कोरोना कोरोना महामारी कोरोना

Submitted by बिपिनसांगळे on 25 December, 2020 - 00:06

कोरोना कोरोना महामारी कोरोना
-----------------------------------------------

कोरोना कोरोना महामारी कोरोना
त्याने केला तिकडे
अन इथला गोंधळ सरंना

माणसाची झाली पिंजऱ्यातली माकडं
जवळ आली जणू शेवटची लाकडं
डोळ्यांतलं पाणी जागी ठरंना

चाकरमाने बसले निवांत घरात
कष्टकऱ्यांची रोजच भुकेली वरात
नुसत्या पाण्यानं पोट भरंना

भकास रस्ते उदास बाजार
टपून बसलेला जीवघेणा आजार
माणूस त्याच्या पासंगाला पुरंना

कुठे चाललास माणसा रे आता
निसर्ग पीडेल तुला रे पुरता
तरी तुझ्यातला राक्षस मरंना

कोरोना कोरोना महामारी कोरोना

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

हि कविता कडक लॉकडाउनच्या काळातील आहे .
आज घडीला संकट टळलं नसलं तरी अगदी अशी परिस्थिती नाही .
मनाला बरं वाटणारीच हि गोष्ट .

मस्त

मुळात कवितांना प्रतिसाद कमी दिला जातो , त्यातुन ती गंभीर .
म्हणून
कुमार
विनोद
पद्म
मी आपला खूप आभारी आहे .