शब्दरंजन (४)

Submitted by कुमार१ on 31 December, 2020 - 23:01

भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................

सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.

गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !

हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.

आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकूण तीन राहिले आहेत
ज्यांनी बरोबर उत्तरे दिली आहेत त्यांनी काही वेळ सुट्टीवर जायला हरकत नाही.
Happy

गतिसंमुख नाही
मुख योग्य दिशेला आहे.
अजून थोडा प्रयत्न केल्यास मुखात भजी पडेल Happy
मुख.... वारा...... !

<<प्रत्येक अक्षर एकदा आणि फक्त एका शब्दासाठीच वापरले गेले पाहिजे.>>
वातप्रवाह आणि वाताभिमुख यात "वा" दोन वेळा आला आहे.

अति शी तित.
....
खेळात सहभागी झालेल्या सर्वांचे अभिनंदन !
सर्वाधिक उत्तरे दिलेल्या खेळाडूकडून सर्वांसाठी गरम भजी लागू झाली आहे Happy

अतिशीतित >> म्हणजे मराठीत ओव्हरकूल्ड का?

सर्वाधिक उत्तरे दिलेल्या खेळाडूकडून >> इथे 'बरोबर' (उत्तरे) हा शब्द राहिला; नाहीतर मला महागात पडेल Wink

होय,
अतिशीतित >> म्हणजे ओव्हरकूल्ड
....
अपेक्षित नसलेले परंतु पर्यायी उत्तर म्हणून आलेले शब्द देखील चांगले होते.

Pages