गूगलमध्ये नोकरी करणारे आता युनियन करणार

Submitted by उपाशी बोका on 5 January, 2021 - 11:27

आज बातमी वाचली की गूगल कंपनीमधील एम्प्लॉई आणि काँट्रॅक्टर आता युनियन स्थापन करणार आहेत.
आय.टी. क्षेत्र हे तसे व्हाइट कॉलर प्रकारचे काम आणि भरपूर पगाराचे, कदाचित त्यामुळेच ते इतके दिवस युनियन या प्रकारापासून दूर राहिले होते. आता अमेरिकेत युनियन सुरू झाल्यामुळे भारतात पण आय.टी. मध्ये युनियन सुरू होईल का?

वरील बातमीत अजून एक मुद्दा आहे की गूगलने पेंटागॉनबरोबर काम करू नये म्हणून काही एम्प्लॉईजनी पत्र लिहिले. कंपनीने व्यवसाय कसा आणि कुणाबरोबर करावा, हे ठरवण्यासाठी नोकरी करणार्‍यांनी दबाव आणणे योग्य आहे का? हा पण चर्चेचा एक मुद्दा आहे.
तुम्हाला काय वाटते की आय.टी. क्षेत्रात युनियन करणे चांगले की वाईट, ही चर्चा करण्यासाठी हा धागा काढत आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

यापुर्वि सुद्धा गुगलच्या सपोर्टिंग स्टाफ (नान-टेक) कडुन असे प्रयत्न झालेले आहेत, यावेळेस व्याप्ती थोडी मोठि आहे. तरीहि माय्नॉरिटी युनियन असल्याने फेडरल रेकग्निशन मिळणार नाहि, थोडक्यात एक स्वतंत्र एंटिटी, कॉमन वॉइस याव्यतिरिक्त पुढे काहिहि महत्व नाहि; मेजर बार्गेनिंग पावर नाहि. शिवाय, अमेरिकेसारख्या कॅपिटलिस्ट देशातले कायदे गुगल करता पोषक आहेत, युनियन्स करता नाहित. तेंव्हा याचा इंपॅक्ट मिनिमल असेल, जास्तीत-जास्त हे लोण इतर टेक कंपन्यामधे पसरेल जेणेकरुन असमाधानी नोकरदारांकरता एक कॉमन प्लॅट्फॉर्म उपलब्ध होइल...

बाय्दवे, लोकशाहित दडलेले कम्युनिस्ट बर्नी, एओसी इ. कडुन गुगल युनियचं स्वागत झालेलं आहे... Happy

>>कंपनीने व्यवसाय कसा आणि कुणाबरोबर करावा, हे ठरवण्यासाठी नोकरी करणार्‍यांनी दबाव आणणे योग्य आहे का? <<
व्यवसाय कुठे आणि कसा करावा याबाबत नाहि, पण कंपनीच्या बेकायदेशीर, अनएथिकल इ. भूमिकेबाबत आवाज उठवणे हि बाब फ्री कंट्रिला साजेशी आहे. त्या "आवाजा"त काहि दम असेल तर त्याची दखल काँग्रेस घेते, पुढचे सोपस्कार करण्या करता...