काय म्हटले की तुम्हाला काय आठवते?

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 December, 2020 - 02:44

म्हणजे बघा, हं
सनी म्हटले की कोणाला सुनिल गावस्कर आठवतो, कोणाला सनी देओल आठवतो, तर कोणाला सनी लिओनी आठवते.

राहुल म्हटले की एखाद्याला राहुल द्रविड आठवतो तर एखाद्याला राहुल गांधी..... मला मात्र शाहरूख आठवतो

अगदी राम म्हटले तरी मी नास्तिक असल्याने रामायणाच्या रामाआधी मै हू ना मधील राम झालेला शाहरूखच आठवतो

अभिषेक म्हटले की ज्युनिअर बच्चन आठवत असेल लोकांना, पण मला किनई तुमचा अभिषेकच आठवतो Happy

सचिन म्हटले की सचिन तेंडुलकरच डोळ्यासमोर येणारे करोडो असतील, पण माझ्यासारखेही शेकडो असतील ज्यांच्या डोळ्यासमोर महागुरू सचिन पिळगावकर देखील सोबतच येतात.

डॉन म्हटले की अमिताभ की शाहरूख या वादात न जाता आजही माझ्या डोळ्यासमोर दाऊद ईब्राहीमच येतो.

हे झाले व्यक्तींचे,
वडा म्हटले की काय येते तुमच्या डोळ्यासमोर... बटाटावडा की मेंदूवडा...?
मला आमचे मालवणी वडे आठवतात जे गावरान कोंबडीसोबत खाल्ले जातात Happy

ती आमीरखानची जाहीरात नाही का, थंडा बोले तो कोकाकोला... म्हणजे मिनरल वॉटर म्हटले की जसे कित्येकांच्या डोळ्यासमोर पहिल्यांदा बिस्लेरीच यायची तसे थंडा म्हटले की लोकांना कोकाकोलाच आठवायला हवे हा त्या जाहीरातीमागचा फंडा.

बर्र ऑमलेट म्हटले की काय आठवते? अर्थात, मला तरी अंड्याचे ऑमलेट आठवते. शाळेत असताना एकाने ऑमलेट खाणार का विचारत डब्यातून बेसनाचा पोळा काढलेला तेव्हा अशी सटकलेली माझी.... तोपर्यंत या प्रकारालाही टोमेटो ऑमलेट बोलतात याची कल्पना नव्हती.
हेच पोळी बोलून पुरणापोळीच्य जागी चपाती देणार्‍यांबाबतही व्हायचे. आणि यात चूक ना त्यांची ना माझी..

असो,
मेट्रो म्हटले की आजही डोक्यात पहिले मेट्रो ट्रेन न येता मेट्रो टॉकिजच येते, कारण जुन्या मुंबईशी नाळच तशी जुळली आहे Happy
आणि हि फार्र मोठी लिस्ट आहे...

दरवेळी एखादे नाव वा शब्द कानावर पडताच आपल्याला त्या नावाची सर्वाधिक प्रसिद्ध व्यक्ती वा वस्तूच आठवावी असे गरजेचे नसते, कारण आपला मेंदू म्हणजे काही गूगल सर्च नाहीये.
बरेचदा आपले वैयक्तिक संदर्भ वा आवडही एक असते ज्यानुसार ते ते पहिले डोक्यात येते.
वस्तू, मनुष्य, पशू पक्षी, स्थळ, काळ, घटना वगैरे बरीच आणि विविध प्रकारची सूची बनेल...
ईथे तेच करूया, धागा विरंगुळा ग्रूपमध्ये आहे, तर कोणी काय म्हटले की तुम्हाला पहिले काय आठवते ते लिहूया आणि थोडा विरंगुळा मिळवूया Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानव म्हटले एके मला थेट आदिमानव आठवतो Happy
कारण माणसं लोकं असे शब्द रोजच्या व्यवहारात वापरायची सवय आहे...

मला शाखा, सई आणि स्वजो म्हटले की तू (च) आठवतोस >>> Lol
मला मायबोली म्हटले की ऋन्मेष आणि ऋन्मेष म्हटले की मायबोली आठवते!

शब्दांशी आठवणी जोडलेल्या असतात. ते शब्द जेंव्हा पहिल्यांदा ओळखीचे होतात तेंव्हाचा प्रसंग/वातावरण हे त्याशी जोडले जाते. नंतर तो शब्द म्हणताना पार्श्वभूमीवर कुठेतरी तेच आठवते. कधी कधी शब्दार्थाचा आणि आठवणीचा थेट संबंध सुद्धा नसतो.

