सॉफ्टवेअरमधील नोकरी संदर्भात सल्ला हवा आहे.

Submitted by पीनी on 29 December, 2020 - 09:17

इथे सॉफ्टवेअरच्या बऱ्याच चर्चा वाचल्या. मलाही सल्ला मिळेल अशा आशेने धागा काढतीये.
मी ११ वर्ष जावा डेव्हलपर म्हणून काम केलं आहे. काही पर्सनल कारणांमुळे तीन वर्षांपूर्वी नोकरी सोडली. आता परत नोकरी सुरू करायची आहे. सॉफ्टवेअर व्यतिरिक्त इतर काही करणार नाही, हे नक्की. कोडींग, लॉजिक माझं पॅशन आहे.
पण तीन वर्षांच्या गॅप मध्ये खूप गोष्टी बदलल्या आहेत - मार्केट आणि वैयक्तिक आयुष्यातही.
मला घराकडे, बाळाकडे दुर्लक्ष न करता काम - जॉब करायचा आहे. जावा ओपन सोर्स असल्याने स-त-त शिकणे कधीच थांबत नाही. अर्थात कुठल्याही technology मध्ये आपण कायम विद्यार्थी असणार हे मला मान्य आहे. पण ज्यांनी जावा मध्ये काम केले आहे त्यांना माहिती असेल की UI पासून, Database, memory- performance सगळं काही यात येतं आणि ते सतत बदलत राहत. मी फक्त बॅकेण्ड / फ्रंट एंड मध्ये काम करेन असं सांगूनही इतर काम येत असतातच. आणि आपल्याला आले पाहिजे ही अपेक्षा असतेच हे गेल्या 11 वर्षांत मी भारतात आणि भारताबाहेरही अनुभवले आहे. मी बॅकेण्ड डेव्हलपर आहे म्हणून मी json किंवा ext JS च्या चेंजवर काम करणार नाही, हे कुठेही चाललं नाही. Senior Developer म्हणून बेसिक सगळं केलंच - आलंच पाहिजे अशाच वातावरणात मी राहिले आहे. रात्री जागून, चुकत माकत शिकून वेळ निभावून नेली आहे. (ज्यांना कामाच्या सीमारेषा आखता येऊन काम करता आले आहे , ते लकी लोक आहेत. मी त्यांपैकी नाही) पण आता अशा वेळी शारीरिक आणि मानसिक दोन्ही ताकत कमी पडेल, हे जाणवते. याशिवाय performance tuning/ CI च्या नवीन पद्धती, एनवेळाचे चेंजेस, production issues वगैरे वगैरे म्हणलं की अंगावर काटा येतोय. 11 वर्ष खूप मन लावून प्रचंड काम केलंय. पण आपण पोलिटिक्स मध्ये तग धरू शकणार नाही, हेही माहिती आहे.
या सगळ्या background वर मी कुठली तरी थोडी तरी boundry असलेली नवी technology शिकावी आणि त्यात काम करावे असं ठरवत आहे.
१. एका बाजूने वाटते की नवीन काही शिकण्यापेक्षा इतकी वर्षे ज्यात काम केले ते पुन्हा करणे सोपे जाईल का. पण वरचा सगळा विचार आला की जावा नकोच असं वाटतं.
२. त्यातल्या त्यात Boundary असणारी technology बघावी असा विचार करते आहे. Salesforce किंवा RPA - Blue Prism, UI path वगैरे बघावं का ? कोणी यापैकी कशावर काम करतं का?
३. ऑटोमॅशन Testing हा कदाचित त्यातल्या त्यात सोपा आणि नोकरी मिळायला जमणारा मार्ग वाटतो. पण त्यात माझी लॉजिक / नवीन क्रीएशनची भूक कदाचित भागणार नाही. अर्थात सध्या हे सेकंडरी आहे.

इथे खूप experience असलेले बरेच लोक आहे. तुमच्या सल्ल्यांच्या प्रतीक्षेत.

त.टी. १. माझ्या करिअर आणि नोकरीला घरून पूर्ण पाठींबा आहे. नवरा स्वयंपाक करणे, इतर कामे, बाळाला मालिश करून अंघोळ वगैरे सगळं काही करतो. मेथी, तुरीचे दाणे सारख्या किचकट भाज्यासुद्धा एकटा निवडतो. पण मलाच आता unlimited शारीरिक आणि मानसिक कष्ट नको वाटत आहेत. Boundry मध्ये असणारे कष्ट करावेच लागतात, त्याला माझी ना नाही.
२. जावा मध्येच मला शांत , न फाटलेला प्रोजेक्ट मिळाला तर त्याहून भारी काहीच नाही. पण मला कोणी सोन्याच्या ताटात अशी नोकरी आणून देईल असं अजिबात वाटत नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्हाला version control साठी subversion चा अनुभव असेल तरी git नक्की शिकुन घ्या, ant वापरलेलं असेल तर maven शिकुन घ्या, Spring वर काम केलं असेल तर Spring Boot वापरुन बघा. या छोट्या छोट्या टप्प्यांनी तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि मग पुढे Azure/AWS वगैरे cloud providers शिकायला उत्साह येईल. तुमच्या मुळ जावाच्या ज्ञानाला बळकटी मिळेल.
तुमच्या पुर्वीच्या अनुभवाबद्दल अजुन थोडे डीटेल्स मिळाले तर customized learning roadmap सुचवता येईल

Shreyaa_11 - इथे म्हणजे अमिरिकेत म्हणत आहात काय? उलट इथे तर सॉफ्टवेअर मधे सर्वात फ्लेक्सिबल जॉब्ज आहेत. कामाचे स्वरूपच असे असेल की घरून अजिबात करता येत नाही तरच प्रश्न असेल. पण आता सध्या तर सर्वच घरून करत आहेत. बाय द वे, मेनफ्रेम्स मधे अजूनही संधी आहेत असे ऐकले आहे. कारण ते कस्टमर्स इतक्या सहजी बदलत नाहीत आपल्या सिस्टीम्स. मला त्यातली फारशी कल्पना नाही.

ज्यांचा मुळात डेव्हलपर म्हणून अनुभव आहे ते लोक टेस्टिंग मधे का बघत आहेत हे लक्षात येत नाही. यात टेस्टिंगला कमी लेखण्याचा उद्देश नाही. जे लोक मुळातच टेस्टिंग मधला अनुभव असलेले आहेत त्यांनी बघणे बरोबर आहे. पण मूळचा वेगळा अनुभव असलेल्यांनी एक "कॅच ऑल्/बॅकअप" म्हणून टेस्टिंग मधे जॉब शोधण्यात अर्थ नाही. एकूणच मॅन्युअल टेस्टिंग हा प्रकार कमी होत चालला आहे असे सध्या म्हणतात. त्यात हे जॉब्ज भारतात नेण्याकडे कल आहे. कामही डेव्हलपरला जितके असते तितकेच टेस्टिंग मधे असते. मग जो आपला कम्फर्ट झोन आहे त्यातच जॉब बघणे जास्त चांगले. लँग्वेज, टेक्नॉलॉजी वेगळी असली तरी हरकत नाही. ती शिकता येते.

छान सुचवताय व्यत्यय. मला नाही कळणार सगळेच, पण त्यांना आहे त्याच बेसवर त्यतल्यात्यात सहजतेने नव्याने कुठेकुठे जोडून घेता येईल, हे ठरवता येईल.... टर्म्स माहिती असल्याने.

सर्वप्रथम, पीनी, तुमचे धन्यवाद ह्या पोस्ट साठी आणि wish you all the very best!

मी पण १३+ वर्षांच्या ब्रेक नंतर परत नोकरी करायचं ठरवलंय. आधीचा १० वर्षांचा अनुभव आहे (C++, Oracle, SQL etc).
खूपच भीती आणि शंका होत्या मनात. वाटत होतं, मला programming च P पण आठवणार नाही.
मग एके दिवशी स्वतःच JavaScript शिकायला घेतलं (June'2020).
मग, नव्या टेक्नॉलॉजी शिकायसाठी Full stack Web Development Bootcamp (NYC, but remote due to covid-19) जॉइन केला, their admission process had online coding test, technical interview with live coding etc. ते २ राउंड यशस्वीपणे पार पडल्यामुळे आत्मविश्वास (आणि प्रचंड आनंद) खूपच बळावला होता. कोर्स चे १७आठवडे भर्रकन गेले आणि नुकताच दोन आठवड्यां मागे तो पूर्ण ही झाला (उत्तम रीत्या) !
आता job hunt सुरु (Looking for jobs in remote positions and/or NYC and around areas). कुणाकडे काही ओपनिंग्ज ची माहिती असल्यास अर्थात कॄपया कळवा.

