विरळ केस असलेल्या मुलांचे टक्कल केल्यावर दाट केस येतात का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 19:08

देवाच्या कृपेने मला घनदाट केस आहेत. वडिलांकडून ते आले आहेत. पण माझ्या मुलीचे केस मात्र विरळ आहेत. लहान होती तेव्हा केसांना सोनेरी छटा असल्याने डॉलसारखी दिसायची. त्यामुळे केसांना कात्री लावावीशी वाटत नव्हती. पण विरळ केस आहेत हे लक्षात घेऊन साधारण दिडेक वर्षांची असताना टक्कल केले. त्यानंतर सलग दोन तीन वेळा टक्कल करायचा विचार होता पण मग कधी गणपती तर कधी दिवाळी तर कधी याचा बड्डे कधी त्याचा बड्डे या नादात राहून गेले.

आता सहा-साडेसहा वर्षांची झाली आहे तसे पुन्हा त्या विरळ केसांची चिंता भेडसावू लागली आहे. पुन्हा टक्कल करायचा विचार चालू आहे. पण मूल मोठे होते तसे हा निर्णय आणखी अवघड होतो. म्हणून त्याआधी लोकांच्या अनुभवावरून जाणून घ्यायचे होते की दाट केस येण्यास हे टक्कल करणे फायदेशीर ठरते का?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घरात सर्वांचे केस दाट पण नवर्‍ञाकडून कडून पातळ केस असल्याने, माझ्या मुलीचे विरळ केस होते. मी तिचे केस , जवळपास ती १.५ ते १० वर्षाची होइपर्यंत ट्क्काल करायची. तिलाही ते बरे वाटायचे कारण , ती स्पोर्ट्स मध्ये ( फूटबॉल) होती व तिला सजायची-नटायची हौस न्हवती जी बर्‍याच मुलीला असते. ती तशीही टॉमबॉय टाईप असायची. बरीच मुलं-मुली चिडवत पण तिला काही वाटायचे नाही. तेव्हा मुलीला विचारून करा.. मी नाही विचाराले माझ्या मुलीला कारण , तिलाच केस नकोसे असायचे खेळताना.
जाड वगैरे नाही होत केस कापल्याने पण चिपके नाही वाटत कारण टक्कल करून, एकेक केस रुक्ष होतो असे मला वाटते.
पण, विज्ञानानुसार, जाड वगैरे बिलकुलच होत नाही..

>>>विज्ञानानुसार, जाड वगैरे बिलकुलच होत नाही..>>>> करेक्ट मीही तेच ऐकले आहे. शिवाय दाट केस वगैरे कन्व्हेन्शनल सौंदर्य नसलेल्या अतिशय हुषार स्त्रिया पाहण्यात आहेत. आपोआप त्या अतिशय सुंदर भासू लागतात - आत्मविश्वास, निग्रह, तेज, वाक्पटुत्व .... अनेक गुण असलेले लोक आपोआप अतिशय देखणे वाटतात ब्वॉ.
अर्थात याचा अर्थ केस विरळच असावेत असा नाही. पण त्याने काही अडत नाही इतकेच.

छान केस आहेत.आता या वयात टक्कल केल्यास अपमान वाटेल.आणि टक्कल केल्याने केस दाट होतातच असा शास्त्रीय आधार नाही.त्यापेक्षा आहार नीट ठेवून, रोज भिजवलेले बदाम,चांगले ताक(थंडी गेल्यावर), छोले, झुकीनी, मेथ्या थोडक्यात सर्व प्रोटीन व्हिटामिन वाला चौरस आहार आणि व्हर्जिन कोकोनट ऑईल किंवा 2 आठवड्यात एकदा एरंडेल तेलाने मसाज वगैरे आपले जुने उपाय करत राहा.

विरळ केस आहेत म्हणून टक्कल करू नका . माझ्या बहिणीचे पण विरळ केस होते लहानपणी तिचे पण टक्कल केले होते 1-2 वेळा पण केस दाट होत नाहीत. शेवटी आहारामध्ये बदल केल्यामुळे फरक पडला. आता तिचे केस विरळ नाहीत आणि दाट पण नाहीत.

