पालकत्व रजा - विराट कोहलीचे कौतुक, अभिनंदन आणि आभार

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 December, 2020 - 18:12

भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा चालू आहे. २०-२० आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका उरकली आणि मानाची कसोटी मालिका सुरू झाली आहे. कसोटी मालिका मानाची, महत्वाची का असते हे हाडाच्या क्रिकेटप्रेमीला सांगायची गरज नाही. अश्यात चार सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना होताच उर्वरीत सामन्यांपासून रजा घेत संघाचा कर्णधार आणि सर्वात महत्वाचा खेळाडू मायदेशी परत येणार आहे. आणि याचे कारण आहे पालकत्व रजा. जी अधिकृतरीत्या आमच्या ऑफिसमध्ये अस्तित्वातच नाही. कारण पुरुषाला एका बापाला या प्रसंगी तिथे उपस्थित राहणे आणि त्यानंतरही सुरुवातीच्या दिवसांत कुटुंबासोबत राहणे गरजेचे आहे हा विचारच नाही.

असो, तरी जो तो आपल्या आवडीनुसार, सोयीनुसार, आयुष्यातील आपल्या प्रायोरीटीनुसार ती रजा घेतोच. पण जिथे ती अधिकृतरीत्या मिळतच नाही तिथे ती चार दिवसांपेक्षा जास्त मिळणेही अवघडच असते. हे मी आमच्या ऑफिसमध्येही अनुभवलेय. बायको अ‍ॅडमिट झाल्यावरच रजा घ्यायची पद्धत आहे. मला स्वत:लाही नाईलाजाने तेच करावे लागणार होते, पण सुदैवाने पहिल्या मुलीच्या वेळी बायकोला आदल्या दिवशीच सांगितले की उद्या अ‍ॅडमिट व्हा. आणि मी चक्क ऑफिसमध्ये थाप मारली की आजच तिला अ‍ॅडमिट करत आहेत आणि ऑफिसमधून सटकलो. कारण हा क्षण मला एक दिवस आधीपासून अनुभवायचा होता. त्या क्षणाची एकत्र प्रतीक्षा करणे अनुभवायचे होते. एक शेवटचा दिवस तिचे डोहाळे पुरवायचे होते. जे नशीबाने झाले, पण दुसर्‍या मुलाच्या वेळी मात्र परंपरेप्रमाणे आधी बायको अ‍ॅडमिट झाली आणि मगच मी ऑफिसातून लॉग आऊट. अर्थात दोन्ही वेळा डिलीव्हरी नंतर मी छानपैकी आजारी पडत आठदहा दिवसांची सिक लीव्ह टाकली ती गोष्ट वेगळी. पण तरी आपल्याला नवीन बाळाची सोबत मिळावी आणि त्यांच्या आईला आपली सोबत व्हावी म्हणून असे खोटे खोटे आजारी पडावे लागले हे खटकलेलेच.

आज आमच्या एका क्रिकेटच्या व्हॉटसप ग्रूपवर चर्चा चालू होती. कोहलीने असा अर्धा दौरा सोडून जाणे गरजेचे आहे का? त्यावर विविध मते आली.. तीन तीन सामने बुडवणे गरजेचे आहे का? / जाणेच गरजेचे आहे का? / पण तो तिथे जाऊन काय करणार? / सचिनचे वडील गेले तेव्हा तो दुसर्‍या दिवशी वर्ल्डकप खेळायला पुन्हा हजर झालेला (हा तुलनेचा किडा फार असतो काही जणांत, तरी नशीब देशाची रक्षा करणारे जवान नाही कोणाला आठवले) / पहिलीच वेळ आहे, एक्सायटमेंट असेल, दुसर्‍याला नाही जाणार (दुसर्‍यांची प्रायोरीटी आपणच ठरवायची) / अनुष्का शर्मानेच सांगितले असेल, म्हणजे फोर्स केले असेल (सेलिब्रेटी म्हटले की पर्सनल कॉमेंट हक्काने आल्याच) ...

