काय फायदा? (गजल)

Submitted by मिल्या on 17 December, 2007 - 00:04

आज पौर्णिमा नभात काय फायदा?
चांदणे नसे मनात काय फायदा?

वेचला मरंद तू जरी फुलांतुनी
वाटलास ना कुणात! काय फायदा?

पोटचे विकूनही न पोटभर मिळे
जन्म देउनी जगात काय फायदा?

चंद्र, चांदण्या खुडून आणशीलही
भाकरी न जर पुढयात काय फायदा?

दात आपलेच आणि ओठ आपले
गप्प बैस! बोलण्यात काय फायदा?

धावशील शर्यतीत जिंकण्यास तू
अडथळा ठरेल जात! काय फायदा?

शोधलेस नीट तर तुला मिळेलही
नजर ती न जर तुझ्यात काय फायदा?

ज्यात त्यात पाहतात फायदा सदा
राहुनी अश्या जनात काय फायदा?

तळटीप : वैभव च्या सुचनेनुसार काही बदल केलेले आहेत... वैभवा खूप धन्यवाद

गुलमोहर: 

आज पौर्णिमा नभात, उजेड जगात
अंधार मनी रात्र जागून काय फायदा?

वाटे छान, मस्त, वाहवा, द्यावा प्रतिसाद
उमज नसे गझल वाचून काय फायदा?

पोटचे विकूनही न पोटभर मिळे
जन्म देउनी जगात काय फायदा? - उत्तम

धावशील शर्यतीत जिंकण्यास तू
अडथळा ठरेल जात! काय फायदा? - उत्तम

ज्यात त्यात पाहतात फायदा सदा
राहुनी अश्या जनात काय फायदा? - छान

सगळेच शेर चांगले मिलिंद! रदीफ सुरेख! अभिनंदन!

मिलींद :
मस्त जमलीय... सगळेच शेर आवड्ले पण हे दोन अगदी थेट...
चंद्र, चांदण्या खुडून आणशीलही
भाकरी न जर पुढयात काय फायदा? ----

दात आपलेच आणि ओठ आपले
गप्प बैस! बोलण्यात काय फायदा?---- किती सहज ... व्वा !

ज्यात त्यात पाहतात फायदा सदा
राहुनी अश्या जनात काय फायदा?..........

मस्त गझल आहे........ खरंच सगळ्या गोष्टी फक्त फायद्यासाठी असतात? असं का? Sad

अहो आभार कसले... गुलमोहराची जुने पाने चाळत होते... ही गझल दिसली... आवडली.... प्रतिसाद दिला.... बस्स इतकच!

तरी अजुन बरीच पाने राहिली आहेत Happy

Pages