गव्हाचे दळण(5kg) गिरणीत नेताना त्यात एक वाटी सोयाबीन आणि 2 चमचे मेथी दाणे मिसळा. पालकाची भाजी खात नसेल तर पालकाचे पराठे दह्याबरोबर देऊन पहा , अक्रोड , बदाम आणि खडीसाखर याची पूड बनवून रोज एक चमचा द्या. रोज एकतरी अंडे खाणे मग ते उकडलेले किंवा कमी तेलातील ऑम्लेट सुद्धा चालेल.

रोज तिला व्यायाम करू द्या. तिला सायकल खेळायला आवडत असेल तर 1 तास भर तरी खेळू द्या. सकाळी अर्धा तास आणि संध्याकाळी अर्धा तास असेही चालेल. कुठलाही मैदानी खेळ ज्यात पळावे लागेल, घाम येईल असा रोज व्यायाम केला की मुलांना भूक लागते आणि नीट जेवण करतात.

आपल्या प्रोजिनी मध्ये कुठले जीन्स सप्रेस राहतील ते काही आपल्या हातात नसते त्यामुळे सर्व उपचार आणि आहार व्यायाम करूनसुद्धा निव्वळ फिनोटिपिक एक्सप्रेशन्स दिसले नाहीत म्हणून नाराज न होता इतर अंगभुत कलागुणांना अधिक पॉलिश करून आकर्षक व्यक्तिमत्व कसे घडवता येईल हे पहा. जगी सर्वसुखी कोणी नाही तसे सर्वगुणसंपन्न सुद्धा कोणी नाही. त्यामुळे एखादी गोष्ट सहज आणि नैसर्गिकपणे जर नसेल आपल्याजवळ तर आजच्या आधुनिक सायन्सने त्यावर अनेक उपाय नक्कीच अवलंबता येतील पण एकीकडे भर घालता दुसरीकड़े काही कमी करवुन घेण्यापेक्षा जे आहे त्याचे ख़ास न्यून ही नाही आणि विशेष अभिमान ही नाही असा दृष्टिकोन पुढील आयुष्यात अधिक समर्थ बनवेल.

टक्कल करुन काही फायदा होत नाही.
माझ्या मुलीचे केसही बाळ असताना विरळ होते. दोन तीन वेळा टकलु केलं.
मुलाचंही तसंच. खरंतर दोन्ही मुलांना जन्मताच फार कमी केस होते. पण आता मुलीचे केस कमरेपर्ञमत ला.ब आणि जाड आहेत.
रोज अंड खाल्लं जातं. मुलाचेही थोडे पातळच आहे केस. पण होतील त्याचेही बरोबर असं वाटतंय.
योग्या आहार ठेवावा.

माझी मुलगी टकलू जन्माला आली व पुढची 2 वर्षे ती 70-80 टक्के टकलूच होती. नंतरही केस इतके विरळ होते की मला काळजी वाटायची जन्मभर असेच राहतील की काय म्हणून.

मी तिचे तीनदा टक्कल केले, माझ्या वडिलांनी माझा तिन्ही वेळा उद्धार केला Happy Happy पण परिस्थिती अजिबात सुधारली नाही. ती पाचवीला असताना तिला निवासी शाळेत दाखल केले, तिथे तिचे जेवणातले नखरे बंद झाले आणि सर्व प्रकारच्या पाले व फळभाज्या पोटात जाऊ लागल्या. आणि मग तिचे केस मस्त दाट झाले.

मोरल ऑफ द स्टोरी, मुलीच्या आहाराकडे लक्ष द्या, सगळेच सुधारेल. तुम्हाला हव्या त्या वेगाने सुधारणार नाही, हळूहळू सुधारेल, तोवर धीर ठेवा. टक्कल करून फारसा फरक पडत नाही.