हरभऱ्याची भाजी: म्हणजे हरभऱ्याची कोवळी पाने तोडून केलेली भाजी. फार रुचकर असते. पण मला हरभऱ्याची भाजी म्हणताच आजही माझी आज्जी आठवते. कारण तीच हि भाजी शेतातून खुडून आणून करत असे.

थम्सअप: शाळेची सहल एकदा मालवणला गेली होती. तेंव्हा पहिल्यांदा थम्सअप प्यायलो होतो. माहित नव्हते कसे असते. परंतु साखरेचे गोड पाणी असेल अशी समजूत असल्याने बाटली तोंडला लावली नी घटाघटा प्यायलो. आणि जे जोराचा ठसका आला, नाकातोंडातून झिणझिण्या आल्या, चेहरा वेडावाकडा झाला. थम्सअप म्हटले कि आजही पुसटशी मालवणची आठवण येतेच.

चार्वाक: चार्वाक आणि वाघ या दोन्हींचा काही संबंध नाही. पण मला चार्वाक म्हटले कि झेप घेणाऱ्या वाघाचे चित्र डोळ्यासमोर येते. याचे कारण असे कि लहानपणी किशोर च्या एका अंकात महर्षी चार्वाक यांची गोष्ट होती. चार्वाक शब्द पहिल्यांदा तिथे वाचला. त्यात वाघाचा उल्लेख होता. व जंगलातून जाणाऱ्या रस्त्याकडेच्या झुडूपातून वाघ झेप घेत आहे असे दाखवले होते. चार्वाक म्हंटले कि तेच अजूनही डोळ्यासमोर येतेच.

देव: लहानपणी "देवबाप्पाला नमस्कार करण्यासाठी" म्हणून देवघरात जायचो तेंव्हा तिथे रांगणाऱ्या बाळकृष्णची मूर्तीच प्रामुख्याने दिसायची. त्यामुळे देव म्हटले कि हीच मूर्ती डोळ्यसमोर येते.

मला मायबोली म्हटले कि गटारीचा रस्सा कसा संपवावा धागा आणि त्यावरचे प्रतिसाद आठवतात.. तेव्हा मी रोमात होते आणि फार फार हसले होते ते वाचून Lol

Proud

ओमनी कार बाबत खरे आहे
माझी बायको अश्या स्लायडींग डोअर टॅक्सीत बसायला नेहमी नकार द्यायची. अगदी आम्ही टॅक्सीची वाट बघून कंटाळलो असू आणि ती आली तर जाऊ द्यायची. माझी चीडचिड व्हायची. मग अखेर मीच विचार करून कारण काय असावे हे शोधले. तिला विचारून कन्फर्म केले. ते हेच होते. तेव्हा हसायला आले. पण वास्तव म्हणून हे दुखद आहे.

हेहेहेहे, मला कुल्फी किंवा बिस्किट म्हणलं कि हाब ची गोष्ट आठवते.
आणि मानव इतकी वर्षे मला एलदुगो मधला मानव आठवायचा पण आता तुम्हीच आठवता Happy मानव पृथ्वीकर

शब्दांशी आठवणी जोडलेल्या असतात
>>>
अतुल खरे आहे..
आणि छान पोस्ट..

कुल्फी म्हटले की मला आमच्या जुन्या दक्षिण मुंबई चाळीतील डोक्यावरच्या मटक्यात बर्फांच्या चुरयात लपवलेली मलाई कुल्फी विकणारे घाटीमामाच आठवतात. बाकीच्या सर्व कुल्फ्यांना मी आईसक्रीमच बोलतो.

हेहेहेहे, मला कुल्फी किंवा बिस्किट म्हणलं कि हाब ची गोष्ट आठवते.
>>>

धनुडी मग हे कथावाचन आवडेल बहुतेक.

https://www.youtube.com/watch?v=YISFD6-diqw&list=PLTwzbp7MwEKp5odfg9oj42...

मला मानव म्हटलं कि ताल मधला मानव आठवतो.

फुगे म्हटलं कि, माझ्या सासरच्या गावी डोश्याचे पीठाचे भजी मिळतात छोटे छोटे..ते अशे मस्त फुगतात म्हणून त्याला फुगे म्हणतात, ते आठवतात.

एअरपोर्ट म्हटलं कि मी कामानिमित्त दिल्लीला गेले असताना ज्या गेस्टहाऊसमधे राहिले होते, त्या गेस्टहाऊस चे नाव होते ते आठवते.
तसेच मि.इंडिया सिनेमातला एअरपोर्ट पण आठवतो.

मला यमी गौतम म्हटलं की कल्याणच्या सुभेदाराची सून आठवते - यमीपेक्षा सहा पट गोरी

यमी गौतमी म्हटलं कि मला फेअर न लव्हली च आठवतं
अगदी सिनेमात तिला बघताना पण वाटतं हि आता सुरू करेल
" फेअर एन लवली का स्पेशल मिनी पैक जो दे सिर्फ पांच रूपये मे हमारा बेस्टेवर निखार..अब सिर्फ पांच रूपये मे रोज रेडी" ! Lol

मायबोली लेख म्हटले की ऋन्मेष आठवतो...
मायबोली कथा म्हणजे बेफिकीर आणि नंदिनी आठवतात...
राहुल म्हणजे शाहरुख आठवतो...
विजय म्हणजे अमिताभ...
कबीर म्हणजे शाहिद आठवतो... ( क्या फिल्म भाऊ...)

ती यमी आहे का? मी तिला ईतके दिवस यामी बोलत होतो...
आणि गौतम आहे की गौतमी... मी गौतमी बोलत होतो.
काय कन्फ्यूजिंग नाव आहे.. यात नाव कुठले आणि आडनाव कुठले आहे?

बाई दवे,
मला यमी म्हटले की कॉलेज फ्रेंड आठवते एक, आम्ही डान्स बसवलेला (पुढे तो दुर्दैवाने पुर्णत्वास गेला नाही ती गोष्ट वेगळी) पण त्यात मी यम झालेलो आणि एक धष्टपुष्ट मैत्रीण यमाची बायको यमी झालेली. मी काटकुळा यम आणि त्याची डेंजर यमी अशीच विनोदी थीम होती. त्यामुळे यम यमी यमाहा काहीही म्हटले की ते वीजेटीआयमधील डान्स प्रॅक्टीसचे दिवसच आठवतात Happy

हर्पेन , जाई Lol
अतुल , आजीची आठवण मस्तच !

मला तर काही म्हणलं नाही तरी बरंच काही आठवते. सगळं सगळं विज्युअलाइज करणारा मेंदू आहे. वस्तू-माणसं सिनेमा दिसत रहातो सारखं.... लहानपणीचे वास विशिष्ट गंध सुद्धा डोक्यात फिट बसलेत.

सुमो ऐकलं की उलटणार वाटतं.
ओमनी किडनँप
जीप हिमाचल प्रदेश
विजय विजय दीनानाथ चौहान
एलियन ET
फिटनेस अक्षय कुमार आणि vice versa.
Great figure... Halle berry , Priyanka Chopra
Greek God /Rohit ... Hrithik Roshan
सुंदर डोळे ... केटी पेरी
रोमँस .... रफी
शबाना आजमी... स्त्री मुक्ती
जलद बोलणारे/हजरजबाबी... कपिल शर्मा
प्रेत ऐकलं की माबोचा धमाल धागा.
गरिबी... पाइपमध्ये रहाणारे लोक
गुटर /गुटम मिथुन
मैसूर ... चंदनाची साबण
फँटा/ओरेंज सोडा .... मोगँबो उड्या मारायला लावायचा ते.
शूर स्त्री... शिवगामी

फँटा/ओरेंज सोडा .... मोगँबो उड्या मारायला लावायचा ते > Lol

मलाही कोणी फ्यूज उडाला म्हटले की तिरंगा मधील फ्यूज कंडक्टर आठवतो Proud

मानव म्हटलं की ताल मधला अक्षय खन्ना आठवतो
सचिन म्हटलं की तेंडुलकर च Wink
कोणताही गाण बघितल की दृष्यावरुन गाणे ओळखा धागा आठवतो....

आणि आत्ता का कोण जाणे हे पांचट गाणं आठवतंय
https://youtu.be/7tNPxY_ntEA

भक्ति म्हणलं की बर्वे आठवते. भक्ति बर्वे म्हणलं की ती फुलराणी आठवते. मी लाईव्ह नाटक पाहिलेलं नाही कारण त्या फार पूर्वी करायच्या (माझ्या जन्माआधी असेल!). पण व्हीडियोवर का दूरदर्शनवर गजरा अशा कुठल्यातरी कार्यक्रमात "तुला शिकवीन चांगलाच धडा" पाहिले होते. अगदी राजस!! वय जाणवत होतं पण एकदा का संवाद फेकायला सुरूवात केली की त्या अगदी विशीतल्या फुलराणी वाटायच्या.

नंतर प्रिया तेंडुलकर, मुक्ता बर्वे ते अमृता सुभाष बर्‍याच जणींने केले पण ती निरागसपणाची, राजसपणाची छटा नाही म्हणा, बात कुछ जमी नही. असो, उगाच लांबण लावली... मोठी क्लिप आहे खर तर, इथे थोडसं सापडलं - https://www.youtube.com/watch?v=AB4KzYl-ins

Pages