याऊलट,

चांगलेच आहे की फॅमिलीला प्रायोरीटी देतोय, क्रिकेट काय आयुष्यभर खेळायचे आहे / मजा आहे, कॅप्टन आहे, हवे तेव्हा जाऊ शकतोय / त्याची पर्सनल लाईफ आहे, च्याईला आपल्याला काय करायचेय, त्याचे तो ठरवेल ....
अश्या आशयाचे सकारात्मक वा तटस्थ प्रतिसाद देखील आले.

आणि ते तुलनेत जास्त आले Happy

अश्या एखाद्या विषयावरच्या चर्चेत एखाद्या मायबोलीसारख्या संकेतस्थळापेक्षा मला माझ्या व्हॉटसपग्रूपवरचा प्रतिसादात समाजाचे प्रतिबिंब जास्त अचूक वाटते . कारण तिथे कोणी इमेज जपायला आदर्शवादी विचार मांडायचा अट्टाहास करत नाही. साला जे मनात आहे, जे विचार डोक्यात येतात, तेच स्ट्रेट फॉर्वर्ड.. . त्यामुळे आनंदच झाला.

एकूणात आपल्या आसपासचा समाज उदासीन नाहीये या बाबतीत. त्यांना पालकत्व रजा हवीच आहे. या प्रसंगी बरेच जणांसाठी फॅमिलीच प्रायोरीटी असते. पण तरीही ती सिस्टीममध्ये नाहीये. ती हवीच याचा कोणी आग्रह धरत नाहीये. कोणी धरलाच आग्रह तर त्यालाच एकट्याला काय गरज आहे असे सुनावले जातेय, त्याला ईतरांचे उदाहरण दिले जातेय, दोन दिवसांच्या रजेनंतर पुन्हा आपले कामच कसे प्रायोरीटी आहे हे समजावले जातेय. वर आता तर डबल काम करावे लागणार , जबाबदारी वाढली ना असे टोचन दिले जाताहेत....

पण अश्यांना आता उलट सुनवायला एक उत्तर मिळाले आहे.
अरे तो विराट कोहली राष्ट्रीय संघाचे नेतृत्व सोडून जर ब्रेक घेऊ शकतो तर आपण कुठले मोठे रॉकेट सायंटीस्ट आहोत ...
बस्स याचसाठी विराट कोहलीचे कौतुक, अभिनंदन आणि आभार Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्हा "कर" आडनाव असलेल्या कोकणी लोकांचेही बदनामी होते Sad

'म्हणजे आडनावात कर नसलेल्या कोकण्याला डर नाही' असं का? Wink

तुम्हा लोकांचं बरं आहे, कर आडनाव असेल तर तुमच्या कोकणी करांची बदनामी, तुमच्या शहरातील कोणी बरळलं तरच तुमच्या शहराची बदनामी.

पृथ्वीवरील कुणीही काहीही बरळलं तर मला किती बदनामी सहन करावी लागते याचा विचार तरी केलाय का कधी? Sad

गावसकर काहीही बरळला की मुंबईची बदनामी कशी बरं होते?
>>>>>>

मग काय दुबईची होणार?
गावस्कर मुंबईकरच आहे ना??

@ हर्पेन, त्यांनाही डर आहेच, पण तुलनेत कमी. गावस्कर आधी आमचा आहे, मग मुंबईचा, मग महाराष्ट्राचा, मग देशाचा आशियाचा वसुंधरेचा... वगैरे वगैरे..

पृथ्वीवरील कुणीही काहीही बरळलं तर मला किती बदनामी सहन करावी लागते याचा विचार तरी केलाय का कधी? Sad
>>>>>>

उलट तुमच्या वाट्याला बदनामी सौम्य प्रमाणात येते, करोडो पृथ्वीकरांमध्ये शेअर होते. किंबहुना पृथ्वीच्या बाहेरचे कोणी अजून आपल्याला भेटले नसल्याने कोणासमोर शरमेने मान खाली घालावीच लागत नाही. पण आम्हा कर आडनाव असलेल्या मुंबईकरांची मान मात्र उर्वरीत पृथ्वीकरांसमोर झुकली Sad

अरे! कुणीही काहीही बरळला तर आम्च्या मुंबईची बदमानी नाही होत. मुंबईबद्दल काही बोलत असेल तर वेगळी गोष्ट.
तुम क्या जानो नवी मुंबईकर Lol