विज्ञानानुसार, जाड वगैरे बिलकुलच होत नाही..>>>

केसांचा पोत जन्मायच्या आधीच गर्भाची जी काय वात कफ पित्त प्रकृती असते तसा ठरलेला असतो. तो आयुष्यभर तसाच राहतो. पोत म्हणजे एक सूटा केस किती जाड बारीक, रंग कुठला वगैरे. काळा रंग असेल तर केस सहसा जाड असतो, पिंगट असेल तर खूपच पातळ, जरा वारा आला तरी उडतील असे.

टकलू करून फायदा होतो का माहीत नाही उलट केस रखरखीत ,रुक्ष होतात. अनुभव आहे. मुलाचे केस भरपूर आणि दाट होते/ आहेत. ते भसाभसा वाढायचे आणि 15 दिवसात कटिंगला न्यायला लागायचं याला वैतागून त्याच टक्कल करायला सुरुवात केली. 8 वर्षापर्यंत असच अधूनमधून टक्कल करायचो. आता त्याच्या केसांचा भांग च पडत नाही. साळींदर/ सुरवंटा सारखे उभे असतात. वर्षोनुवर्षे कंगवा लागत नाही.

<<< काळा रंग असेल तर केस सहसा जाड असतो, पिंगट असेल तर खूपच पातळ, जरा वारा आला तरी उडतील असे. >>> + १११

माझे केस जन्मापासुन पातळ अन सोनेरी आहेत. माझ्या मम्मीचे केस काळे अन दाट तर पप्पांचे पिंगट अन पातळ त्यामुळे ती माझे केस दाट करायच्या भानगडीत पडली नाही पण काळ्या केसांच्या आवडीपायी मी आठवीत जाईपर्यंत दरवर्षी टक्कल करुन लिंबु अन काय काय पिळायची त्यावर. केस काळे तर झाले नाहीत पण जो गडद सोनेरी रंग होता तो जावुन हलका सोनेरी-तपकिरी असा रंग आला. केस मात्र पातळच राहीले अन त्यामुळे ते कधी कधी विरळ वाटतात.

पण यावर्षी लॉकडॉऊनमुळे घरीच असल्याने रोज तेल लाऊन बांधुन ठेवते केस अ‍ॅडीशनली विटामिन टॅबलेट्स ज्या गरोदरपणात डॉक देतात त्या अन भरपुर नारळ पाणी, सुकामेवा, फळे ( जे मी कधीच खायची नाही) यामुळे कदाचित काळेभोर अन ईतक्या वर्षात कधीच नव्हते ईतके दाट झालेत केस. माझी पार्लरवाली पण केस कापताना नेहमी म्हणायची की तुझे केस खुप जास्तच नाजुक आहेत, तीनेही परवा सांगीतले की केसांचा पोत खुपच सुधारला.
थोडक्यात काय सकस अन चौरस आहारावर भर द्या अन जमल्यास कोरफड गर अन कोमट तेलाने आठवड्यातुन दोनदा हलक्या हाताने मसाज करा, फरक दिसेल

सर्वांचे आभार
छान माहितीपुर्ण प्रतिसाद आले. मलाही थोडी शंका होतीच या उपायाबद्दल. तुर्तास ईथल्या पोस्ट वाचून मी घरी माझे मत या विरोधात नोंदवलेय. आणि आहारावर लक्ष देऊया म्हटलेय.

आहाराचा मुद्दा आधीही माहीत होता. कारण लहानपणी तिचे केस फारच विरळ होते. काहीच पौष्टीक आवडीने खायची नाही. आजही खात नाहीच. पण म्हणून पिडीयाशुअर दुधातून द्यायला सुरू केल्याचा फायदा केसांमध्येही दिसून आलेला.
आता अर्थात तितके पुरवलेले पोषण पुरेसे ठरणार नाही. आहारातच चांगल्या सवयी लावाव्या लागणार.