माझ्याकडे तुम्हाला द्यायला सल्ला नाही.
फक्त एव्हढच सांगायचं होतं की जर १३+ वर्षांनंतर मी हिंमत करु शकते तर ३ वर्षं म्हणजे काहीच नाही.
आणि हो, मलाही सांगण्यात आलं होतं खोटा अनुभव दाखवण्याबद्दल etc गॅप च्या जागी.. तत्व आणि भीती दोन्ही आड येतात!!
बघू या कसं काय जमतेय ते (जॉब मिळवणे, करणे नाही. आता खात्री आहे की जॉब मिळाल्यानंतर नवीन काम शिकून मी छानच करेन)

अनिता, श्रेया, एबी तुम्हला या धाग्याचा उपयोग होतो आहे हे वाचून बरं वाटलं. तुमचे अनुभव इथे लिहिल्याबद्दल धन्यवाद.

फारएण्ड , " ज्यांचा मुळात डेव्हलपर म्हणून अनुभव आहे ते लोक टेस्टिंग मधे का बघत आहेत "
>> मी माझ्याबद्दल सांगू शकते. सगळे डेव्हलपर्स कोड लिहिल्यानंतर पॉसिटीव्ह आणि निगेटिव्ह सीनारिओ चेक करतातच. शिवाय आम्ही acceptance test वगैरे cucumber मध्ये लिहीत असू. त्यामुळे टेस्टिंग जमू शकतं असा थोडा विश्वास आहे.
डेव्हलपमेंटमध्ये मेमरी, परफॉर्मन्स, post production issues, CR वगैरे असतातच. त्याशिवाय आपण कधी काम न केलेल्या गोष्टींवर interview होतो. ११ वर्षांत माझ्या दुदैवाने मला कधीच multithreading कोड वापरावा लागला नाही. त्यामुळे त्याची फक्त थेअरी माहिती आहे. काही ठिकाणी मला interview मध्ये यामुळे प्रॉब्लेम झाला. ११ वर्षाला सगळं - सगळं आलं-च पाहिजे, सगळ्यावर काम केलेले असलं-च पाहिजे, या अपेक्षा असतात. त्यामुळे भीती डोक्यात बसली आहे.

कारवी >> हो. व्यत्यय छान सुचवत आहेत.

व्यत्यय -तुम्हाला थोड्या वेळाने डिटेल वि पू करते. चालेल ना?

तुम्ही एथिकल हॅकिंग शिकून त्याचा Application Security मध्ये उपयोग करू शकता. थोडा वेगळा मार्ग आहे आणि यात नवीन शिकणे आवडण्यासारखे असू शकते आणि काम करताना समाधान देईल.

@ पीनी, त्यामुळे भीती डोक्यात बसली आहे. >>>>
इतकाच अडथळा आहे, डोक्यातला सेल्फ डाऊट, जो तुम्हाला दूर करणे शक्य आहे.
बाकी छान आहे सगळे. करायला सुरूवात केली की सापडतो जुना रिदम.

एकट्या असतानाच्या ११ वर्षासारखे गळ्यापर्यंत बुडायचे काम नाही घ्यायचे फारतर. बाळ थोडे मोठे रांगते-धावते झाले की अजून व्यग्र व्हाल. पुढे शाळा, अभ्यास वगैरे येईल. मग WFHही टप्प्याटप्प्यात करावे लागेल. पण जमेल नक्की.

माझ्या एका मैत्रिणीने employee ऐवजी consultant म्हणून काम केले होते तिच्याच कंपनीत. प्रवासाचा वेळ, दगदग घर-र्ऑफीस कसरत वाचली. टीम तीच, काम माहितीचेच. परीक्षा, मुलीच्या स्पोर्टस स्पर्धा लक्षात घेऊन ती काम घ्यायची, पूर्ण करायची. मग महिनाभर गॅप. मुलीचे कार्यक्रम आटोपले की पुढचे काम. पैसे त्याप्रमाणे. मुलगी मोठी स्वतंत्र झाल्यावर पुन्हा रेग्युलर काम सुरू केले.

