भाग २६ - https://www.maayboli.com/node/77620
त्या माणसाकडे मोहनने वळून बघितले...
त्याच्या हातात तो तांब्या होता. जसाच्या तसा...
"थँक्स... थँक्स..." मोहनने तो तांब्या त्याच्या हातून घेतला.
"वेलकम... शांतपणे जा, आणि अस्थीविसर्जित कर," तो तिथून निघाला.
मोहन त्याच्याकडे बघतच राहिला...
"सर, चला..."
"नाही व्यास," थांबा. मोहन त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत म्हणाला.
तिथल्याच एका झाडाच्या आडोशाला तो जाऊन बसला, आणि त्याने क्षणभर डोळे मिटले.
"एक्सक्युज मी!" त्याचे डोळे उघडले.
मोहन त्याच्या समोर उभा होता...
"मला नीट धन्यवाद सुद्धा देऊ दिले नाहीस तू." मोहन म्हणाला.
"गरज नाहीये रे मित्रा, खरंच गरज नाही. हे आयुष्य आपल्याला दिलं, म्हणून आपण देवाला धन्यवाद देतो का? नाही ना? मग एकमेकांना कशाला द्यायचं?"
मोहन हसला.
"तू साधू आहेस की संन्यासी?" मोहनने विचारले.
"नाही रे, मी साधा गृहस्थ आहे. सगळं करून दमलेला, कुणावर जीवापाड प्रेम केलेला, कुणासाठी आयुष्य जगलेला, आणि कुणाचं प्रेम नाकारलेला. क्षुद्र मनुष्य. प्रेमासाठी सर्वस्व दिलेला, आणि कफल्लक झालेला..."
मोहनला अचानक सोनीची आठवण झाली...
"मग काय, तुला हवं ते मिळालं?"
"हो मिळालंही, आणि मी त्याचा त्यागही केला. ही नर्मदा राहते का स्थिर? नाही ना? तसच माझं. नाही स्थिर राहू शकलो."
मोहन हसत त्याच्याशेजारी बसला.
"म्हणजे प्रेम वाईट, असच ना?"
"त्याच्यासारखी सुंदर गोष्ट नाही, कारण प्रेमशिवाय तू जगूच शकत नाही. आयुष्यात खरं प्रेम मिळणं, ही सगळ्यात मोठी कमाई... असेल तुझ्याकडे तर जपून ठेव." तो हसला.
मोहननेही स्मितहास्य केलं.
"कोण आहेस तू, कुठून आलास?" मोहनने त्याला विचारले.
"नर्मदेसमोर या सगळ्याचा विसरच पडतो."
"नर्मदा एका मित्राला सांगण्याची परवानगी तर देऊ शकते ना?" मोहन म्हणाला.
तो क्षणभर थांबला.
"नक्की... तो हसला. मी पुण्याहून आलो. एक छोटासा बिजनेस होता, तो सोडून आलो. आता स्वतःच्या शोधात आहे."
"मी मोहन पाटील, पाटील स्टील..."
"अरे वा, बऱ्याच मॅगझीनमध्ये तुझं नाव वाचलंय मी."
मोहन हसला.
"खरं प्रेम नक्की मिळत ना रे?" त्याने विचारले.
"नक्की मिळतं. डोन्ट वरी." तो हसला. "आता जा. ज्या कामासाठी आला आहेस ते काम पूर्ण कर. मी निघतो."
"वेट," मोहनने खिशात हात घातला. "हे कार्ड ठेव. मी तुला परत शोधेनच, पण जेव्हा केव्हा वाटेल, मला नक्की फोन कर."
त्याने कार्ड घेतलं. आणि खिशात ठेवलं, आणि मोहनला नमस्कार करून तो निघाला.
"चला सर." व्यास म्हणाला.
मोहन पुन्हा किनाऱ्यावर आला, आणि होडीत बसला.
होडी निघाली व मध्यावर आली.
अश्रूपूर्ण नयनांनी त्याने अस्थी विसर्जित केल्या...
लांबवर उभं राहून तो मोहनकडे बघत होता... ..
अस्थी विसर्जित झाल्या...
..आणि मनु तिथून निघून गेला....
क्रमशः
मस्तच...हा भाग लहान आहे,मोठे
मस्तच...हा भाग लहान आहे,मोठे भाग टाका...
सहीच.. छानच चाललीय!
सहीच.. छानच चाललीय!
पुन्हा मनू ची भेट..
हा मनु कोण
हा मनु कोण
मनू इज बॅक!!!! From संततधार!!
मनू इज बॅक!!!! From संततधार!!!!
आवडला हा भाग....
आवडला हा भाग....
छान !!
छान !!
तुमच्या सगळ्या कथा आणि त्यातली पात्र हातात घालून एकमेकांच्या सोबतीने पुढे चालतायेतं...!!
मस्त... तुमच्या संततधार कथेची आठवण आली.
मनू इज बॅक!!!! From संततधार!!
मनू इज बॅक!!!! From संततधार!!!! >>>> अच्छा!!
खूप मस्त.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.....
मोठे भाग पाटवत जा हि का
मोठे भाग पाटवत जा हि का लघुकथा आहे का
भाग चांगला झाला पण खूप म्हणजे
भाग चांगला झाला पण खूप म्हणजे खूपच छोटा झाला. शुरु होने से पहिले हि खतम हो गया मामू