वर काही आहाराच्या पोस्ट आल्यात, पालेभाजी अंडे... तसेच तेल मालिश वगैरे. अशीच थोडी माहिती गोळा करतो. ईथेही आहारासंबंधित अजून माहिती आल्यास आवडेल. तसेच गरज वाटल्यास तिच्या नेहमीच्या डॉक्टरशी कन्सल्ट करता येईल.

मुळात तिला दाट - लाम्ब केसाची आवड आहे का ? तसे असेल तर , थोडे काम सोप होइल .
माझ्या मैत्रिणीच्या मुलीचे केस अगदी बारीक शेपटा वगैरे होते . ती तब्येतीनेही काडीपैलवान . तीही साडेसहा वर्षांची आहे आता. लांब केसाच भयानक आकर्षण .
तिच्या आईने , केस लांब , काळे आणि दाट होतील अशी कारणं सांगत तिच्या खाण्यापिण्याच्या सवयीत बदल करायचा प्रयत्न केला .
मी कधी भेटले की तिच्या वाढण्यार्या केसांच कौतुक करायचे . ती काय काय करते त्याच्यामुळे तिचे केस वाढले त्याबद्दल शाबासकी द्यायची .
ज्या गोष्टी अजून करत नाही - जसं ती दूध प्यायला कंटाळा करायची , ड्रायफ्रुट्स खायची नाही - त्या केल्यावर अजून केस कसे छान होतील ते सांगायचं . Happy .माझे स्वतःचे केस लहान्पणी खूप जाड आणि लांब होते . माझे जुने फोटो तिला दाखवले . मी आईचं कसं ऐकायचे , मग मोठी झाल्यावर कसे केस खराब झाले वगैरे गोष्टी सांगितल्या. no preaching , only story sharing
आता तिचे दिवाळीचे फोटो बघितले , पिटुकली तब्येतीनेही सुधारली अहे आणि केसही बर्यापैकी जाड आणि लांब झालेत .
तिची आई म्हणते , आता लॉकडाउन मध्ये खाण्यापिण्याकडे , तेल मालिश वगैरे व्यवस्थित लक्ष देता येते.

टक्कल केल्यामुळॅ केस दाट आल्याच २-३ मुलांचे पाहिले आहेत , पण त्याला काही आधार नाही . केसांची निगा , योग्य सवयी आणि पौष्टीक आहार , हेच खरं .

मुळात मुलींचे केस लांब आणि दाट का असावेत? केस लांब सुंदर असलेच पाहिजे हे एक प्रकारचे कंडिशनिंग आहे...
असा प्रतिसाद अजून कसा आला नाही इथे Wink

वीरु अगदी उत्तम सल्ला.
शक्यतो नीट तेल लावणे, बेसिक स्वच्छता आणि आहारात सर्व प्रकारच्या घटकांचा समावेश असल्यास लहान मुलांचे केस नैसर्गिकच चांगले होतात.
पुढे वयात आल्यावर जितके कृत्रिम घटक (तेल अजिबात न लावणे/सारखे कलरिंग्/आयर्निंग्/केस मोकळे सोडून वार्‍यावर किंवा गाडीवरुन हिंडणे/खाणे नीट न खाणे/जागरण वाढणे) अ‍ॅड होत जातील तितकी क्वालिटी हळूहळू कमी होत जाते.

