ए ऍसिडिटी,तुमने भी बहोत कुछ सिखाया - भाग ४

Submitted by me_rucha on 30 November, 2020 - 04:35

खरंतर असं एखादा आजार किंवा एखादं संकट पुढे आलं की आपला शारीरिक, मानसिक, भावनिक प्रत्येक पातळीवर एक संघर्ष सुरु असतो. ह्या सगळ्या घडणाऱ्या घटनांमुळे मी सगळ्या पातळीवर पुरती खचले होते. हे सगळं माझ्यासोबतच का?
हा प्रश्न मला सतत सतवायचं. हे सगळं कधी संपणार? असं एक ना अनेक कितीतरी प्रश्न माझ्या मनात यायचे आणि मन फार फार दुःखी व्हायचं.
ह्या सगळ्यात माझा ड्रायविंग फोर्स जर कोणी असेल तर तो माझा मुलगा होता.
त्याच्याकडे पाहून मी माझ्या मनाला उभारी द्यायचा, समजावण्याचा प्रयत्न करायचे. त्याच्याकडे पाहून मी माझे सगळे दुःख, चिंता विसरण्याचा प्रयत्न करायचे. अर्थात माझे आई वडील, नवरा, बहीण ह्या सगळ्यांनीही फार मोलाची साथ दिली.
खाण्यावरचे निर्बंध, होणारा त्रास ह्या सगळ्यांनी मी पुरती त्रस्त झाले होते. कित्येक जणांनी कित्येक उपाय सांगितले कुणी सांगितलं सकाळी आलं खा, आवळा खा. काही जण म्हणायला लागले तुळजापूर च्या देवीला जाऊन या. (ते आमचं कुलदैवत आहे म्हणून )असे एक ना दोन कित्येक सल्ले मिळाले.आ ईनी तर मंगळावरही सुरु केले होते. मला बर वाटावं म्हणून. त्यातले मनाला पटतील, तब्येतीला झेपतील तेवढे सगळे उपाय करून झाले. कश्यानेही शष्प फरक पडला नाही. उलट पक्षी काहीं उपायांनी तर त्रासात भर पडली.!
अँटीडिप्रेसंट्स टॅबलेट चे वजनवाढ आणि सतत झोप येणं ह्या शिवाय अजूनही काही साईड इफेक्ट दिसून यायला लागले ते म्हणजे माझे पीरिअड्स येणं बंद. मी गायनॅक कडे गेले आणि परत टेस्ट सुरु झाल्या. सगळ्या टेस्ट्स अंती त्यांनी मला सांगितलं ते फार धक्कादायक होतं. त्या म्हणाल्या तुला premature menopause आला आहे. ते ऐकून हादरलेच. नव्हे माझ्या पायाखालची जमीन सरकली.
मग विचार केला नाही झालं तेवढं पुष्कळ झालं आता ऍलोपॅथीची एकही गोळी घेणार नाही. माझं काहीही झालं तरी चालेल. पण हा त्रास थांबलाच पाहिजे असंही होतं. मग कुणीतरी सांगितलं homeopathy ट्राय करा. आला तर येईल गुण.
माझ्या मनाने तर धसकाच घेतलं होता काही नवीन ट्राय करण्याचं. तरीही मी मनाचा निर्धार करून गेले एका होमीओपॅथ कडे.त्यांनी गोळया दिल्या आणि मला ते घेऊन चक्क बर वाटतं होतं. माझा ऍसिडिटीचा त्रास कमी झाला आणि कसे माहिती नाही my natural monthly cycle also started.
पण तरीही खाणं पिणं सांभाळूनच कराव लागे.
बरेच जण होमिओपॅथी ला नावे ठेवतात. तो प्लासिबो इफेक्ट असतो वगैरे. पण मला तसं काही अनुभव आला नाही. हे सगळं होईपर्यंत 2018 साल उजाडलं होतं!. नवराही यू के हून परतला होता.एकंदरीत बरं सुरु झालं. असं म्हणता येईल.
क्रमश :

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

तुमचे अर्धे लेख वाचून मला पित्ताचा त्रास सुरु होईल असे वाटते.सस्पेन्ससाठी जास्त ताणत आहात लेख मालिका.शेवटचा भाग पोस्ट झाल्यावरच येईन .

हम्. तुमचा त्रास थांबला, छान झाले, अभिनंदन.

मलातरी दीड वर्षेपर्यंत होमिओपॅथी घेऊन फरक पडला नाही.

