बेसन लाडू (व्हिडिओ सोबत)

Submitted by डीडी on 13 November, 2020 - 08:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

साजूक तूप - १ कप
बेसन - २ कप
काजू - पाव कप
पिस्ता - पाव कप
वेलची पावडर - १ टीस्पून
पिठीसाखर - दिड कप

क्रमवार पाककृती: 

तर मंडळी फराळ तर करून झालाच असणार, पण तरीही पाकृ आणि व्हिडिओ देत आहे..
** सर्व मायबोलीकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा **

जाड बुडाच्या भांड्यात मंद आचेवर तूप गरम करा.
त्यात बेसन घालून परतत रहा. आच मंद असुद्या
आधी बेसन आणि तुपाच्या गुठळ्या होतील पण साधारण २०-२५ मिनिटानंतर बेसन तूप सोडायला लागेल आणि मिश्रण सैलसर होऊ लागेल.
अजून साधारण १५-२० मिनिटं मंद आचेवर परतत रहा. मिश्रण भांड्याच्या तळाला लागणार नाही याची काळजी घ्या.
आता मिश्रणात काजूचे तुकडे घालावेत आणि मिश्रण पूर्ण थंड होऊ द्या.

बेसन पूर्ण थंड झालं कि त्यात वेलची पावडर आणि पिठीसाखर घालून मिश्रण एकजीव करा
आणि लाडू वळा. सजावटीसाठी लाडूंना पिस्ता/मनुका लावा.

वाढणी/प्रमाण: 
नो प्रमाण
अधिक टिपा: 

साजूक तुपाचं प्रमाण जास्त असल्याने लाडू मऊ एकदम मऊ होतात आणि आकार बदलतात. पण चव म्हणजे स्वर्गसुख.
आपल्या आवडीनुसार तुपाचे प्रमाण कमी करू शकता.

माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Mast.
माझ्यासाठी साखरेचे प्रमाण जास्त आहे,पसंद apni अपनी.
व्हिडिओ मस्तच.

खूप खूप आभार मंडळी.. दिवाळीच्या शुभेच्छा!
ते मिश्रण गार होत असताना साखर घातली असती तर? >> सायो, सौ ला विचारून सांगतो. Happy