मुहुर्त लागला माझ्या पहिल्या स्टायलिंग युट्युब व्हिडिओला ‘नवरात्री आउटफिट्स‘.
त्यावेळी समजलं कि माझ्या ‘ग्लोरी ऑफ हेना’नावाने अनेकांनी चॅनल्स सुरु केली म्हणून मग मला ‘ग्लोरी ऑफ हेना ऑफिशिअल’ हे अ‍ॅड करावं लागलं !
या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स मिळाल्यावर मी माझ्या इतर हॉबीज क्राफ्ट्स, कुकिंग, मेंदी क्रस्फ्ट्स या विषयांनाही चॅनलवर इन्क्लुड केले पण स्टायलिंग व्हिडिओजना , त्यात मराठी स्टायलिंग व्हिडिओजना सर्वात चांगला रिस्पॉन्स मिळाला.
स्टायलिंग व्हिडिओज का ?
जरी या क्षेत्रात फॉर्मल शिक्षण घेतले नसले तरी मी माझ्या इव्हेंट्सच्या निमित्ताने गेले १० वर्ष याच क्षेत्रात वावरते, इंडस्ट्रीतल्या टॉपमोस्ट स्टायलिस्ट्स्/मॉडेल्स/मेकप अर्टिस्ट्सची/हेअर अर्टिस्टची कामं अगदी जवळून बघते , टिम म्हणून अनेक इव्हेंट्सना त्यांच्याबरोबर एकत्रं काम करते आणि शिकते.
याशिवाय लहानपणापासून ही माझी हॉबी/पॅशन आहे, कुठल्याही इव्हेंट्सना जाताना माझ्यासाठी एकच अ‍ॅट्रॅक्शन असतं, ते म्हणजे ड्रेसिंग अप्/स्टायलिंग त्यामुळे युट्युबच्या निमित्ताने माझ्या स्टायलिंग टिप्स, मेन्ली इंडो वेस्टर्न फॅशन , माझ्या क्षेत्रातली वेगळी लाइफस्टाइल याबद्दल मराठी ऑडियन्सला सांगणे हा माझा मेन उद्देश असेल !
याचा अर्थ असा नाही कि मी माझ्या मेन प्रोफेशन ‘मेन्दी ‘ बद्दल व्हिडिओज टाकणार नाही, तेही टाकणारच आहे पण त्यासाठी माझे इन्स्टाग्रॅम अकाउंटही आहे !
मच रिक्वेस्टेड ‘ हेना कँडल्स ट्युटोरियल’ व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे : https://youtu.be/9habwefU6Us

तर माझ्या या नव्या अ‍ॅडव्हेंचरला तुम्हाला या टॉपिक्स बद्दल आवड असेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि मित्र मैत्रीणींशी शेअर करा !
Glory of Henna Official : https://youtube.com/channel/UCgiWJZMwRX5gnSRSUTbCx9Q

Group content visibility: 
Use group defaults

थँक्स मुलींनो,
नक्की करीन कॅज्युअल मेकप, आय मेकप वर व्हिडिओ !
मुळात मी मेकप स्कुल मधे गेले नाही, प्रोफेशन वाइज मेकप अर्टिस्ट नव्हते, पण आधी अनुभवातून , युट्युब बघून शिकले मग इथे एले ला शिफ्ट झाल्यापासून माझे पूर्ण प्रोफेशनल सर्कल हे मेकप अर्टिस्टने भरलेले, त्यांच्याकडून खूप काही शिकले.
किम कार्डॅशियन, कायली जेनर, आरियाना ग्रँडे, बियॉन्सी यांच्याबरोबर काम करणारे मेकप /हेअर अर्टिस्ट माझे रेग्युलर क्लायंट्स असल्यामुळे आपोपाप शिकावस वाटत गेलं.
इथल्या सेलिब्रिटी मेकप अर्टिस्ट आणि कॅमेरा मेकप करणार्यांकडून अजुन वेगळ्या गोष्टी शिकले, असं करत ‘हे प्रोफेशन नाही ‘ म्हणता म्हणता २०१९ मधे चक्क सुकन्या कुलकर्णींचा मेकप करायची संधी मिळाली एका शॉर्ट फिल्म साठी, असा काही ड्रामॅटिक मेकप नव्हता अजिबात , इनफॅक्ट त्यांनी खूपच कॅज्युअल /नॉन ग्लॅमरस दिसणे अपेक्षित होते पण मला काम करताना मजा आली !

