मी एका छोट्या गावातून आहे. मी Information Technology मधुन Polytechnic ३ वर्षांचा diploma केलेला आहे. माझी घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने खूप इच्छा असूनही मी पुढे यात degree चे शिक्षण घेऊ शकलो नाही. पुढे काही आरोग्यविषयक समस्येतून(depression वगै) मी २ ते ३ वर्ष घरीच होतो. त्यानंतर २ वर्ष मी एका संस्थेत computer operator चे काम केले. सध्या मी jobless आहे.
तरी आता मला पुण्यात येऊन IT मधे जॉब मिळू शकतो का?
मला c language, c++, Java, SQL यात प्रोग्रामिंग चे basic knowledge age.
IT सोडूनही इतर जॉब मला मिळू शकतो यावर माहिती द्यावी.
मायबोलीवर मी ४ वर्षांपासून वाचक आहे.इथे या क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती आहेत. आपला सल्ला माझ्यासाठी अत्यंत उपयोगी ठरू शकतो. त्यामुळे कृपया ignore na करता आपला अमूल्य advice द्यावा.
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
https://www.naukri.com/java
https://www.naukri.com/java-dot-net-c-plus-plus-rdbms-jobs
https://www.simplyhired.co.in/search?q=freshers+c%2F+c%2B%2B%2F+java
https://in.indeed.com/Java,c,c++-Fresher-jobs
https://www.monsterindia.com/search/c-jo
https://www.freshersworld.com/c++-jobs/3535007bs
@रानभुली आपल्या
@रानभुली आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
परंतु माझा डिप्लोमा झाल्यानंतर बराच gap असल्याने मी पुण्याला येऊन शोधल्यास मला जॉब मिळू शकतो का? काही अडचणी येवू शकतात का ? यावर मला सल्ला हवा आहे. खरं तर मी सध्या पुणे शहरापासून दूर असल्याने आधी इथे सल्ला घ्यावा ही अपेक्षा आहे.
हल्ली तश्याही कंपनीज टेली
हल्ली तश्याही कंपनीज टेली इंटरव्ह्यू घेतात.त्यामुळे पुण्याचा/जवळचा नातेवाईकांचा पत्ता टेम्प अड्रेस म्हणून देऊन टेली इंटरव्ह्यू आणि मग प्रत्यक्ष काही मिळालयावर राहण्याची व्यवस्था असे बरे पडेल पुण्यात येऊन नोकरी शोधण्या पेक्षा
कंपनीज इमिजीएट जोईंनर शोधत असतात.विशेषतः ज्यांना बेंच ठेवणे परवडत नाही त्या कंपनी प्रोजेक्ट हातात मिळाल्यावर शोधायला घेतात, मग त्यांना ताबडतोब जॉईन होणारा(म्हणजे 15 दिवस ते 1 महिन्याच्या आत) माणूस हवा असतो.
लिंकडइन वर स्पष्ट स्किल्स हेडर मध्ये टाकून अव्हेलबल चे हिरवे आयकॉन प्रोफाइल ला लावायचे सेटिंग असते ते करावे.
नोकरी.कॉम वरसुद्धा स्किल आणि इमिजीएट जॉईनर हे स्पष्टपणे प्रोफाइल ला लिहून मुद्देसूद सीव्ही टाकावा.
लिंकडइन वर सर्व मोठ्या कंपनीज फॉलो करून ठेवाव्या.
सोर्सफोर्ज वर एखादे ओपन सोर्स प्रोजेक्ट करता आले तर ते प्रोफाइल ला लिहिता येईल.
चांगल्या विषयांचे (आर्टिफिशियल इंटेलिजन्स , मशीन लर्निंग, गुगल क्लाऊड) चे जितके पण कोर्स उडेमी आणि लिंकडइन लर्निंग वर फुकट आहेत ते करून (खरोखर अभ्यास, नुसते कर्सर पुढे पुढे नेत कम्प्लिट असे नाही) प्रोफाइल ला पब्लिश करत राहावे.
जवळच्या मित्राना खूप जॉब ओपनिंग च्या पोस्ट येत असतात.त्यांना चांगल्या जॉब पोस्ट वर तुम्हाला टॅग करायला सांगावे.
लिंकडइन वर शक्यता 1000-3000 चांगली कनेक्शन्स बनवावी.
(सर्वात महत्वाची टीप: तुम्हाला खूप चांगले लोक भेटतील, ते मदत करायला बघतील.पण अपवादात्मक एक दोन डुकरे अशी भेटतील जी मनातूनच तुम्हाला घ्यायचे नाही ठरवून मुद्दाम वेळ खातील. पर्सनल आयुष्य, समस्या याबद्दल खूप खोलात जाऊन माहिती विचारतील.हे सर्व कॉर्पोरेट दृष्टिकोनातून अजिबात डिटेल्स मध्ये आवश्यक नसलेले तपशील मिटक्या मारत ऐकून झाल्यावर 'तू 4 वर्षांपूर्वी प्रयत्न करायला हवे होतेस, आता तू खूप पुढे आलास.तुला आयुष्यभर नोकरी मिळणार नाही.असं नसतं' ऐकवतील. या डुकरांना क्षमा करा आणि त्यांचे शांतपणे आभार माना.त्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या चांगल्या माणसांची किंमत तुम्ही ओळखायला शिकणार आहात.कोणत्याही प्रकारचा गिल्ट बोलण्यात येऊ द्यायचा नाही.तुम्ही उशिरा नोकरी शोधता आहात.तसेच इंटरव्ह्यू घेणाऱ्या कंपनीज चेही काही वीक मुद्दे असणार आहेत.कमी पगार, भरपूर कामाचे तास, बेंच नसणे वगैरे.गरज दोघांना एकमेकांची आहे.Dont let them bully you.
नोकरीची अधिक गरज असलेल्याला प्रोफाईल ची, ऑफर टर्म्स ची पूर्ण माहिती न देणे, खोटी माहिती देणे, माणूस मिळवायचा म्हणून बऱ्याच गोष्टींना हो म्हणणे हे सर्व रिक्रुटमेंट मध्ये चालते आहे.बरेचदा कँडीडेट पण फार गुंडाळतात. त्यामुळे जी माहिती मिळणे आवश्यक आहे ती विचारून नक्की बघावी.'घाईत आताच्या आता सांग' म्हणणारा माणूस एखाद्या शेडी डिल साठी शोधत असण्याची शक्यता 60% आहे.तसेच आधी 'स्टार्टप साठी काम आहे' सांगून नंतर 'कॅपिटल इन्व्हेस्टमेंट' म्हणून बरेच पैसे मागणारे, मोठ्या बाता मारून अर्ध्या खोलीत कॉल सेंटर चालवणारे असे बरेच नमुने जॉब साईट्स वर आहेत.त्यातले तुम्हाला कोणीही न भेटो, भेटले तर ओळखायला शिका)
जॉब देतो असं सांगून या अकाउंट
जॉब देतो असं सांगून या अकाउंट वर पैसे भरा असं कोण म्हणालं तर शक्यतो विश्वास ठेवू नका.
बाकी शुभेच्छा!
@mi_anu आपल्या विस्तृत
@mi_anu आपल्या विस्तृत प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार.
@ संशोधक आपली सूचना लक्षात ठेवील.
उत्तम सल्ले मिळाले आहेत.
उत्तम सल्ले मिळाले आहेत. विश्वास ठेवून काम होईल.