ओ सस्मित घरं विकली नाहीयेत मुंबईतली. म्हणजे एक विकले बाकीची दोन आहेत. गावस्कर, तेंडुलकर, वेंगसरकर, मांजरेकर आणि आम्ही साळसकरांची पोरे शिवाजी पार्कात आणि आझाद मैदानावर एकत्र क्रिकेट खेळत लहानाचे मोठे झालो आहोत. आजच्या पिढीला सनी बोलले की सनी लिओन आठवते, पण आम्हाला आजही सनी गावस्करकच आठवतो. आम्ही हक्काने बोलू शकतो आमच्या गावस्करांबद्दल.

सनी बोलले की सनी लिओन आठवते, पण आम्हाला आजही सनी गावस्करकच आठवतो. >>> एवढा जुना आहेस तु?
मला सनी म्हणजे सनी देओल आठवेल. लिओन नाही. गावसकर पण नाही.

@ सस्मित, मला राम म्हटले की मै हू ना मधील शाहरूख खान आठवतो, कोणाला रामायणातील राम आठवेल. मग आता ज्याला रामायणातील राम आठवतो तो जुना झाला का?

मला सनी म्हटलं की बोनी एम आठवतो.
>>>
लिंक वगैरे द्यावी लागते म्हणजे प्रसिद्ध व्यक्तीमत्व दिसत नाही.
छान, आवड हटके आहे आपली Happy

अवांतर - नवीन धाग्याला छान विषय आहे हा Happy

Work from home म्हणजेच घरूनच ना? >> हो. पण तेच देवनागरीत लिहिलं तर होम हे होम हवन मधले होम वाटुन ते करायला घेतल्यास निघणारी कामे असे कुणाला वाटु नये म्हणुन त्याने आधीच खुलासा केला असेल.

वर्क फ्रॉम होम अशी टर्म वापरली जाते ती ढोबळमानाने हे दर्शवायला की ऑफिसला न जाता लॅपटॉप घेऊन घरी आलोय. पण ते काम घरूनच करतोय असे जरूरी नाही. मी बरेचदा वर्क फ्रॉम सासुरवाडीही करतो. मुलांना संध्याकाळी तिथे खेळायला घेऊन जायचे असल्यास आणि माझे कामही असल्यास सोबत लॅपटॉपही नेतो.

हर्पेन Lol
तुम्ही पण घरुन वर्क फ्रॉम होम का?

कोहली गावस्कर वादात नवीन गोष्ट मला समजली.

कोहलीने एका विजयानंतर दादाचे कौतुक करताना म्हटलेले की दादाने परदेशात जिंकायला शिकवले आणि आम्ही त्याचा वारसा चालवतोय. जे गावस्करला रुचले नव्हते.
त्याआधीही आम्ही जिंकलेलो पण कोहलीचा जन्म झालेला नसत्याने त्याला माहीत नसेल. दादा बीसीसीआय अध्यक्ष आहे म्हणून कोहली कौतुक करतोय असे गावस्कर म्हणालेला. अर्थात यात तथ्यही आहे. पण एकंदरीत गावस्कर कोहली वाद आता जरा जास्त वैयक्तिक होतोय असे वाटतेयम्

https://www.timesnownews.com/sports/cricket/article/you-have-to-say-good...

>>पण एकंदरीत गावस्कर कोहली वाद आता जरा जास्त वैयक्तिक होतोय असे वाटतेयम्<<
अरे पण त्या नटराजनला सुट्टी मागुन पण मिळाली नाहि, असं तर नाहि ना, ते आधी शोध आणि इथे येउन सांग. मला कुठे असं सापडलं नाहि कि बाबा नटराजन म्हणतोय - नाहि आधी लगीन आय्पीएल्/आस्ट्रेलिया टुरचं; मगंच मुलीचं बारसं. तेंव्हा या परिस्थितीत मी गावस्करला बेनिफिट ऑफ डाउट देइन. गावस्करने संघातल्या दोन खेळाडुंच्या बाबतीतला सापत्नभाव दाखवुन दिलेला आहे. उद्या तुला एखाद्या नविन कंपनीत जॉइन झाल्यावर सगळ्या एंप्लॉइजना हक्काने मिळणारी रजा नाकारली तर तु अजुन २० तास जास्त काम करुन "एंप्लॉइ ऑफ द इयर" करता झटत रहाणार का... Wink

