
भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................
सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.
गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !
हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.
आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.
८ आणि १० मध्ये किंचीत बदल
८ आणि १० मध्ये किंचीत बदल केले आहेत, नोंद घ्यावी.
१. गाभ्यामागे बकरा ठेवल्यास येणारा प्राणी? (४)अज गर२. पातळ बदलून ठेवलेली नजर. (३)पाळत*३. मधला नाद यमक जुळवतो. (५)मदनायक* ("नाद यमक" अक्षरे जुळवून)४. सम वातावरणात साम्य बाळगणारी विषमता. (४)
५. पुष्कळ न बोलणारा मध्येच जोर लावतो. (४)मु(बल)क६. वायुमधील अज्ञात तारकापुंज? (३)न(क्ष)त्र७. रोखठोक सूर घेउन आकाशाभोवती पिरपिर. (४)प र{ख}ड८. "एकाच नमुन्याच्या घरांच्या पट्टीस" दिलेला "क्रमांक" (३)चाळीस (श्लेष)९. हातात प्रत्येकवेळी सकस पदार्थ. (४)क(सदा)र१०. कामाला पर्याय देणारा कीटक? (३)काज वा७. रोखठोक सूर घेउन आकाशाभोवती
७. रोखठोक सूर घेउन आकाशाभोवती केलेली पिरपिर. (४) >> रडारड (रडार आकाशाभोवती फिरते)
10 ) काजवा ? काम - काज
10 ) काजवा ? काम - काज
अश्विनी११ : छान पूर्ण उकल
अश्विनी११ : छान पूर्ण उकल करता येते का पहा.
रडारड : नाही.
7 भवताल का?
7 भवताल का?
6 नक्षत्र
6 नक्षत्र
नत्र nitrogen वायू
क्ष X अज्ञात
अर्थ तारकापुंज
छान आहेत कोडी
छान आहेत कोडी
७. भवताल: नाही.
७. भवताल: नाही.
६. न(क्ष)त्र: बरोबर
१०. काम = काज
वा : पर्याय दर्शवणारा शब्द. हे वा ते.
म्हणुन काज वा.
7 मध्ये आकाश म्हणजे ख असं
7 मध्ये आकाश म्हणजे ख असं घेउन र हा रोखठोक सूर घेतला तर खरखर होईल पण त्याचा अर्थ पिरपीर असा वाटत नाहीये. आहे का?
आकाश म्हणजे ख असं घेउन:
आकाश म्हणजे ख असं घेउन: बरोबर.
त्याचा अर्थ पिरपीर : अर्थ पिरपिर असावा असे का गृहीत धरले?
शोधसूत्रात आपण कोड्याचा एक अर्थ गृहीत धरून उत्तर येत नसेल तर कदाचित वेगळा अर्थ अपेक्षित असेल.
न येणाऱ्या सर्व कोड्याना हे लागू करून बघा, काही सुटतील.
अर्थात कुठे अर्थ बरोबर गृहीत धरूनही सुटत नसेल असेही होऊ शकते.
सूर - सप्त सूरांंपैकी.
७. मध्ये थोडा बदल केला आहे वर, नोंद घ्यावी.
हम्म म्हणजे मख** / *खम* असे
हम्म म्हणजे मख** / *खम* असे काही असावे
रोख ठोक सूर म्हणजे मला आधी म च वाटला होता.
रोख ठोक सूर : चुकीची दिशा.
रोख ठोक सूर : चुकीची दिशा.
7 मखलाशी? म सुर आणि ख आकाश
7 मखलाशी?
म सुर आणि ख आकाश
नाही केया. शोधसूत्रातील
नाही केया. शोधसूत्रातील प्रत्येक शब्दाचा हिशेब लागायला हवा, शोधसूत्राचे वाक्य पूर्ण करण्यास वापरलेले एखाद दोन शब्द सोडून.
आणि म हा सूर नाहीये इथे.
रोख ठोक सूर : चुकीची दिशा.>>>
रोख ठोक सूर : चुकीची दिशा.>>>>
मग परखड , अर्थ रोखठोक
प सूर
ख आकाश
रड पिरपीर
मग परखड , अर्थ रोखठोक
मग परखड , अर्थ रोखठोक
प सूर
ख आकाश
रड पिरपीर
बरोबर! प + र{ख}ड (ख भोवती रड)
३. मधला नाद यमक जुळवतो. (५) >
३. मधला नाद यमक जुळवतो. (५) >> मदनायक म्हणजे मधला?
५. पुष्कळ न बोलणारा मध्येच
५. पुष्कळ न बोलणारा मध्येच जोर लावतो. (४) + मुबलक = (मूक + बल) (र्हस्व दीर्घ चालवून घ्या)
अरे वा! दोन्ही बरोबर
अरे वा! दोन्ही बरोबर विक्रमसिंह!
३. उकल कळली असेलच, काय ती लिहलं का.
(नाद यमक = मदनायक) जुळवतो.
(नाद यमक = मदनायक) जुळवतो.
सही!
सही!
आता ८ तसं सरळसोट आहे. त्यात शब्द फोड नाहीय.
४. पहिला शब्द एक सूचना देतोय.
४. असमता
४. असमता
सम वातावरणात - सम
साम्य बाळगणारी - समता
विषमता. - असमता
८. एका नमुन्याच्या घरांच्या
८. एका नमुन्याच्या घरांच्या पट्टीस दिलेला क्रमांक. (३)
>>> ए + कर (घरांच्या पट्टीस) = एकर
क्रमांक -एक
४. या स्पष्टीकरणात अ अक्षर
४. या स्पष्टीकरणात अ अक्षर कुठून येते?
५. एक + कर मध्ये दोन क होतील एक क काढावा अथवा तो सामाईक आहे अशी सूचना शोधसूत्रात नाही. एकर या उत्तराचा अर्थ शोधसूत्रात नाही.
इथे पट्टी हे एकाच रांगेत/समूहात या अर्थी आहे.
चाळीशी असे काही आहे का?
चाळीशी असे काही आहे का?
केया, त्यालाच क्रमांक करा.
केया, त्यालाच क्रमांक करा.
चाळीस?
चाळीस?
स्पष्टीकरण देऊ शकाल, सोपे आहे
स्पष्टीकरण देऊ शकाल, सोपे आहे एकदम.
आता सात वाजता ४ साठी एक शेवटला क्लू देईन.
न आल्यास साडेसातला सांगता करू.
एका नमुन्याच्या घरां >>>> चाळ
एका नमुन्याच्या घरां >>>> चाळ
>>> चाळी स = ४०
बरोबर डॉ. कुमार.
बरोबर डॉ. कुमार.
एकाच नमुन्याच्या घरांच्या पट्टीस दिलेला क्रमांक (३)
एकाच नमुन्याच्या घरछीची पट्टी = चाळ
"एकाच नमुन्याच्या घरांच्या पट्टीस" हे रुप = चाळीस :- क्रमांक.
४ साठी शेवटला क्लु: पहिला शब्द एक गणीती सूचना देतोय, उत्तर मिळवण्यास. कुठेही उत्तर शोधण्याची आवश्यकता नाही.
Pages