वाह!

‘माझ्या चॅनलवर नवीन व्हिडिओ , व्हॅलेन्टाइन्स डे स्पेशल ‘ स्टायलिंग पिंक जम्पसुट विथ पिंक दुपट्टा : https://youtu.be/yTs-ml1bTvQ
माझं नवीन ‘स्टायलिंग्/फॅशन रिलेटेड इन्स्टाग्रॅम अकाउंट सुध्दा फॉलो करा : www.instagram.com/stylebydeepali

मला आता ओरिजनल धाग्यामधे संपादन ऑप्शन दिसत नाहीये त्यामुळे इथेच लिंक दिली , धागा अपडेट नाही करता आला.

Much requested video, finally on my channel ,
माझ्या चॅनलवर नवीन व्हिडिओ +grocery vlog : आंब्याचा शिरा ( आईची रेसिपी):

https://youtu.be/fQKl8TeMXQo
आवडला तर लाइक करा आणि शेअर करा :)

बघितला व्हिडीओ ! केवढ्या लिपस्टीक आहेत , अबब ! Light 1
लिपस्टिकवर रंग ओळखण्यासाठी स्टिकर लावायची आयडिया आवडली. छान आहे

थँक्स जाई Happy
तरी आता भरमसाट मेकप जमवणं एकदम बन्द केलय, जे नेहेमीचे यशस्वी प्रॉडक्ट्स आवडतात तेच घेते Proud

ते अनुभव शब्दबद्ध कराना सेलिब्रिटीज बरोबरचे अर्थात तुमचे एन डी ए चे क्लॉजेस सांभाळून. नक्कीच वेगळे असतील ह्याची खात्री आहे.

हे कधीपासुन वाचायचं राहुन जात होतं. आज वाचलं. खुप अभिनंदन आणी शुभेच्छा. सेलेब्रेटीज बद्दल वाचुन जाम भारी वाटलं. बियॉन्से ग्रेट.
विडीओ बघते आता.

Mast.

मस्तच गं डीजे.. मला फार आवडतो हा कलर. मी रेड हायलाईट्स केले होते २ वर्षापूर्वी. आता कॅरेमल शेड करावी असं वाटतंय. काही सांगू शकतेस का? तो कलर देसी स्किन टोनला कसा दिसेल?

थँक्स देवकी आणि अंजली !
अंजली,
मला पर्सनली कॅरॅमल खूप काँट्रास्ट वाटत नाही आपल्या नॅचरल डार्क ब्राउन केसांना पण कुठली शेड आहे त्यावर अवलंबून आहे , कलर करायला जाशील तेंव्हा एग्झॅक्ट शेड अपेक्षित असलेला फोटो घेऊन जा !
किम कार्डेशियन्च्या सारखा कॅरॅमल टोन कलर मला आवडतो , हे बघ https://www.pinterest.com/pin/596164069423316643/?d=t&mt=login
पण तिच्या केसांची लेंथ भरपूर आहे आणि मोस्ट प्रोबॅब्ली तो विग आहे , शिवाय तिला मेन्टेन करायला टिम ऑफ स्टायलिस्ट्स आहे, लाइट इफेक्ट आहेच !

येस डीजे थँक्यू Happy तो ओंब्रे कलर पण मस्त वाटतो. पण हे ब्लीच प्रकरण वगैरे केसगळतीला कारणीभूत ठरतील म्हणून नको पण वाटतं एकीकडे.

तू निळे किंवा डार्क जांभळे स्ट्रिक्स पण छान कॅरी करशील. >>>>>>>>>> +++++१११

आँब्रे प्रकार आवडतो.
दीपांजली व्हिडिओ मस्त. पण तुमचे आधीचेच केस मस्त होते. फक्त रंगवायचेत ना. छान लांबी होती.

Pages