प्रीतम शाह यांना न्याय मिळेल का?

Submitted by बिपीन चन्द्र हर... on 21 November, 2020 - 04:40

अजित पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानच्या शेजारी राहणाऱ्या प्रीतम शाह यांनी आत्महत्या केली असून त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठीही पोलिसांना सापडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या या चिठ्ठीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची नावं आहे.

बारामतीचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये काही सावकार आपल्याला त्रास देत असल्याचे शाह यांनी म्हटलं आहे. याच लोकांच्या जाचाला आपण कंटाळलो असून निराशेमुळे आपण आत्महत्या करत आहोत, असंही या चिठ्ठीमध्ये म्हटलं आहे. शाह यांच्या मुलाने या प्रकरणात तक्रार दाखल केली आहे.

शाह यांच्या मुलाने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये नगरसेवक जयसिंह देखमुख, कुणाल काळे, संजय काटे, विकास धनके, प्रवणी गालिंदे, हनुमंत गवळी, सुनील अवाळे, संघर्ष गव्हाळे, मंगेश आमासे यांच्या नावांचा उल्लेख आहे. यापैकी एकजण बारामती बाजार समितीचे माजी अध्यक्ष आहे. प्रीतम यांनी दाखल केलेल्या तक्रारीमधील जवळवजवळ सर्वजण राजकारणाशी संबंधित आहेत. आरोपींपैकी काहीजण नगरसेवक असून बारामती सहकारी बँकेच्या संचालकपदी असणाऱ्या व्यक्तीचाही आरोपींच्या यादीत समावेश असल्याचे वृत्त आहे. सावकारी प्रकरणामधून व्यापाऱ्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली बारामती पोलिसांनी शहरातील राष्ट्रवादीचे काही नगरसेवक आणि शाह यांच्या मुलाने नावं घेतलेल्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

“मुख्यमंत्री महोदय जो निकष लावून अर्णब गोस्वामी यांना अटक केली, तोच निकष लावून आता या राष्ट्रवादी काँग्रेसच्या धेंडांवर कारवाई करा…झेपेल काय?,” असं म्हणत भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंच्या अकाऊंटला टॅग केलं आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपींनी प्रतीम शाह यांना ३० टक्के व्याजाने पैसे दिले होते. प्रीतम यांनी हे सर्व पैसे परत केल्यानंतरही आरोपी त्यांच्याकडून अधिक पैशांची मागणी करत होते असा आरोप केला जात आहे. पोलीस या प्रकरणामध्ये तपास करत आहेत.

https://www.loksatta.com/maharashtra-news/hope-thackeray-government-will...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रीतम शाह यांच्या आत्महत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची नावं असल्याने काहीही होणार नाही कारण त्यांच्या बाजूने काका उभे राहतील असा माझा तर्क आहे. येथे काही लोक शहाविषयी बोलणारच नाहीत.

बेकायदेशीर कर्ज घ्यायचे कशाला >>>>>

१०० कोटींची संपत्ती असलेला नाईक
८५ लाखा साठी अर्णव चे नाव लिहून सुसाई ड करतो त्या वेळी असेल बिनडोक प्रश्न सुचत नाहीत का ?

पुन्हा पुन्हा तेच

प्रॉपर्टी असणे वेगळे व लिक्विड भांडवल वेगळे

100 कोटीचे घर आहे असे म्हणून 1 कोटीचे येणे बुडाले तर चालत नाही

प्रीतम शहाना न्याय मिळावा व गुन्हेगारांना शासन व्हावे

काही मायनस पॉइंट असतील अर्णव मध्ये !
पण .......
समझोता एक्स्प्रेस बॉम्बस्फोट ला काँग्रेस ने हिंदू दहशतवाद चा रंग दिलेला असताना , त्या बॉम्बस्फोट च्या तिसऱ्याच दिवशी पाकिस्तानी मंत्री कसुरी भारतात आला होता .
रवीश , बरखा ,राजदीप , प्रणव हे काँग्रेस चे पाय पत्रकार कसुरी ला खुश ठेवण्यासाठी गोड गोड प्रश्न विचारायचे .
पण त्या कसुरी ला समझोता एक्स्प्रेस संदर्भात अडचणीचे प्रश्न विचारून उलटे टांगण्याचे काम फक्त अर्णव ने केले होते .
ते पण २००७ ला भाजप आणि मोदी ची दिल्ली मध्ये प्रभाव नसताना !

घ्या !
काँग्रेस सत्तेत असताना दहा वर्ष तपास करून पुन्हा काँग्रेस वालेच विचारत आहेत .

बेकायदेशीर कर्ज घ्यायचे कशाला ? ज्यांचे आय टी रिटर्न व्यवस्थित असतात त्यांना कायदेशीर कर्ज मिळते

Submitted by BLACKCAT on 22 November, 2020 - 08:32

सावकारी कर्जाच्या पाशात अडकून आत्महत्त्या करणार्‍या शेतकर्‍यांना सांगा आय्टी रिटर्न भरुन कायदेशीर कर्ज घ्यायला. तसेही बातमी नीट वाचली तर दिसेल की आत्महत्या करणार्‍याचा कर्ज काय्देशीर किंवा बेकायदेशीर असा आरोप नसून कर्जाची परतफेड केल्यावर देखील वसूलीचा तगादा लावल्याच्या जाचाला कंटाळून केलेली आत्महत्त्या आहे.

सावकारी कर्जाच्या पाशात अडकून आत्महत्त्या करणार्‍या शेतकर्‍यांना सांगा आय्टी रिटर्न भरुन कायदेशीर कर्ज घ्यायला. >>>>>>

शिवरायांचा महाराष्ट्र आहे हा !
शेतकऱ्यांचे कर्ज आम्ही फेडणारच !
का नाही फेडणार ?
नाईकांचे कर्ज फेडायला मी नाही का मदत केली ?
तशी मदत माझे मावळे आणि इतर जण महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना करतील !
हा आता त्याला ते विरोधक बोबडे सोमय्या जमीन व्यवहार चे नाव जोडतात .
अशा विरोधकांना साडी नेसविण्याचे कार्य करण्यास आमच्या पेडणेकर भक्कम आहेच
फक्त थोडंसं ते करोना जाऊ द्या !

ते अजित पवारांचे शेजारी होते म्हणे.

अन्वय नाईक पण टॉप सेना आणि एनसिपी लीडर्सशी कनेक्ट होते. हे प्रीतम शाह तर उपमुख्यमंत्री यांचे शेजारी. तरी दोघांनाही नेत्यांना मदतीसाठी, सपोर्टसाठी संपर्क करावासा वाटला नाही. Weird.