प्रतिसादासाठी धन्यवाद फारएण्ड ..
इथे म्हणजे अमिरिकेत म्हणत आहात काय? >>> हो अमेरिकेत आहे .. माझ्या क्षेत्रात बऱ्याच संधीही उपलब्ध आहेत . पण हेच वाटते एवढ्या गॅप नंतर जमेल कि नाही ?

उलट इथे तर सॉफ्टवेअर मधे सर्वात फ्लेक्सिबल जॉब्ज आहेत >>>> खरंतर नाहीये .. friend circle मध्ये डेव्हलपर आणि टेस्टर असे दोन्ही आहेत सो तुलनेत टेस्टिंग वाल्याना कमी ताण आहे ..प्लस घर आणि नोकरी सांभाळताना त्यांची जी ओढाताण होते ती बघवत नाही .त्यामुळे खरं तर टेस्टिंग मध्ये स्वीच करायचा विचार केला .पण टेस्टिंग पेक्षाहि माझ्याच क्षेत्रात जास्त संधी उपलब्ध आहेत .

मग जो आपला कम्फर्ट झोन आहे त्यातच जॉब बघणे जास्त चांगले. >>>> हे पटले ... मला अनुभव हि आहे त्यामुळे त्यातच काम करणे जास्त सोपे जाईल असे वाटते .

कारवी प्रतिसाद नेहमी प्रमाणे मस्त व बरोबर. . मी पण अजून वेगळे काय लिहि णार पण मी दोन अडीच वर्शे ब्रेक घेतला होता.

१) प्रथम म्हणजे एक वर्किंग प्रोफेशनल म्हणून आपली इंटेग्रिटी ऑनेस्टी अतिशय महत्वाची आहे व जसे जसे अप द व्हॅल्यु चेन व कार्पोरेट
लॅडर वर पुढे चढत जाल तेव्हा आपले प्रोफेशनल बिहेविअर, व इंटेग्रीटी, विश्वासार्हता हे महत्वाचे होत जाते. आता रेझुमे कुक अप करू नका जे आहे ते खरे च लिहा. हा एक सिनीअर म्हणून सल्ला आहे. जस्ट एक नोकरी म्हणून कन्सिडर करू नका तर आता बेबी प्रॉजे क्ट सक्सेस फुल झाला आहे तर पुढील वाटचाल २५- ३५ वर्शाची करीअर म्हणून प्रत्येक फेज मध्ये जी काय योग्य अ‍ॅक्षन घ्यायची ती घ्या.

२) मी अडीच वर्शे ब्रेक घेतला होता प्रेग्नंसी लास्ट ट्रायमेस्टर ते बेबी तीन वर्शाची होई परेन्त. ती एल केजीत जायला लाग ली तेव्हा घर, जवळची शाळा व मेड ही सोय करून मग मी परत कामाला लागले. आर्थिक स्वातंत्र्याची सवय असल्याने मला हा घरी बसायचा वेळ जड गेला एका परी पण बाल संगोपन व्यवस्थित व सिंगल माइंडेड फोकसने करता आले. ही फार महत्वाची फेज आहे व बेबी च्या वाढीची वर्शे आहेत. तेव्हा हा
वेळ वाया जातो आहे असे आजिबात समजू नका. आर्थिक काँप्रमाइज करावे लागले तर ती तयारी असूद्या मनाची.
३) बेबी पहिलीत जायला लागले पाच सहा वर्शा चे झाले व फुल टाइम शाळेत जाउ लाग्ले की त्याचे स्के जुल नीट बसेल व तुमचे पण वर्क
आर्क नीट डिफाइन होईल. मेहनत व दगदग आई व बाळ दोघांची कमी होईल.

सध्या गरजच असल्यास अर्ध वेळ काम करा. लीन इन पुस्तकात झकर बर्ग ची बहीण म्हणते की तुम्ही जीवनात सर्व अचीव्ह करू शकता पण सर्व एकाच वेळी मिळेल असे होत नाही. करीअर फुलफिल मेंट मदरहुड आर्थिक स्वातंत्र्य हे सर्व मेजर लाइफ गोल्स नक्कीच अचीव्ह करता येतात. धीर धरा व पुढे चला.

नरेन>> एकदम वेगळाच मार्ग सांगितला तुम्ही. धन्यवाद. नक्की बघते.

कारवी, अमा, तुमच्या पोस्ट्स छान आहेत. धन्यवाद.

Pages