आणि कसे माहिती नाही my natural monthly cycle also started. >>> काही अँटीडिप्रेसंट औषधांंनी (अशा ऍसिडिटीच्या कारणा साठी levosulpride सारखी औषधे देतात) प्रोलॅक्टिन वाढतं, पाळी बंद होते. ही औषधं बंद केली की हळूहळू प्रोलॅक्टिन नॉर्मल होतं आणि पाळी सुरू होते. औषध दीर्घ काळ घेतलं असेल तरीही.

होमिओपॅथीने त्रास थांबला हे खुप छान झाले... कोणतं औषध घेतलं त्याचं नाव कळेल का...? +११ १
आणि डॉक्टरचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मिळतील का प्लीज?

क्रमशः आहे ना ? वाचतेय. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत. बरे होत आहात वाचून बरे वाटले.

आधी क्रमशः पाहून लोक म्हणायचे अरे काय हे क्रमशः कशाला लौकर संपवा.

आता क्रमशः नाही तर लोक म्हणताहेत क्रमशः आहे ना अजून पुढे लिहा! Lol

2018 पर्यंत आलंय आत्ताशी. होमिओपॅथी चा गुण आलाय. खडखडीत बऱ्या झाल्या आणि पथ्याचा चिट डे यायला लागला की सुफळ सम्पूर्ण समाप्त Happy
हलके घ्या हो धागाकर्त्या Happy

तुमचा त्रास थांबला, छान झाले, अभिनंदन.>>+१
आता क्रमशः नाही तर लोक म्हणताहेत क्रमशः आहे ना अजून पुढे लिहा>> Lol
पहिल्या लेखापासून साक्षात्कारी रोग (म्हणजे काय साक्षात्कार झाला ती उत्सुकता आलीच) पासून ते ४ थव्यात लेखापर्यंत बहूत कुछ सिखाया म्हणत फक्त किती सहन केले तेव्हढे लिहिले आहे(त्या बद्दल वाईट वाटलेच) आणि लेखाच्या शेवटी ‘मग कुणीतरी सांगितलं homeopathy ट्राय करा. आला तर येईल गुण.’ आणि गुण आला म्हणत फाईल बंद! वाचकांना जे हवे ते मिळाले नाही आहे. किती आशाने वाचत होते!

आहारात व जीवनशैलीत काय बदल केले , होमिओपॅथिक औषधांनी किती काळात गुण आला ... आणि होमिओपॅथिकने त्रास पूर्ण बंद झाला का ( उपचार पूर्ण झाल्यावर) व परत तसा त्रास नाही झाला ... यावरही जमल्यास लिहा.
तुम्हाला बरे वाटले हे वाचून चांगले वाटले.

बापरे, काहीच्या काही त्रास काढावा लागला तुम्हांला.

आधीच्या एका भागात सायोने तिला झालेल्या अॅसिडिटीच्या त्रासाबद्दल लिहीलं. तिला त्रास सुरू झाल्यावर साधारण महिन्याभराने अगदी तसाच त्रास मलाही व्हायला लागला. काहीही खाल्लं की पोटाच्या वरच्या भागात दुखायला सुरूवात व्हायची. इतकं दुखायचं की खाण्याची पण भिती वाटायची. सोनोग्राफी, गॅस्ट्रोनॉमी सगळं करून झालं. काही प्रॉब्लेम नाही. नंतर होमियोपथी औषधांनीच बरं वाटलं.

लेखाच्या शेवटी क्रमश : टाकले आहे.
आणि ह्या सगळ्यातून मला असा काय साक्षात्कार झाला तेही लिहिणारे.
मानवजी तुम्ही लिहिलेत ते बरोबर आहे अँटिडिप्रेसंट्स आणि अँटासिडस थांबवल्यानी आपोआपच एस्ट्रोजेन प्रोजेस्टरोन हार्मोन्स पूर्ववत झाले आणि सगळं आधीसारखं झालं.
खरंतर हे सगळं लिहिताना त्या नको असलेल्या आठवणी कुठेतरी काढल्या जातात आणि मलाही त्याचा त्रास होतो.

पुढचा आणि अंतिम भाग लवकरच टाकतीय.

बरेच जण होमिओपॅथी ला नावे ठेवतात. तो प्लासिबो इफेक्ट असतो वगैरे.
>>>

बिलकुल नाही.
माझ्या तोंडावर दाढीच्या जागी येणारया चामखीळ पुळ्या वर्षभर नाना उपचार, त्यातून होणारा कमालीचा त्रास आणि हजारो रुपये खर्च केल्यावर होमिओपथीच्या गोळ्यांनी वीस पंचवीस दिवसात आणि फक्त चाळीस रुपयात गेल्या Proud

चला आता आपला शेवटचा भागही वाचतो...