पंचद्रविड आणि गुजराती,मारवाडी,मेवाडी

Submitted by केअशु on 29 December, 2020 - 11:22

विकिपीडियावरुन ही माहिती मिळाली.

कल्हण यांनी आपल्या राजतरंगिणी (इ.स. १२ व्या शतकामध्ये) खालील पाच ब्राह्मण समुदायांचे पंचद्रविड म्हणून वर्गीकरण केले आहे त्यात ते असे म्हणतात की पंचद्रविड हे विंध्य पर्वताच्या दक्षिणेस आहेत:

कर्नाटक (कर्नाटक ब्राह्मण)

तैलंगा (तेलगू ब्राह्मण)

द्रविड (तामिळनाडू आणि केरळचे ब्राह्मण)

महाराष्ट्रका (महाराष्ट्रीयन ब्राम्हण)

गुरजारा (गुजराती, मारवाडी आणि मेवाडी ब्राह्मण)

यातले गुजराती, मारवाडी, मेवाडी यांचा विवाहसोहळा इथे कोणी अटेंड केला आहे का? मराठी ब्राह्मण विवाह सोहळ्यात आणि त्यांच्यात कालौघात बराच फरक झाला असावा असे वाटते.युट्यूबवर गुजराती ब्राह्मण विवाहसोहळा असे थेट शीर्षक असेलेले व्हिडिओ मिळेनात.
मराठी,कन्नड,तेलुगू,तमिळ या भाषा बोलणार्‍या ब्राह्मण जातींमधल्या विवाहसोहळ्यातले कॉमन घटक म्हणजे वधूने नऊवारी किंवा पाचवारी साडी नेसलेली असणे (डोक्यावर पदर घेत नाहीत) आणि वराने काही विधी हे धोतर आणि उपरणे या वेशात पार पाडणे. याऊलट गुजराती, मारवाडी,मेवाडी यातल्या ब्राह्मण जातींमधल्या विवाहसोहळ्यात वधू राजस्थानी पद्धतीची चनिया चोली किंवा गरब्याला घालतात तसला पोशाख करतात.मुख्य म्हणजे डोक्यावर पदर घेतलेला असतो. हाताच्या कोपरापर्यंत दागिने असतात. दागिन्यांचा हा इतका अतिरेक मराठी , कन्नड, तमिळ ,तेलुगू ब्राह्मणांमधे नसतो. सध्या केरळी वधू (ब्राह्मणसुद्धा) जरी दागिन्यांनी लगडलेली असली तरी हे पूर्वापार नाही.सध्याचा ट्रेंड आहे.पण गुजराती, मारवाडी, मेवाडी यांचे विवाहातले पोशाख कल्हणाच्या काळापासून असेच असावेत. गुजराती ब्राह्मण वरही लग्नात धोतर आणि उपरणे या वेशात असतात का?

तस्मात गुजराती , मारवाडी, मेवाडी ब्राह्मण यांना पंचद्रविडात मोजणे योग्य वाटते का? ते सरळसरळ उत्तरभारतीय/राजस्थानी वाटतात.द्रविड वाटत नाहीत.

मी एकही गुजराती,मारवाडी, मेवाडी लग्न अटेंडलेले नाही.हे टिव्ही,युट्यूब यावरुन अंदाजलेले असल्याने चुकू शकते.तस्मात या गुजराती ब्राह्मण विवाहसोहळ्यांना कोणी हजेरी लावली असेल तर मराठी ब्राह्मण आणि गुजराती ब्राह्मण यांच्या विवाहसोहळ्यात काय फरक आहे ते सांगावे. _/\_

Group content visibility: 
Use group defaults