पण याबाबत घरात जास्त चर्चा नका करु. लहान मुलं फार संवेदनशील असतात.
>>>>>>

नेमकी कसली चर्चा समजली नाही.
केस कापायची चर्चा का? ती तर अगोदरच झाली. लहान भावाच्या बड्डे नंतर कापूया का असे विचारलेले तिला. ती हो म्हणाली. ऑनलाईन क्लासेस आहेत. स्कार्फ वगैरे वापरूया. तिला कंपनी म्हणून वाटल्यास छोट्या भावाचेही मुंडन करूया म्हटलेले Happy ते ही कमी असेल तर मी सुद्धा केस कापून कंपनी देतो म्हटलेले. जेव्हा ती दिड पावणेदोन वर्षांची असताना तिचे कापलेले तेव्हा मी सुद्धा माझ्या डोक्यावर मशीन फिरवलेली. एकूणच आमच्यात ही चर्चा झाली आहे. आणि त्यात काही विशेष वाटले नाही तिला. किंबहुना कापायचे तर चर्चा करणे गरजेचे होतेच ना. आणि आता नाही कापायचे तर त्यासाठी पौष्टिक खावे लागेल हे सुद्धा तिला सांगायला हवे ना. निदान त्या निमित्ताने तरी खायला सुरुवात करेल भाज्या Happy

जर तिच्या विरळ केसांमुळे तिच्या मनात न्यूनगंड येईल या अर्थाने म्हणत असाल तर तो वॅलिड पॉईंट आहे. पण तिच्याबाबत तो लागू नाही याची खात्री असल्याने काही वाटत नाही तिच्याशी यावर बोलायला.

तुमच्यापैकी कोणी हाता पायावर रेझर मारला नाहीय का? नंतर येणारे केस दाट आणि मोठे येतात..
Submitted by च्रप्स on 18 November, 2020 - 19:11

>>>

हो ना, दाढी तर याच तत्वावर येते.
पण तेच डोक्यावरच्या केसांना लागू असेल असे नाही. त्यामुळे कन्फ्यूजन आहे या विषयावर.

जर तिच्या विरळ केसांमुळे तिच्या मनात न्यूनगंड येईल या अर्थाने म्हणत असाल तर तो वॅलिड पॉईंट आहे >> exactly.. याबद्दलच म्हणत होतो.

रोज एक अंडे खाणे, रात्री झोपताना भरपूर खोबरेल तेलाने मालिश याने फक्त केसच नाही तर चेहर्यावरही छान फरक पडलेला दिसेल.
अजून एक गोष्ट. आठवड्यातून दोनदा केस शिकेकाई आणि रिठा वापरून धुणे. आणि गरज वाटली तर एकदा शांपू लावणे. याने बराच फरक पडतो.

केस किंचित तपकिरी सोनेरी आणि दाट हवे असतील तर केसांच्या छोट्या छोट्या भांगोळ्या पाडून त्यात ऑलिव्ह तेलाने वर्तुळाकार मसाज करावा. मसाज करताना पाचही बोटांची टोके डोक्याच्या त्वचेवर फिरवावी. नंतर टर्किश टॉवेल एकदा गरम पाण्यात भिजवून पिळून डोक्यावर गुंडाळावा. तीन मिनिटांनी थंड पाण्यात भिजवून पिळून गुंडाळावा. असे चार पाच वेळा करावे. सौम्य शाम्पू आणि कोमट किंवा मध्यम गरम पाण्याने केस धुवावे.

हीरा ही टॉवेल थेरपी/रुटीन काहीतरी असते असे मी ऐकले होते. मुलीला कळवते. एग्झॅक्ट काय ते माहीत नव्हते.

हीरा आणि क्युटी धन्यवाद
आपले सर्वांचे उपाय लक्षात ठेवतो.
केस कापायचा प्लान कॅन्सल केला आहे. सर्वांचे आभार

नकोत कापायला.
दोन तीन वर्षांपर्यंत मला केस नव्हते. कदाचित दीड वर्षांपर्यंत असेल. पण मग होमियोपॅथी ट्रीटमेंट ने असेल किंवा यायचेच होते म्हणून असेल. एकदम भसाभसा वाढले. आता १५ दिवसाला कापले नाहीत तर डोळ्यावर येतात लगेचच.

हा धागा वर काढल्याबद्दल धन्यवाद नारी मारीतो, प्लान कॅन्सल केला तसेच वागलो. हल्ली किंचित बरे दिसत आहेत. बहुतेक पोषक तत्वांच्या अभावामुळे असेल, अजूनही गधडी चांगलेचुंगले पौषटिक खात नाही.