कतार मधील कुणी मायबोलीकर आहेत का?

Submitted by यक्ष on 30 November, 2020 - 05:44

कतार मध्ये वास्तव्याविषयी काही प्रश्न विचरायचे आहेत. कतार मधील कुणी मायबोलीकर असल्यास कृपया कळवणे!

धन्यवाद.

Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद BLACKCAT, रुपक , मामी, अतरंगी !
रुपक / अतरंगी विपु पाठवतोय.
मामीजी....आपकी 'गुहार' दुरुस्त ही लग रही है! ' दोहा' का ही जिक्र है.....देखें ....शायद अगला ' निवाला' कही 'दोहा' मे हो!

धन्यवाद निरु! अत्यंत उपयुक्त महिती!
पॅन्डेमिक नंतर सध्या कतारमधील job परिस्थिती कशी आहे? पे कट, इतर कट्स वगैरे प्रकार आहेत का?
कतार अजूनही २०२२ वर्ल्ड कप च्या तयारीत जोमाने असल्याचे कळतेय...!

पॅन्डेमिक नंतर सध्या कतारमधील

पॅन्डेमिक नंतर सध्या कतारमधील job परिस्थिती कशी आहे? पे कट, इतर कट्स वगैरे प्रकार आहेत का?
कतार अजूनही २०२२ वर्ल्ड कप च्या तयारीत जोमाने असल्याचे कळतेय...!<<<<<<<

मे-जून मधे पॅन्डेमिकचा खरा फटका बसला. कतार पेट्रोलियम आणि ईतर क्यु वर्गिय कंपन्यांनी साधारण ३०% डाऊनसाईझ केले. पे कट असा नाही. पण पुढच्या वर्षी बोनस इल्ले आणि इन्क्रिमेंटही इल्ले !!
२०२२ वर्ल्ड कपच्या काऊंटडाऊन ला सुरुवात झालीय. आख्ख्या कतारमधे बांध्कामाना बहर आलाय. अर्थात भारतातले बांधकामांचे प्रकल्प डोळ्यांसमोर आणून हादरु वगैरे नका.व्व्यवस्थित पर्यायी मार्ग आखूनच रस्त्यांची कामे चालतात. मेट्रोचे प्रमुख मार्ग सुरु झालेत आणि बाकीचे सुरु होतायेत लवकरच.

काही कंपन्यांनी 30% जॉब कपात केली आहे. काही कंपन्यांनी 30% पगार कपात केली आहे. पण हे सर्व कोरोना पीक टाइममध्ये पूर्ण झाले. केवळ एव्हिएशन उद्योग अजूनही अत्यल्प प्रवासी असल्याने नोकरी कपात करीत आहे.

धन्यवाद!
स्वप्नांची राणी विपु पाठवली आहे.
रुपक तुम्हाला विपु वर प्रतिसाद पाठवत आहे..

स्वप्नांची राणी

आपला अजून सल्ला हवा आहे. आपणांस विपु मधून संपर्क केला आहे.

धन्यवाद!

Black cat gulf मध्ये डॉ लोकांना खूप संधी आहेत. खरोखर यायचे असेल तर माहिती देतो.

दोहा येथे येऊन सहा महिने झालेत..
मायबोलिकरांच्या बहुमोल सल्ल्यांची खूप मदत झाली. विशेषतः स्वप्नांची राणी ह्यांची.
सगळ्यांन्ना मनःपूर्वक धन्यावाद!
येथिल महाराष्ट्र मंडळ सक्रिय आहे ही एक अभिमानास्पद बाब! फक्त मराठी ट्क्का वाढावा ही मनोमन इच्छा.
फिफा वर्ल्ड कप साठी कतारभर कामे सुरु आहेत. सार्वजनिक वाहतूक , सुरक्षा उत्तम.