क्षितिज

Submitted by वैभव जगदाळे. on 23 December, 2020 - 10:47

तुझं माझं भेटणं
क्षितिजासारखं आहे...
आभाळ जमिनीला
टेकल्याचा भास होतो...
अन् मी धावत राहतो
त्या क्षितिजाकडे...
ते अशक्य मिलन
पाहण्यासाठी...
पण मी जितका पुढे सरकतोय
त्याहून जास्त ते
दूरावत चाललंय...

सुरुवातीला मला
रस्त्याची पर्वा नव्हती
टोचत्या काट्यांची अन्
लागणाऱ्या ठेचांचीही...
पाय कधी रक्ताळले
मलाच कळलं नाही
आता त्या जखमा
विव्हळत आहेत...
आणि पायातले त्राणही संपलेत
मी घायाळ होऊन
क्षितिजकडे बघतोय...
तरीही प्रयत्न करतोय
रांगत रांगत पुढे सरकायचा...
दिसणारं क्षितिज आभासी आहे
हे माहीत असूनही....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults