सोपी पण चविष्ठ - मसाला भेंडी

Submitted by maitreyee on 27 December, 2020 - 20:38
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

भेंडी, चौकोनी चिरलेली - साधारण ३-४ वाट्या, कांदा १ मध्यम किंवा अर्धा मोठा, टोमॅटो - १ मध्यम आकाराचा, सिमला मिरची - एक मध्यम. किंवा फार मोठी असल्यास अर्धी पुरेल, धण्या-जिर्याची पूड दीड ते २ चमचे, गरम मसाला (ऑप्शनल), कसुरी मेथी, हळद, तिखट, मीठ, फोडणीचे साहित्य.

क्रमवार पाककृती: 

ही भाजी सोपी आहे. फार खटपट नाही. पण चटपटीत, अगदी रेस्टॉरन्ट स्टाइल लागते चवीला. भेंडी आणि सिमला मिरची हे काँबिनेशन छान लागते.
तर भेंडी, कांदा, टोमॅटो, सिमला मिरची चिरून घ्या. भेंडी फार बारीक चिरू नये. सिमला मिरचीचे देखिल मोठेच तुकडे असू द्यावे.
कढईत तेल गरम करून जिरे मोहरीची फोडणी करा. त्यात कांदा परतावा. पारदर्शक झाला की टोमॅटोच्या फोडी घालून परताव्या.
मिश्रण जरा मिळून आले की धणे जिरे पावडर, गरम मसाला (घालणार असल्यास), हळद, तिखट घाला. लगेचच भेंडी घालून जरा परतावी. २-३ मिनिटांनी सिमला मिरचीचे तुकडे घालावे. सिमला मिरची थोडी नंतर घालण्याचे कारण म्हणजे ती फार गाळ शिजणे अपेक्षित नाही.
आता मीठ घालावे, भाजी मध्यम आचेवर शिजू द्यावी. झाकण ठेवू नये. शिजत आल्यावर दोन तीन चिमुट कसुरी मेथी घालून मिक्स करा. कसुरी मेथीचा स्वाद फार छान लागतो. गॅस बंद करून वरून कोथिंबीर घाला. भाजी तयार!
bhendi1_0.jpg

वाढणी/प्रमाण: 
३-४ जणांना पुरावी.
माहितीचा स्रोत: 
पंजाबी रेस्टॉरन्ट मधे खाल्ली होती, त्यानंतर स्वतःच प्रयोग करून ही रेसिपी फायनल केली.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

हॉटेलात मसाला जास्त आणि भेंडी फार कमी असतात , तेंव्हा मला फार राग येतो

मघाशी सिमला मिर्ची निसटली नजरेतून. हे ट्राय करायला पाहीजे.
सिमि ऐवजी हिमि आणि भरपूर कांदा घालून नेहमी होते ही भाजी आमच्याकडे.

सोपी आहे . करून पाहीन

एक शंका : सिमला मिरची घातल्याने भेंडीचा स्वाद मारला जात नाही का ?

थॅन्क्स. जाई - सिमला मिरची चे प्रमाण कमी असल्याने स्वाद येतो पण ओवरपावर करत नाही. देवकी, टोमॅटो आहे यात आधीच त्यामुळे तशी गरज भासत नाही पण घालायचा तर चव बघून मगच आमचूर घाला हे सजेस्ट करेन.

मी आज रात्री भेंडीची भाजी करणार आहे.. आणि अनायासे सिमला मिरची पण आहे घरात.. ह्या पद्धतीने करून बघेन..

छान रेसीपी. करून पहाण्यात येईल ( खरं तर करून खाण्यात येईल म्हणायला हवं Wink )

आमच्याकडे शिन चॅनचा भाऊ रहात असल्याने सिमला मिर्च घालणं मुश्कील. पण मला रेसिपी आवडल्यामुळे एकदा स्वतःसाठी नक्की बनवेन.

आमच्या कडे मसाला भेंडी म्हणजे ब्राऊन ग्रेव्ही असते. हॉटेलमध्ये असते तशी. ( The Home minister - youtube )

छान पाककृती .. माझ्या लेकाला भेंडी आजिबात आवडत नाही पण सिमला मिर्च आवडते , आता या पद्धतीने करून खायला घालेन .

मस्तं !
खाल्ली आहे ही गरमागरम भाजी MT च्या हातची !