मला कुठे असं सापडलं नाहि कि बाबा नटराजन म्हणतोय - नाहि आधी लगीन आय्पीएल्/आस्ट्रेलिया टुरचं; मगंच मुलीचं बारसं.
>>>
असे मुद्दाम का म्हणायला हवे त्याने? ते सुद्धा भारतीय संघात पदार्पण करायच्या आधीच असे बोलणार तरी कुठल्या तोंडाने?

तसेही तो बाबा झाला तेव्हा आयपीएल खेळत होता, ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर नव्हता. त्यामुळे तिथे सुट्टी द्यायची की नाही हे त्याच्या आयपीएल संघाचा मालक बघेन.

आणि बाबा झाल्यावर आधी आयपीएल खेळून मग भारतासाठी खेळताना सुट्टी कुठल्या तोंडाने मागणार होता.

आणि ऑस्ट्रेलिया दौर्‍यात असतानाही त्याने मागितली असती तर सुट्टी दिली असती त्याला. तसेही त्याचा समावेश थेट अकरात नव्हता. पण त्यालाच कारकिर्द धोक्यात टाकायची नसेल. भारतासाठी खेळायची संधी एकदा गमावली तर पुन्हा कधी मिळेल या स्पर्धेत अशी भिती वाटली असेल.

जर नटराजन काही आपल्यावर अन्याय झाला असे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष बोलला नसताना असे संशयाचे धुके निर्माण करणे हि गावस्करची चूकच आहे.

>>जर नटराजन काही आपल्यावर अन्याय झाला असे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष बोलला नसताना असे संशयाचे धुके निर्माण करणे हि गावस्करची चूकच आहे.<<
अरे भल्या माणसा, नटराजन अन्याय झाला असं प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष बोलला नाहि, याचाच संदर्भ मागतोय मी. एकिकडे तो द्यायचा नाहि, वर पुढे गावस्करला चूकिचं ठरवण्यात हल्ली चढाओढंच लागलेली असते. घ्या आपापले हात धुऊन... Wink

>>>
तसेच एका चाहत्याने म्हटले की, “तुम्ही असे कसे बोलू शकता. रोहित त्याच्या मुलाच्या जन्मावेळी घरी परत आला होता. याची त्यांना जाणीव झाली नाही का. तुम्हाला सतत विराटला निशाण्यावर धरण्याची सवय लागली आहे.”
>>>

टिका करतानाही गावस्कर यांचे निकष वेगवेगळे आहेत का Happy

>>नटराजन ला मुळात लिव्ह नामंजूर का होईल?<<
त्याला नेट बोलर म्हणुन थांबवुन ठेवलाय अशी बातमी आहे. हल्ली नेट बोलर होतो असं रेझुमे वर लिहु शकतो का याची क्ल्पना नाहि. असो...

आणि हा दुसरा वाद. बेदिने डिडिसिए विरुद्ध रणशिंग फुंकलं आहे. फिरोझशहा कोटला स्टेडियममधे अरुण जेटली यांचा पुर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. काँग्रेस सरकार, नेहरु-गांधींचं नांव खिरापती सारखे सगळीकडे देत सुटले होते, अशी बोंब ठोकणारे आता तोच कित्ता गिरवत आहेत. थोडक्यात पुतळा संस्कृतीतुन राजकारणी बाहेर पडणार नाहित, हे त्रिकालाबाधीत सत्य आहे. बेदिने त्याचं नांव, जे स्टेडियमच्या एका स्टँडला फार पुर्वि दिलं गेलेलं आहे, ते काढुन टाकण्याची विनंतीवजा मागणी केलेली आहे. माझ्या मते, सरदारजी इज राइट! त्याने डीडिसिएला पाठवलेलं हे पत्रंच खूप बोलकं आहे...

बघुया आता काय होतं पुढे...

Pages