चक्कर बाबत solution हवे

Submitted by Abhishek95 on 11 November, 2020 - 14:30

नमस्कार मी अभिषेक....सांगली चा आहे...तर मला सांगायचे होते कि...तीन महिने झाले...मला चक्कर चा त्रास होत आहे...
म्हणजे मला त्रास हा आहे कि...मी स्थिन उभा राहिलो कि सगळे हलते आहे असे वाटते...
मी mri scan केला..तसेच...vertigo च्या tablets. ही घेतलेल्या पण काही उपयोग झाला नाही...
मला समजत नाहीये काय करावे...please help me...
काय करावं लागेल ह्याच्यासाठी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Heart Block नाहीना हे ह्दयरोगतज्ञांकडुन तपासुन घ्या.शुभेच्छा.

व्हर्टिगो, चक्कर, भोवळ विषयी अधिक माहितीचा धागा:
https://www.maayboli.com/node/63464

व्हर्टिगो असेल तर गोळ्यांनी फरक पडला नव्हता तेंव्हा त्याच्या Maneuver नी ते थांबले:
https://www.youtube.com/watch?v=1VWyPgfMuvM
त्याबाबत मी वर दिलेल्या धाग्यावर तपशिलात लिहिले आहे.

एका जागी खुर्चीत खूप वेळ बसून काम केले व एकदम उठून राहिले की लगेच डोक्यात कळा येतात किंवा हॅमर केल्यासारखे होते व चक्कर येते का? तर तो बीपी फ्लक्चुएशन चा एक प्रकार आहे. उठल्यावर रक्त एकदम पायाकडे धावते व डोक्याकडे कमी रक्त जाते. जिथे आधी खूप रक्त जात होते. त्यामुळे बीपी वर खाली होते. लो होते खरेतर व त्यामुळे चक्कर येते. असे असेल तर उठताना एकदम उठायचे नाही हळू हळू उठायचे.
उठल्या वर डोके खाली करून उभे राहायचे दोन मिनिटे व हळू हळू गेट टु स्टँडिंग पोझिशन .

पण एकदा बी पी चेक करून घ्या. व त्याचे औषध लागल्यास घ्या.

कानाचे फंक्षन चेक करून घ्या. त्याने शरीराचा बॅलन्स होल्ड केलेला असतो.

MRI scan मध्ये काही सापडले नाही, vertigo च्या गोळ्या घेऊन अराम नाही तेव्हा परत डॉक्टरना भेटला असाल, काय म्हणणे आहे यांचे याबद्दल? अजून काही चेक अप अथवा वेगळा उपाय सांगितला नाही का?

व्हर्टिगो च्या धाग्यावर अतुल यांनी नक्की काय प्रोब्लेम होतो आणि चक्कर का येते ते छान सविस्तर सांगितले आहे. जे डॉ पण आपल्याला सांगत बसत नाहीत. मी यातून गेले आहे. असच सतत हा नाही तो स्पेशालिस्ट कडे जा, तपासण्या करा, शेवटी मला मिरजेतले डॉ संजीव कुलकर्णी न्यूरॉसर्जन यांनी ही ते अतुल यांनी जे व्यायाम प्रकार लिंक दिलीय तशा प्रकारचे 4 ,5 प्रकार सांगितले, करून घेतले.
आणि आता त्रास नाही . पण सलग 4 दिवस व्यायाम नाही केला तर लगेच त्रास सुरू. मग परत गोळ्या घ्याव्या लागतात. आणि चक्कर येत असताना ही व्यायाम करायचाच .
दुसऱ्या कुठल्याही डॉ ने व्यायाम प्रकार असतो हे सांगितले नाही , फक्त गोळ्या लिहून दिल्या. सगळे डॉ नामवंत न्यूरॉलॉजिस्ट, ent स्पेशालिस्ट, M D होते .